Lokmat Sakhi >Fitness > दंड आणि कंबरेवरची चरबी कमी करायची? फक्त १ व्यायाम- रोज १० मिनिटे करा...

दंड आणि कंबरेवरची चरबी कमी करायची? फक्त १ व्यायाम- रोज १० मिनिटे करा...

Exercise For Reducing Arm Fat- Belly Fat: जाडजूड दंड आणि कंबरेवर चढलेले चरबीचे थर... यामुळे अनेक जण त्रस्त आहेत. म्हणूनच ते कमी करण्याचा हा बघा एकच सोपा उपाय.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2023 08:04 AM2023-01-13T08:04:36+5:302023-01-13T08:05:02+5:30

Exercise For Reducing Arm Fat- Belly Fat: जाडजूड दंड आणि कंबरेवर चढलेले चरबीचे थर... यामुळे अनेक जण त्रस्त आहेत. म्हणूनच ते कमी करण्याचा हा बघा एकच सोपा उपाय.

1 simple exercise for reducing arm fat, belly fat, How to lose arm fat? | दंड आणि कंबरेवरची चरबी कमी करायची? फक्त १ व्यायाम- रोज १० मिनिटे करा...

दंड आणि कंबरेवरची चरबी कमी करायची? फक्त १ व्यायाम- रोज १० मिनिटे करा...

Highlightsहा एकच व्यायाम नियमितपणे केला तरी दंडावरची आणि कंबरेवरची चरबी कमी करण्यासाठी निश्चितच मदत होईल. 

आपली तब्येत आता सुटू लागली आहे, म्हणजेच वजन प्रमाणाबाहेर वाढतंय, याची सगळ्यात पहिली सुचना मिळते ती आपल्या दंडांकडून आणि कंबर- पोट या भागात वाढू लागलेल्या चरबीकडून. वजन वाढायला सुरुवात झाली की नेहमी योग्य मापात बसणाऱ्या ड्रेसच्या बाह्या घट्ट होऊ लागतात. कंबरेत ड्रेस दाटल्यासारखा होतो. वजन वाढण्याची ही चिन्हे वेळीच लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणूनच हा बघा एकच सोपा व्यायाम. हा एकच व्यायाम नियमितपणे केला तरी दंडावरची आणि कंबरेवरची चरबी ( How to lose Arm Fat- Belly Fat) कमी करण्यासाठी निश्चितच मदत होईल. हा उपाय इन्स्टाग्रामच्या ahamyoginstitute या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

दंड आणि कंबरेवरची चरबी कमी करण्यासाठी व्यायाम
१. हा व्यायाम करण्यासाठी जमिनीवर योगा मॅट टाकून वज्रासनात बसा. त्यानंतर दोन्ही तळहात जमिनीवर ठेवून शक्य तेवढे पुढे न्या.

मुलांचं टीव्ही- मोबाईलचं वेड कमी करण्यासाठी काय करावं कळेना? बघा ३ उपाय- वाचा तज्ज्ञांचा सल्ला

आता गुडघे आणि त्याखालचा तळपायापर्यंतचा भाग न हलवता बाकी शरीर हातावर जोर देऊन पुढच्या दिशेने न्या आणि पुन्हा तसेच मागे या. हा व्यायाम करताना जमिनीवर ठेवलेले तळहातही हलवू नयेत. ही स्टेप १५ ते २० वेळा करा. पुन्हा थोडा ब्रेक घेऊन पुन्हा करायला सुरुवात करा. असे १० मिनिटे करावे.  पण सुरुवातीला हा व्यायाम ३ ते ४ मिनिटेच करा. त्यानंतर हळूहळू वेळ वाढवत न्या. 

 

२. सुर्यनमस्कार
योग शास्त्रानुसार सुर्यनमस्कार हा एक पुर्ण व्यायाम मानला जातो. याचाच अर्थ असा की सुर्यनमस्कार केल्याने संपूर्ण शरीराचाच व्यायाम होतो.

फक्त १० मिनिटांत करा तीळगुळाचे पौष्टिक लाडू, झटपट रेसिपी - पाक चुकायची भीतीच नाही

त्यामुळे नियमितपणे १० सुर्यनमस्कार घातले तर दंड, कंबर, पोट, मांड्या या भागावरची चरबी कमी होऊन शरीर सुडौल होण्यास निश्चितच मदत होईल. 


 

Web Title: 1 simple exercise for reducing arm fat, belly fat, How to lose arm fat?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.