आपल्या सभोवती आपण अनेक जण असे बघतो, की त्यांची वजन कमी करण्यासाठी अक्षरश: धडपड सुरू असते. सांगितल्याप्रमाणे डाएट, वर्कआऊट (weight gain instead of diet and workout) असं ते नियमितपणे करतात. पण तरीही त्यांना अपेक्षित असतो, तसा फरक त्यांच्या वजनात दिसत नाही. त्यामुळे साहजिकच अनेक जण वैतागून जातात आणि आपली अंगकाठीच अशी आहे, असं मानून मग सगळे प्रयत्न थांबवतात. पण असं करू नका. या निर्णयापर्यंत येण्याआधी तुमचं खालील बाबतीत तर काही चुकत नाही ना, हे एकदा व्यवस्थित वाचा आणि आपलं आपणच तपासून पहा...
या १० चुका वाढवतात तुमचं वजन...( reasons for getting fat)
१. आहारातला मीठाचा वापर तुमच्या वजनावर परिणाम करतो. सॉल्टेड चीज, मसाले, पॅक फूड खात असाल तर खूप जास्त सोडीयम पोटात जातं आणि त्यामुळे वजन कमी होत नाही.
२. वजन कमी करण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे. पाणी कमी पित असाल, तरी वजन कमी होणार नाही. कारण अपुऱ्या पाण्यामुळे शरीरातील चयापचय क्रिया व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे अन्नाचं पचन नीट न झाल्याने शरीरावर चरबी वाढत जाते.
३. रात्रीची झोपदेखील वजनावर परिणाम करते. खूप कमी किंवा खूप जास्त झोप काढण्याची सवय असेल तरी वजन वाढू शकतं.
४. खूप भराभर जेवणाची सवयही वजन कमी न होण्यास कारणीभूत ठरते. व्यवस्थित चावून जेवण केलं नाही तर पचन क्रिया आणि चयापचय क्रियेत अडथळा येतो आणि त्यामुळे मग शरीरावर अतिरिक्त चरबी साचत जाते.
५. जेवताना कोल्ड्रिंक पिण्याची सवय वजन वाढण्यास कारणीभूत ठरते. आपलं पोट भरलं आहे, हे सांगणारे जे हार्मोन्स असतात, त्यांचं स्त्रवणं कोल्ड्रिंक प्यायल्याने कमी होतं. यामुळे भुक भागल्याची जाणीव कमी होते आणि जास्त जेवलं जातं.
६. ज्यांना खूप जास्त कामाचा ताण असतो आणि स्वत:ला रिलॅक्स करायला किंवा डिस्ट्रेस व्हायला वेळच मिळत नसतो, अशा लोकांनाही नेहमीच वजन वाढीची तक्रार छळते. सततच्या तणावाचा नकळत परिणाम तुमच्या शरीरातील हार्मोन्सच्या सिक्रीशनवर, ब्लड- शुगर लेव्हलवर होत जातो आणि वजन वाढतं.
७. हेवी डाएटच्या खूप जास्त मागे लागणं ही वजन वाढीसाठी कारणीभूत ठरतं. या डाएटमधून अनेकदा अत्यावश्यक फूड ग्रुप्स वगळले जातात. त्यांची कमतरता अनेकदा तब्येतीच्या तक्रारी निर्माण करते, त्यातूनही वजन वाढीची शक्यता असते.
८. वजन वाढेल या भितीमुळे अजिबातच फॅट न खाण्याची सवयही चांगली नाही. कारण हेल्दी फॅट्स वजन नियंत्रणात ठेवण्यास मदतच करतात.
९. रात्री उशीरा जेवण्याची सवय वजन वाढीसाठी कारणीभूत ठरते.
१०. टीव्ही बघत, काम करत, गेम खेळत जेवण्याची सवय वजन वाढीचं एक मुख्य कारण आहे.