Join us  

थायरॉईडचा त्रास कमी करणारे २ व्यायाम, दुखणं नियंत्रणात ठेवण्यासाठी वाचा योगतज्ज्ञांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2022 8:06 AM

How to Control Thyroid: थायरॉईडचा त्रास सध्या अनेक जणांना जाणवतो. हे दुखणं नियंत्रित ठेवण्यासाठी योग अभ्यासकांनी सांगितलेले हे २ व्यायाम नियमितपणे करून बघा.

ठळक मुद्दे४ महिने सलगपणे हे व्यायाम केले तर नक्कीच खूप चांगला परिणाम जाणवेल, असं या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

हायपो- थायरॉईड आणि हायपर थायरॉईड असे थायरॉईडचे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. थायरॉईड ग्रंथीचं काम सुरळीत नसल्याने हा आजार मागे लागतो. डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानुसार घेतलेली औषधी, योग्य आहार आणि त्यासोबतच व्यायाम या तीन गोष्टी सांभाळल्या तर थायरॉईडचे हे दोन्ही प्रकार नियंत्रित ठेवता येतात. योगाभ्यासामध्ये थायरॉईडचा त्रास कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतील असे अनेक व्यायाम (2 Exercise to keep thyroid in control) सांगितले आहेत. इन्स्टाग्रामच्या smriti.yoga या पेजवर देखील याविषयीची माहिती शेअर करण्यात आली असून थायरॉईड असणाऱ्यांसाठी २ सोपे व्यायामही सुचविण्यात आले आहेत.

 

थायरॉईडचा त्रास कमी करण्यासाठी व्यायामहे दोन्ही व्यायाम करण्यासाठी तुम्हाला खूप जास्त वेळ देण्याची अजिबातच गरज नाही. अगदी १० मिनिटांत बसल्या बसल्या तुम्ही हे व्यायाम करू शकता. ४ महिने सलगपणे हे व्यायाम केले तर नक्कीच खूप चांगला परिणाम जाणवेल, असं या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

ढाबा स्टाईल वांग्याचं भरीत, बघा सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांची झणझणीत भरीत रेसिपी१. पहिला व्यायामहा व्यायाम करण्यासाठी मांडी घालून किंवा वज्रासनात- पद्मासनात ताठ बसा. त्यानंतर तोंडाने 'मSSS' असा उच्चार करा. हा उच्चार करताना ओठ बंद असावेत आणि आवाज घशातून काढण्याचा प्रयत्न करावा. यावेळी डोके शक्य तेवढे मागच्या बाजुला वळवून गळ्याला ताण देण्याचा प्रयत्न करावा. ही क्रिया ४ ते ५ वेळा करावी. 

 

२. दुसरा व्यायामया प्रकारात हाताने शंखमुद्रा करायची आहे. त्यासाठी उजव्या हाताचा अंगठा डाव्या हाताच्या बोटांनी पकडा.

इन्स्टंट ग्लो देणारं बीट रूट फेशियल, फक्त ३ स्टेप्स आणि चेहऱ्यावर येईल मस्त ग्लो

डाव्या हाताचा अंगठा सरळ ताठ ठेवा. आता डाव्या हाताचा अंगठा आणि उजव्या हाताचे मधले बोट एकमेकांना जोडा. उजव्या हाताची इतर बोटेही एकमेकांना जोडून ठेवा. ही मुद्रा ४ ते ५ मिनिटे करा. आणि त्यावेळी तोंडाने ओम चा उच्चार करा.  

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामयोगासने प्रकार व फायदेहेल्थ टिप्स