वजन वाढलं (Weight Loss) की साहजिक इतर गंभीर आजारही छळतात. शिवाय, वाढत्या वजनामुळे कपडेही फिट बसतात. ज्यामुळे आपले सौंदर्य काही अंशी कमी होते. 'किती वजन वाढलंय, थोडे कमी कर'. असे टोमणे दररोज ऐकायला मिळतात. जर आपण देखील वजन वाढीच्या समस्येमुळे त्रस्त असाल आणि वजन कमी करण्यासाठी व्यायाम करायला वेळ मिळत नसेल तर, दररोज स्वतःसाठी १० मिनिट काढत एक व्यायाम करा (Squats).
फक्त एका व्यायामामुळे पोट, हिप्स, मांड्या, हातावरील लटकलेली चरबी कमी होईल, शिवाय आपले शरीर सुडौल दिसेल (Fitness). जर आपल्याला काही दिवसात फरक पाहायचा असेल तर, सकस आहार आणि दररोज न चुकता एक व्यायाम करा. याची माहिती फिटनेस एक्सपर्ट प्रियंका यांनी शेअर केली आहे(10 Benefits Of Doing Squats For Weight Loss ).
बॉबी देओल सांगतो ४ महिने साखर सोडली आणि.. खरंच साखर सोडल्यानं वजन पटकन कमी होतं?
यांसंदर्भात फिटनेस तज्ज्ञ प्रियांका सांगते, 'वजन कमी करण्यासाठी स्क्वॅट्स हा व्यायाम उपयुक्त ठरेल. स्क्वॅट्स फक्त शरीराचा खालचा भाग कमी करत नसून, हा व्यायाम करताना संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. शिवाय यामुळे शरीर टोन्ड होते. पोटाच्या मसल्सवर काम करते. यासह कॅलरीजही झरझर कमी होते.'
स्क्वॅट्स करण्याची योग्य पद्धत
स्क्वॅट्स करण्यासाठी पाठीचा कणा ताठ ठेऊन उभे राहा. आपल्या पायांमध्ये नितंबाच्या रेषेत अंतर ठेवून उभे राहा. गुडघे बोटांच्या रेषेत जास्त पुढे नेऊ नका.
नंतर हात समोरच्या दिशेने पुढे सरळ ठेवा, आणि पायाची टाच जमिनीवर घट्ट रोवून ठेवा. खुर्चीत बसल्याप्रमाणे पाय गुडघ्यात वाकवून शरीर खाली घेऊन या. बसताना गुडघे हळू हळू वाकवून नितंबांना मागच्या बाजूला वाकवून बसा. संपूर्ण खाली बसू नका, गुडघ्याच्याखाली मागच्या बाजूने नितंब जातील, एवढंच खाली जा. नंतर पुन्हा उभे राहा, आणि ही क्रिया १५ वेळा पुन्हा करा.
आपण हा व्यायाम एका सेटमध्ये १५ वेळा करू शकता, व याचे दिवसातून ३ सेट करा. काही दिवसानंतर आपण याचे एक्स्ट्रा सेट करू शकता.
स्क्वॅट्स करण्याचे फायदे
- अप्पर आणि लोअर बॉडीसाठी बेस्ट.
- कमी कालावधीत झटपट कॅलरीज बर्न होते.
- रक्ताभिसरण सुधारते.
- पाठीचा खालचा भाग मजबूत होते.
- पोश्चर सुधारते.
- पाय आणि नितंब टोन्ड होते.
- पचनक्रिया सुधारते.
- एनर्जी लेव्हल वाढते.
- तणाव दूर राहते, शिवाय झोपही व्यवस्थित लागते.
- नितंबांचे स्नायू मजबूत होतात.