Join us  

सतत डोकं दुखतं- टेन्शन येतं? आणि केसही वाढत नाहीत? फक्त २ मिनिटांचा सोपा उपाय, करून बघा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2023 9:07 AM

Home Remedies For Headache: सतत डोकं दुखतं, मनावर कसला तरी ताण असतो, शांत झोप येत नाही, अशा सगळ्याच समस्यांवर हा एकच सोपा उपाय करून बघा. शिवाय केसांचं आरोग्यही सुधारेल.. त्यांची वाढही छान होईल. (headache, stress, sleepless nights and hair problems)

ठळक मुद्देउपाय फक्त २ मिनिटांचा आहे. आणि रात्री झोपण्यापुर्वी अंथरुणावर पडल्या पडल्या आपल्याला तो करायचा आहे.

काही जणांचं सतत डोकं दुखत असतं. याबाबत महिलांचे प्रमाण तर जरा जास्तच आहे. आपण स्वत: किंवा आपली एखादी मैत्रीण, बहीण यांच्या तोंडून- आज माझं डोकं दुखतंय... असं वाक्य आपण बऱ्याचदा ऐकतो. महिलांची डोकेदुखी हा अनेकदा चेष्टेचा विषयही असतो. पण तरीही हा विषय गमतीत घेण्यासारखा मुळीच नाही. तुमचंही सतत डोकं दुखत असेल किंवा मनावर ताण येत असेल, छोट्या छोट्या गोष्टींचे टेन्शन येत असेल, तर रिलॅक्स होण्यासाठी हा एक उपाय (Simple exercise) करून बघा. केसांची चांगली वाढ होण्यासाठीही नक्कीच मदत होईल.(headache, stress, sleepless nights and hair problems)

हा उपाय इन्स्टाग्रामच्या yogawithkamya_या पेजवर शेअर करण्यात आला आहे. उपाय फक्त २ मिनिटांचा आहे. आणि रात्री झोपण्यापुर्वी अंथरुणावर पडल्या पडल्या आपल्याला तो करायचा आहे.

सैफ उत्तम स्वयंपाक आनंदानं करतो, मी तिकडे फिरकत नाही! करिना कपूर सांगतेय, स्वयंपाकाची बदलती गोष्ट

हा उपाय करण्यासाठी जेव्हा तुम्ही बेडवर झोपाल तेव्हा हळुवारपणे तुमची मान आणि डोके बेड वरून खाली घ्या. पाठीवर झोपून हा उपाय करायचा आहे. २ मिनिटे याच अवस्थेत शांत पडून राहा. आणि त्यानंतर व्यवस्थित झोपा. हा उपाय केल्याने झोप तर शांत लागेलच पण डोकेदुखीचा त्रासही कमी होईल. मन शांत होण्यास मदत मिळेल. कारण अशा अवस्थेत झोपल्याने मेंदूला चांगला रक्तपुरवठा होतो. 

 

हे देखील लक्षात ठेवा...१. ज्यांना मायग्रेन, व्हर्टीगो (vertigo) सायटिका किंवा पाठीचे दुखणे असे त्रास असतील त्यांनी हा व्यायाम करू नये.

२. २ मिनिटांपेक्षा अधिक काळ हा व्यायाम मुळीच करू नये. 

वांगी अजिबात आवडत नाहीत, खाऊन पाहा वांग्याचे खमंग कुरकुरीत क्रिस्पी पकोडे! कांदा भजी विसराल अशी टेस्ट

३. दिवसातून एकदाच हा व्यायाम करावा.

४. हा व्यायाम करताना मानेखाली एखाद्या नॅपकिनची छोटीशी गुंडाळी ठेवावी.  

 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामकेसांची काळजी