Join us  

weight loss सोळा/आठ! बारीक व्हायचं आणि फास्ट फिटही, झटपट हे 16/8 फॉलो करा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2021 2:57 PM

16/8 weight loss trend सध्या भलताच हीट झालाय बरं का... ॲक्टर राम कपूरने सुद्धा हाच वेटलॉस पॅटर्न फॉलो करून तब्बल २५ किलो वजन घटवले होते. 

वजन कमी करण्याचे नवनवे ट्रेण्ड प्रत्येक वर्षीच येत असतात. सगळे ट्रेण्ड चांगलेच असतात. पण आपल्या प्रकृतीला त्यातला कोणता ट्रेण्ड सूट होतो, हे महत्त्वाचं. सध्या सोळा- आठ फिटनेस ट्रेण्डची खूपच चर्चा आहे. अल्पावधीतच हा ट्रेण्ड हीट झाला आहे. अनेक हिरो- हिरोईन्सदेखील हा ट्रेण्ड फॉलो करत आहेत. फिट राहून  झटपट वजन कमी करण्यासाठी हा वेटलॉस फॉर्म्यूला ओळखला जातो. उपवास आणि खाणे या दोन गोष्टी या ट्रेण्डमध्ये फॉलो केल्या जातात. पण कधी खायचे आणि कधी उपवास करायचा, याचे नियम मात्र काटेकोरपणे पाळावे लागतात बरं का..

 

16/8 डाएट प्लॅनभारतीय लोकांना उपवास काही नवे नाहीत. 16/8 पॅटर्न म्हणजे एकप्रकारचा उपवासच आहे हे लक्षात घ्या. पण हा उपवास आपल्या नेहमीच्या उपवासांसारखा अजिबातच नाही. ''एकादशी आणि दुप्पट खाशी'' यानुसार आपण उपवास करत असतो. पण 16/8 पॅटर्नचा उपवास म्हणजे खरोखरच उपवासच असतो. हा पॅटर्न फॉलो करणारे लोक १६ तास उपवास करतात आणि उर्वरित ८ तासांमध्ये ठरवून दिलेले खाद्यपदार्थ खातात. 

खाण्याचे ८ तास असे निवडासकाळी ९ ते सायंकाळी ५सकाळी १० ते सायंकाळी ६दुपारी १२ ते रात्री ८.- रात्रीच्यावेळी आपली चयापचय क्रिया मंदावलेली असते. त्यामुळे या वेळा उत्तम असल्याचे आहारतज्ज्ञ सांगतात. - खाण्याच्या ज्या वेळा आपण निवडलेल्या आहेत, त्यावेळेत आपण नेहमीप्रमाणे आपले जेवण आणि नाश्ता घेऊ शकतो. पण वेळ एकदा उलटून गेली, की मग मात्र तोंडाला कुलूप. 

 

उपवासाने अशक्तपणा येऊ नये म्हणून१६ तासांच्या उपवासाचा बराच वेळ झोपण्यात जातो. पण तरीही एकदम एवढा वेळ काही न खाण्याची सवय शरीराला नसते. त्यामुळे उपवासाच्या १६ तासांमध्येही आपली शक्ती टिकवून ठेवायची असेल, तर खाण्याच्या वेळेत सकस, संतुलित आणि पौष्टिक आहार घ्यावा. जंकफुड घेणे टाळावे. 

८ तासांत हे पदार्थ खाण्यावर भर द्याफळे, भाज्या आणि कडधान्येवरण- भात, भाजी, पोळी, भाकरी, सॅलड असा सकस आणि संतूलित आहार.ओट्स आणि बार्लीमासे, बीन्स, मसूर, टोफू, नट, बियाणे, कमी चरबीयुक्त कॉटेज चीज आणि अंडी.फॅटी फिश, ऑलिव्ह, ऑलिव्ह ऑइल, नारळ, एवोकॅडो, नट

 

१६ तासांच्या उपवासात काय काळजी घ्यायची?डिहायड्रेशन टाळण्यासाठी १६ तासांच्या उपवासात भरपूर पाणी प्यावे.तसेच कॅलरीमुक्त पेये या काळात घेतली तरी चालतात.साखर आणि दूध न घालता बनविलेली कॉफी आणि चहादेखील या काळात चालतो.दालचिनी घालून हर्बल चहा घेतला तर भूक मंदावते आणि उपवास करणे सोपे जाते. 

 

व्यायाम केला तरी चालतोहा वेटलॉस पॅटर्न फॉलो करायला सुरूवात केल्यावर सुरूवातीला काही दिवस अशक्तपणा जाणवू शकतो. परंतू त्यानंतर मात्र आपल्या शरीराला आहाराच्या या वेळांची सवय होऊन जाते. त्यामुळे एकदा रूटीनला आल्यावरच व्यायाम चालू करावा. व्यायामासाठी जेवणाच्या वेळा सुरू होण्याच्या आधीची वेळ निवडावी. जेणेकरून व्यायाम झाल्यावर लागणारी भरपूर भूक व्यवस्थित भागवता येईल. 

 

16/8 डाएट प्लॅनचे फायदेवजन कमी होणे कॅलरीज बर्न होण्यास मदत होणे.चयापचय क्रिया सुधारते. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यपौष्टिक आहार