बारीक होण्यासाठी काही लोक खूप मेहनत करतात तरीसुद्धा हवातसा परिणाम दिसून येत नाही. शरीराचं फॅट सुटतच राहते. याच फॅटच्या मदतीनं तुम्ही बारीक होऊ शकता. शरीरात २ प्रकारचे फॅट असतात. त्यातील एक प्रकार दुसऱ्या फॅटला कमी करण्याचे काम करतो. लाईफस्टाईल एक्सपर्ट ल्यूक कौटिनहो सांगतात की, शरीराचं फॅट ब्राऊन फॅट आणि व्हाईट फॅट असे विभागले जाते. ब्राऊन फॅटच्या मदतीनं व्हाईट फॅट कमी करून वेट लॉस करता येते. फॅट कोणत्या जागेवर असतात ते समजून घेऊ. (How To Activate Brown Fat For Weight Loss)
ब्राऊन फॅट कॅलरीज बर्न करून शरीराला गरम ठेवते. लहान मुलांच्या शरीरावर हे फॅट खूप असते आणि वयस्कर लोकांमध्ये थोडं कमी असते. जर तुमचे मान आणि खांद्याजवळ फॅट असेल तर व्हाईट फॅट कमी करण्यास मदत होते. व्हाईट फॅट पोट, मांड्या, कुल्हे आणि हातांना चिकटलेले असते. ज्यामुळे अनेक मेटाबॉलिक डिसॉर्डर्स होऊ शकतात. ब्राऊन फॅट एक बॉडी हिटर असून फॅट एनर्जी स्टोरेज त्यामुळे होते.
दिवाळीत कंदील, लाईटींगमुळे वीजबील जास्त येतं? ५ टिप्स, बील एकदम कमी येईल, खर्च वाचेल
एक्सपर्ट्सच्यामते ब्राऊन फॅट कॅलरीज बर्न करून हिट तयार करतात. जेव्हा ते एक्टिव्हेट होतात तेव्हा शरीर व्हाईट फॅट सेल्सकडून एनर्जी घेते. तुमचे ब्राऊन फॅट जितके एक्टिव्ह असेल तर व्हाईट फॅट तितकंच कमी होईल.
ब्राऊन फॅट एक्टिव्ह कसं कराल
५ ते ८ मिनिटं थंड पाण्यानं अंघोळ करा किंवा थंड एसीमध्ये राहा. ३० ते ४५ मिनिटं कार्डिओवॅस्क्युलर व्यायाम, हाय इंटरव्हल ट्रेनिंग किंवा वेट ट्रेनिंग, झोपण्याची आणि उठण्याची निश्चित वेळ ठेवा.
ब्राऊन फॅट सेल्सची ताकत वाढवणारे युसीपी १ युक्त फळं खा.
सकाळी उठल्यानंतर गरम प्यायल्यानं खरंच वजन कमी होतं का? पाहा यात कितपत तथ्य
कांदा, लाल मिरची, शेंगदाणे, ग्रीन टी, सोयाबीन, लिंबू, ताज्या हळदीचं पावडर, ड्राय ऑर्गेनो, सफरचंद, द्राक्ष, चेरी, फळं, ब्लू बेरी, ब्लॅक बेरी, पत्ता कोबी, शिजवलेला गाजर, शिजवलेला टोमॅटो, भोपळा, ब्लॅक कॉफी, अक्रोड, मशरूम, डाळिंब, स्ट्रोबेरी, ऑलिव्ह ऑईल, क्रुसिफेरस फुड्स, ओमेगा-३ फूड्स या पदार्थांचा आहारात समावेश करा.