तासनतास एकाच जागेवर बसून काम केल्यानं अनेकांना लठ्ठपणाचा सामना करावा लागतो. एकदा वजन वाढलं की लवकर कमी होत नाही.(Tips to help you lose weight) वजन कमी करण्यासाठी डाएट-जीमचा आधार काहीजण घेतात पण त्यात सातत्य नसल्यानं वजन कमी करणं कठीण होतं. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी काही टिप्स फायदेशीर ठरू शकतात. रोजच्या जीवनशैलीत काही सोपे बदल केले तर तुम्ही सहज वजन कमी करू शकाल. (Weight Loss Tips)
वजन वाढण्याची कारणं (Reasons of weight gain)
स्ट्रेस-
हा शब्द ऐकायला जितका लहान वाटतो तितकाच तो त्रासदायक आहे. जेव्हा कोणतीही व्यक्ती जास्तवेळ स्ट्रेसमध्ये असते तेव्हा हॉर्मोन्स प्रभावित होतात जे वजन वाढण्याचं कारण ठरू शकतात.
झोप
आजकाल लोक मोबाईल वापरत तासनतास जागे असतात. व्यवस्थित झोप पूर्ण न झाल्यानं वजन वाढण्याची समस्या उद्भवते. झोप व्यवस्थित पूर्ण होत नसेल तर वजन वाढू शकतं.
हायड्रेशनचा अभाव-
मेटाॉलिझ्म वाढण्यासाठी शरीरात योग्य प्रमाणात पाणी असणं गरजेचं असतं. जर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पीत नसाल तर वजन वाढू शकता. यामुळे शरीरातले टॉक्सिन्स बाहेर पडण्यात अडचण येते आणि गंभीर आजार उद्भवतात.
१) वजन कमी करण्यासाठी फक्त डाएटींग नाही तर रोजच्या जेवणात संतुलित आहार घेण्याची गरज असते.
२) जेवणात तुम्ही अशा पदार्थांचा समावेश करू शकता ज्यात प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असेल
३) भारतात ऑयली फूड खूपच खाल्ले जाते. तुम्ही तेलकट पदार्थांच्या सेवनावर नियंत्रण ठेवायला हवं.
४) तेलयुक्त पदार्थांपेक्षा उकळलेले किंवा भाजलेले पदार्थ खाण्यास प्राधान्य द्या
५) अल्कोहोल शरीरारासाठी नुकसानकारक ठरतं म्हणून यापासून कायम लांब राहा.
६) कोल्ड ड्रिंक्स आणि आईस्क्रीम खाणं टाळा
७) साखरयुक्त पदार्थांमुळे लठ्ठपणा वाढतो या पदार्थांचे सेवन करू नका.
८) रोजच्या आहारात ड्रायफ्रुट्सचा समावेश करा. जेणेकरून जास्तवेळ भूक लागणार नाही.
९) हिरव्या पालेभाज्या खायला सुरूवात करा. यात कॅलरीजचे प्रमाण कमी असते.
१०) आहारात फळांचा समावेश करा. पाणी जास्तीत जास्त प्या. कमी पाणी प्यायल्यास वजन कमी करणं कठीण होतं. याशिवाय वेगवेगळे आजारही उद्भवू शकतात.