चालणे (Walking) हा एक उत्तम व्यायाम मानला जातो (Eating Meal). चालल्याने अनेक गंभीर आजारांचा धोका कमी होतो. ज्यांना व्यायाम करायला वेळ मिळत नाही. ते लोक वॉकिंग करून कॅलरीज बर्न करतात (Weight Loss). काही जण सकाळी तर काही जण रात्री जेवणानंतर शतपावली करतात (Fitness). जेवणानंतर काही वेळ चालणे आरोग्यासाठी चांगले असते. जेवणानंतर फक्त दोन मिनिटे चालल्याने रक्तातील साखर नियंत्रित करू शकते, पचन सुधारू शकते आणि वेट लॉससाठीही मदत करू शकते(1 Mistake You are Making After Eating a Meal).
चालणं ही एक एरोबिक क्रिया आहे. त्यात शरीराच्या खालच्या भागातल्या स्नायूंचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्याचे फायदे जास्त आणि तोटे कमी आहेत. जेवणानंतर काही जण बसतात किंवा झोपतात. पण जेवणानंतर लगेच झोपी जाणं चुकीचं आहे. यामुळे अपचनाचा त्रास होऊ शकतं.
घासले तरी टॉयलेट पिवळेच? १० रुपयांच्या तुरटीचा करा 'असा' वापर; मिनिटांत टॉयलेट क्लिन - दिसेल चकाचक
खाल्ल्यानंतर चालण्याचे फायदे
स्पोर्ट्स मेडिसिनमधील एका अभ्यासात असे निदर्शनास आले की, जेव्हा लोक जेवणानंतर शतपावली करतात, तेव्हा त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी हळूहळू वाढते आणि कमी होते. परंतु, एकाच जागी बसल्यास किंवा उभे राहिल्यास असे होत नाही. म्हणून, जेवणानंतर ५ मिनिटे चालणे आवश्यक आहे. या सवयीमुळे शरीराला बरेच फायदे मिळतात.
भाजलेले की भिजवलेले? चणे नेमके कसे - केव्हा खाणे योग्य? वजन कमी करायचा फायदा हवा तर..
पचनसंस्थेसाठी उत्तम
जेवल्यानंतर चालणे पचनसंस्थेसाठी फायदेशीर ठरू शकते. चालल्याने शरीराची हालचाल होते. मेटाबॉलिझम बुस्ट होते. ज्यामुळे पचनसंस्था निरोगी होते, अन्न सहज पचतं. अतिरिक्त असलेल्या कॅलरी बर्न होतात, आणि वेट लॉससाठी मदत होते.
हृदय निरोगी राहण्यास मदत
खाल्ल्यानंतर चालण्याने हृदयाचे ठोके वाढतात, ज्यामुळे हृदयाचे स्नायू मजबूत होतात. हृदयाच्या उत्तम आरोग्यासाठी चालणे हा उत्तम व्यायाम आहे. त्यामुळे बसण्यापेक्षा चाला. शरीरातील एनर्जी लेव्हल वाढेल.