Join us  

Exercises For Double Chin: फक्त ११ दिवस करा व्यायाम आणि डबल चिन गायब! बघा ४ मिनिटांचे ४ व्यायाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2022 6:22 PM

Simple Tricks To Reduce Double Chin: काही व्यक्ती खूप जाड नसतात, पण त्यांना डबल चिन मात्र (double chin problem) भरपूर असते. त्यामुळे मग त्या उगाच जाड असल्यासारख्या वाटतात. हा त्रास कमी करण्यासाठी हे 4 व्यायाम करा आणि आणखी आकर्षक दिसा. (4 exercises to reduce double chin)

ठळक मुद्देवॉटर रिटेंशन आणि प्लॅटिस्मा मसल्सचं काम हळूवार झाल्याने डबल चिनचा त्रास वाढतो. आणि चेहरा बेढब होऊन उगाच वय वाढल्यासारखं दिसतं.

साधारण पंचविशीनंतर अनेक जणींना डबल चिनचा (double chin) त्रास सुरू होतो. ज्याप्रमाणे आपण व्यायाम (exercises) केला नाही तर शरीरावर चरबी साचत जाते आणि लठ्ठपणा येतो, तसंच काहीसं डबल चिनचंही असतं. चेहऱ्याची, मानेची, गळ्याची योग्य पद्धतीने आणि पुरेशी हालचाल झाली नाही तर हनुवटीच्या खाली गळ्यावर चरबी साचत जाते. काही दिवसांनी तिचा एक थर संपूर्ण जॉ- लाईनच्या (how to get perfect jaw line) खाली दिसू लागतो. यालाच आपण डबल चिन म्हणतो. 

 

साधारणपणे जे लोक जाड असतात, स्थूल असतात, त्यांना डबल चिन असतेच. पण काही जणांच्या बाबतीत तर आणखी वेगळी परिस्थिती असते. काही लोक शरीराने खूप जाड नसतात. पण डबल चिन मात्र भरपूर असते. त्यामुळे मग विनाकारण त्यांचा चेहरा शरीरापेक्षा अधिक मोठा दिसू लागतो आणि ते आहेत त्यापेक्षा आणखीनच जाड दिसतात. डबल चिनमुळे चेहऱ्याचा रेखीवपणा देखील कमी होतो आणि चेहरा बेढब होऊन उगाच वय वाढल्यासारखं दिसतं. त्यामुळेच हे काही व्यायाम करा आणि ११ दिवसांत डबल चिन कमी करा, असं सांगणारा हा व्हिडिओ #OnlyMyHealth या युट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आला आहे. वॉटर रिटेंशन आणि प्लॅटिस्मा मसल्सचं काम हळूवार झाल्याने डबल चिनचा त्रास वाढतो.  

 

डबल चिन कमी करणारे ५ व्यायाम१. ओ स्ट्रेच पोज (O stretch)ओ असा उच्चार केल्यावर ओठांची जशी पोझिशन असते, तशा पद्धतीने ओठांचा आकार करा. असे करताना दात झाकून जातील अशा पद्धतीने तोंड उघडा. यानंतर हळूहळू मान वर करा आणि नजर वर छताकडे केंद्रित करा. १० सेकंद ही आसनस्थिती टिकविण्याचा प्रयत्न करा. दररोज ३ वेळा १०- १० सेकंद हे आसन केल्यास ब्लड सर्क्युलेशनही वाढते.

 

२. पाऊट स्ट्रेच पोज (poutch pose)फोटो काढण्यासाठी जसे पाऊट करतो, तशी पाऊट पोझिशन करा. त्यानंतर श्वास घेत घेत मान वर करा आणि छताकडे लक्ष केंद्रित करा. १्र० सेकंद ही अवस्था टिकवून ठेवा. त्यानंतर पुन्हा श्वास सोडत सोडत खाली बघा. ३ वेळा १०- १० सेकंदांसाठी हे आसन करावे. यामुळे सिबॅशियस ग्लॅण्ड आणि प्लॅटिस्मा मसल्स ॲक्टीव्हेट होतात.

 

३. अपवर्ड स्ट्रेच (Upward stretch)गळ्याच्या दोन्ही बाजूला हात ठेवा. श्वास घेत हळूहळू मान वर बघा. यावेळी ओठ बंद ठेवा. १० सेकंद ही अवस्था राहू द्या. यानंतर श्वास सोडत सोडत पुन्हा पहिल्यासारखी पोझिशन घ्या. हे आसनही १०- १० सेकंदांसाठी ३ वेळा करावे. 

 

४. नेक रोटेशन (neck rotation) नेक रोटेशन म्हणजे गोलाकार पद्धतीने मान हलवणे. यामध्ये सुरुवातीला क्लॉकवाईज आणि नंतर ॲण्टीक्लॉकवाईज पद्धतीने मान फिरवावी. यातही सुरुवातीला ३ वेळा हळूवार मान फिरवा आणि त्यानंतर पुढचे २ वेळा थोडी जलद मान फिरवावी. हा व्यायाम केल्याने मान, गळा या भागातील रक्ताभिसरण तर वाढतेच पण तेथील वेगवेगळ्या ग्रंथींचे कार्यही सुधारते. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सब्यूटी टिप्सयोगासने प्रकार व फायदेव्यायाम