Lokmat Sakhi >Fitness > दिवसातून एकदा वेळ मिळेल तेव्हा फक्त १० मिनिटं करा हे आसन, वाढलेली कंबर होईल कमी- बांधा कमनीय

दिवसातून एकदा वेळ मिळेल तेव्हा फक्त १० मिनिटं करा हे आसन, वाढलेली कंबर होईल कमी- बांधा कमनीय

10 Minutes Asana Practice to Reduce your Waistline कंबरेवर वाढलेली चरबी काही केल्या कमी होत नाही म्हणून वैतागला असाल तर हे एक आसन करुन पाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2023 02:13 PM2023-03-22T14:13:47+5:302023-03-22T14:14:42+5:30

10 Minutes Asana Practice to Reduce your Waistline कंबरेवर वाढलेली चरबी काही केल्या कमी होत नाही म्हणून वैतागला असाल तर हे एक आसन करुन पाहा

10 Minutes Asana Practice to Reduce your Waistline | दिवसातून एकदा वेळ मिळेल तेव्हा फक्त १० मिनिटं करा हे आसन, वाढलेली कंबर होईल कमी- बांधा कमनीय

दिवसातून एकदा वेळ मिळेल तेव्हा फक्त १० मिनिटं करा हे आसन, वाढलेली कंबर होईल कमी- बांधा कमनीय

जेव्हा शरिरातली चरबी वाढू लागते तेव्हा शरीर बेडप दिसू लागतं. बदलत्या जीवनशैलीमुळे वजनात देखील बदल घडते. प्रत्येकाचे शरीर हे वेगळे असते. कोणाचा कंबरेखालील भाग वाढतो, तर कोणाचा कंबरेवरील, तर काहींच्या कंबरेमध्ये चरबी साठते. प्रत्येकाला सडपातळ आणि चरबीमुक्त कंबर हवी असते. कंबरेचा भाग वाढला की, कोणतीही पँट व्यवस्थित बसत नाही. त्यामुळे आपण अनेक उपाय करून पाहतो.

काही उपाय प्रभावी ठरतात तर काही नाही. आपल्याला जर सडपातळ कंबर हवी असल्यास, यासाठी कटीचक्रासन हा योग करून पाहा. या योगासनामुळे पोटाची चरबी तर कमी होतेच यासह, कंबरेवर जमा झालेली अतिरिक्त चरबीही कमी होईल. व कंबरेला नवीन सडपातळ आकार येईल(10 Minutes Asana Practice to Reduce your Waistline).

‘मला व्हायचं होतं फिट म्हणून..’ लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात वजन कमी करणारी आलिया भट सांगते..

कटीचक्रासन करण्याचे फायदे

कटीचक्रासन म्हणजे कंबरेतून शरीर फिरवणे होय. या आसनामुळे कंबरेला ताण बसून ती आणखी लवचिक बनते. कटीचक्रासन केल्याने शरीरतली अतिरिक्त चरबी कमी होते, यासह  पोट अगदी सडपातळ दिसू लागते. शिवाय पचनाशी संबंधित समस्याही कमी होते. त्यामुळे नियमित कटीचक्रासन करायला हवे. लिव्हर, किडनी आणि आतडे निरोगी ठेवण्यासाठी देखील हे खूप प्रभावी आहे.

कटीचक्रासन कसे करावे?

सर्वप्रथम, सरळ उभं राहा, त्यानंतर दोन्ही पायांमध्ये समान अंतर ठेवा. आता श्वास घेत आपले हात समोर करा, हात वाकलेले नसावे; आणि त्यांच्यामध्ये खांद्या एवढं अंतर हवा याची काळजी घ्या. आता श्वास सोडत कंबरेला पीळ देऊन हळुवार उजवीकडे वळा. उजव्या खांद्यावरून मागे पहा. तळहातातील अंतर एकसारखे राहूद्या.

सकाळी लवकर उठायचा कंटाळा येतो? मग झोपल्या झोपल्या करा ३ व्यायाम, पोट कमी करण्याचा उपाय

कंबरेच्या खालील भागात पीळ जाणवूपर्यंत फिरा. आता श्वास घेत आसन सोडा. समोर या. श्वास सोडत डाव्या बाजूला वळत आसन करा. श्वास सोडत आसन सोडा. समोर या. आपल्या दोन्ही बाजूंनी हि कृती परत करा. मग श्वास सोडत हात खाली घ्या. हा योग रोज किमान १०-१५ वेळेस करा. ज्यामुळे साईड फॅट्स लवकर कमी होण्यास मदत होईल.

Web Title: 10 Minutes Asana Practice to Reduce your Waistline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.