घरची गृहिणी म्हटलं की तीच सगळं काम घड्याळ्याच्या काट्यावर असत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळी काम वेळेत संपवण्यासाठी तिची सतत धावपळ सुरु असते. पायाला एखादी भिंगरी लागल्याप्रमाणेच ती सतत धावपळ करत असते. गृहिणींची अर्ध्यापेक्षा जास्ती काम ही उभी राहून करण्याचीच असतात. सकाळचा नाश्ता, स्वयंपाक करण्यासाठी तासंतास किचनमध्ये उभे राहावे लागते. यासोबतच घराची आवराआवर, स्वच्छता ही बहुतेक सगळीच काम उभं राहून केली जातात( Best stretches and exercises for healthy feet & leg).
दिवसभर सतत असं उभं राहिल्याने किंवा सारखी धावपळ केल्याने पायांचे गुढघे, टाचा दुखू लागतात. काहीवेळा काही महिला या समस्येकडे दुर्लक्ष करतात परिणामी, ही छोटीशी समस्या नंतर अधिक वाढून काहीवेळा साधं उभं राहणं देखील जमत नाही. वारंवार पाय, गुढघे, टाचा दुखत असतील तर या त्रासाने नकोसे वाटते. यासाठीच घरातील काम करताना सतत उभं राहून पाय, टाचा दुखत असतील तर आपण काही सोपे एक्सरसाइज करु शकता. हे एक्सरसाइज तुम्ही काम करताना आणि आहे त्याच जागेवर उभं राहून देखील अतिशय सहज करु शकता. यामुळे पायांना थोडा आराम मिळून पाय थोडे मोकळे होतील. तासंतास उभं राहून घरातील काम करताना कोणते एक्सरसाइज करावेत ते पाहूयात(2 Exercises To Relieve Foot Pain When Standing All Day).
सतत उभं राहून पाय-टाचा दुखून नयेत म्हणून करा सोपे एक्सरसाइज...
१. Calf Raises :- Calf Raises एक्सरसाइज केल्याने पायाचे स्नायू मजबूत होऊन त्यांना बळकटी येण्यास अधिक मदत होते. आधी सरळ रेषेत पाठ ताठ ठेवून उभे राहावे. त्यानंतर आपले दोन्ही हात सरळ रेषेत वर उचलून समोर आणावे. जेव्हा तुम्ही हात उचलून वर आणता त्याचवेळी आपल्या तळपायांचे पंजे फोल्ड करून टाचा वरच्या दिशेने उचलून पंज्यावर जोर देऊन पंज्यावर उभे राहावे. परत आपले दोन्ही हात खाली घेताना पायाचे पंजे खाली ठेवत रिलॅक्स व्हावे. हा एक्सरसाइज १० ते १२ वेळा करावी. यामुळे पाय, टाचा आणि पोटऱ्यांचा एक्सरसाइज केला जाऊन त्यांना थोडा आराम मिळतो. जर हात समोर घेऊन शरीराचा तोल जात असेल तर आपण आपले दोन्ही हात कमरेवर देखील ठेवू शकता.
सामोसा-गुलाबजाम खाल्ले भरपूर तर तेवढ्या कॅलरी जाळायला तुम्हाला किती चालावं लागेल, माहिती आहे?
२. Knee Pushback :- Knee Pushback एक्सरसाइज केल्याने आपल्या गुढघ्यांना व पोटऱ्यांना आराम मिळतो. Knee Pushback करण्यासाठी आधी सरळ रेषेत पाठ ताठ ठेवून भिंतीच्या दिशेने तोंड करून उभे राहावे. त्यानंतर आपल्या हातांचे दोन्ही तळवे भिंतीला टेकवून, हात समोर ताठ सरळ रेषेत ठेवावेत. आता हातांच्या पंज्यावर जोर देत आपला एक पाय हळुहळु उचलून मागच्या दिशेने थोडा वर हवेत स्ट्रेच करत न्यावा. अशाप्रकारे एकामागून एक पाय असे करत. हा एक्सरसाइज १० ते १२ वेळा करून घ्यावा. यात गुढघा, पाय, टाचा यांवर थोडा हलकासा ताण येईल.
दिवाळी: पोटभर मिठाई खाल्ली तरी वजन वाढणार नाही, फक्त ३ टिप्स -मन मारायची गरजच नाही...
अशाप्रकारे आपण हे दोन सोपे एक्सरसाइज दिवसभरातील काम करता करता देखील अगदी सहजपणे करु शकता. यामुळे तासंतास काम करण्यासाठी उभं राहून देखील आपले पाय, टाचा दुखणार नाहीत.