एचडीएल आणि एलडीएल असे कोलेस्टेरॉलचे दोन प्रकार असतात. (Cholesterol control Tips) एचडीएल म्हणजेच गूड कोलेस्टेरॉल तर एलडीएक एक पिवळा, घातक- चिकट पदार्थ असतो त्याला बॅड कोलेस्टेरॉल असं म्हटलं जातं. नसांच्या भिंतींना हा पदार्थ चिकटतो आणि बंद करतो. यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. ब्रिटिश हार्ट फाऊंडेशननुसार कोलेस्टेरॉल वाढण्यानंतर काही खास लक्षणं दिसून येत नाहीत पण यामुळे गुडघे दुखणं, डोळ्यांच्या वर जाड थर तयार होणं, पायांच्या नसा हिरव्या दिसून येणं. (Top lifestyle changes to improve your cholesterol) अशी लक्षणं दिसतात. ही लक्षणं जाणवतात.
१) हार्वर्ड्च्या रिपोर्टनुसार ओट्स खाल्ल्यानं घातक कोलेस्टेरॉल कमी होऊ लागते. यात सोल्यूबल फायबर्स असते. ज्यामुळे रक्तातील घाण निघून हृदय निरोगी राहते.
२) बदाम अक्रोड, शेंगदाणे यांसारख्या नट्समध्ये व्हिटामीन्स आणि मिनरल्स असतात. हे खाद्यपदार्थ आरोग्यासाठी लाभदायक ठरतात. एलडीएल आणि ट्रायग्लिसराईड यामुळे कमी होते.
३) राजमा, मूग डाळ, तूर तसेच शेंगांमध्ये व्हिटामीन, मिनरल्स आणि सोल्यूबल फायबर्स असतात. यामुळे वजन नियंत्रणात राहतं आणि घातक कोलेस्टेरॉल वाढतं.
४) जेवण बनवताना तूपाऐवजी सुर्यफुलाचे तेल, ऑलिव्ह ऑईल, कॅनोला तेलाचा वापर स्वयंपाकासाठी करा. यामधील एचडीएल म्हणजेच चांगले कोलेस्टेरॉल घातक पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतील.
५) कोलेस्टेरॉल वाढल्यास लसणाचे सेवन फायदेशीर ठरते. हाय कोलेस्टेरॉलपासून सुटका मिळवण्यासाठी रोज सकाळ-संध्याकाळ लसणाचे सेवन करा.
६) शरीरात बॅड कोलेस्टेरॉल जास्त झाल्यास मेथीच्या पाण्याचे सेवन तुम्ही करू शकता. मेथीमध्ये अनेक पोषक तत्व असतात ज्यामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते.
७) लिंबात असे अनेक गुण असतात ज्यामुळे हाय कोलेस्टेरॉल कमी करता येतं. जर तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढले असेल तर आहारात लिंबाचा समावेश करा. लिंबामुळे शरीर डिटॉक्स होण्यासही मदत होते.
८) आंबट फळं जसं की संत्री, द्राक्ष कोलेस्टेरॉल कमी करण्यास फायदेशीर ठरतात. रोज सकाळी आणि संध्याकाळी पायी चालल्यानेही कोलेस्टेरॉल लेव्हल कमी होते.
९) ग्रीन टी मध्ये अशी अनेक तत्व असतात जी आरोग्यासाठी चांगली ठरतात. लोक वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी घेतात. मेटाबॉलिझ्म वाढवण्यासाठी आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी ग्रीन टी गुणकारी ठरते. यामुळे बॅड कोलेस्टेरॉल कमी होते.
१०) हळदीचं दूध प्रत्येकासाठी खूप फायदेशीर आहे परंतु ज्यांचे कोलेस्ट्रॉल जास्त आहे त्यांच्यासाठी ते अधिक गुणकारी आहे. कारण हळदीमध्ये काही घटक असतात जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात.