Lokmat Sakhi >Fitness > गजर ठणाणा वाजतो तरी सकाळी लवकर उठवत नाही? अलार्म लावताना होणाऱ्या ३ चुका, बघा असा घोळ होतोय का?

गजर ठणाणा वाजतो तरी सकाळी लवकर उठवत नाही? अलार्म लावताना होणाऱ्या ३ चुका, बघा असा घोळ होतोय का?

3 Alarm Clock Mistakes Stopping You From Waking Up Early: सकाळी गजर होतोच तरी आपण ठरल्या वेळी उठत नाही, चिडचिड करतो नंतर, असं का होतं? नेमकं काय चुकतं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2023 03:52 PM2023-02-25T15:52:50+5:302023-02-25T16:04:13+5:30

3 Alarm Clock Mistakes Stopping You From Waking Up Early: सकाळी गजर होतोच तरी आपण ठरल्या वेळी उठत नाही, चिडचिड करतो नंतर, असं का होतं? नेमकं काय चुकतं?

3 Alarm Clock Mistakes Stopping You From Waking Up Early | गजर ठणाणा वाजतो तरी सकाळी लवकर उठवत नाही? अलार्म लावताना होणाऱ्या ३ चुका, बघा असा घोळ होतोय का?

गजर ठणाणा वाजतो तरी सकाळी लवकर उठवत नाही? अलार्म लावताना होणाऱ्या ३ चुका, बघा असा घोळ होतोय का?

सकाळी साखरझोपेतून जागे होणे म्हणजे सर्वात महाकठीण काम आहे, असेच म्हणावे लागेल. पहाटेच्या वेळी छान गाढ झोप लागलेली असताना उठून कामाला लागणं आपल्या जीवावर येतं. यासाठी आपल्यापैकी बऱ्याचजणांना सकाळी लवकर उठण्यासाठी अलार्म लावून झोपण्याची सवय असते. काहीजण तर संपूर्णपणे अलार्मच्याच भरवश्यावर असतात. आता मोबाईलमध्येच अलार्म लावण्याची सुविधा असल्यामुळे अलार्म लावणे देखील सोपे आणि सोयीचे झाले आहे. परंतु काही अंशी पहायला गेलं तर अलार्म लावून झोपणे ही सवय तशी वाईटच म्हणावी लागेल. सकाळी लवकर उठण्यासाठी आपण आपले स्वतःचे असे काहीच प्रयत्न न करता एका अलार्मवर अवलंबून असतो.

सकाळी लवकर उठण्यासाठी रात्री वेळेवर झोपण्याची शिस्त असणे आवश्यक आहे. आपल्याला दररोज कोणत्या वेळी उठायचे आहे आणि त्याच वेळी झोपायला जायचे आहे त्यानुसार आपली झोपण्याची वेळ निश्चित करावी. असे केल्यास आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अलार्मवर अवलंबून राहावे लागणार नाही. आपल्यापैकी काहीजण तर अलार्म लावून देखील वेळेवर उठत नाहीत. सकाळी लवकर उठण्यासाठी आपण अलार्म तर लावतोच पण अलार्म लावताना आपण ३ मोठ्या चुका करतो. याच चुकांमुळे आपण अलार्म लावून देखील सकाळी लवकर उठू शकत नाही. काय आहेत त्या ३ चुका पाहूयात(3 Alarm Clock Mistakes Stopping You From Waking Up Early).

अलार्म लावताना होणाऱ्या या ३ चुका टाळा... 


१. मोबाईलमध्ये अनेक अलार्म सेट करणे:- सध्याच्या मोबाईलमध्ये अलार्म लावण्याची सहज सोपी सुविधा असल्याकारणाने अलार्म लावणे सोपे झाले आहे. बरेचजण आजकाल अलार्म लावण्यासाठी घड्याळांचा वापर करण्यापेक्षा मोबाईल वापरणेच पसंत करतात. मोबाईलमध्ये अलार्म लावताना एकावेळी अनेक अलार्म एकत्रित लावू शकतो. मोबाईच्या या सुविधेचा आपण पुरेपूर वापर करून एकाच वेळी अनेक अलार्म लावतो. आपल्याला सकाळी निश्चित वेळा उठायचे असते परंतु आपण त्या वेळेसहित पुढील १० मिनिटे वाढवून त्या वेळेचाही अलार्म सेट करून ठेवतो. यामुळे निश्चित वेळच्या पुढे प्रत्येक १० मिनिटांनी हा मोबाईल अलार्म सतत वाजत राहतो. त्यामुळे आता नको पुढल्या अलार्मच्या वेळी उठू असे ठरवून आपण बराच काळ अंथरुणात झोपूनच राहतो. त्यामुळे निश्चित वेळेचा अलार्म सेट करूनही आपण वेळेवर उठू शकत नाही. यामुळे शक्यतो मोबाईलमध्ये उठण्याच्या निश्चित वेळेचा एकच अलार्म सेट करावा.  


 

२. मोबाईल अलार्म लावून स्वतःच्या जवळ ठेवू नका :- आपण रात्री झोपताना मोबाईलमध्ये अलार्म सेट करून मोबाईल, घड्याळ आपल्या उश्याशी ठेवून झोपतो. यामुळे मोबाईल अगदीच आपल्या हाताशी असल्याकारणाने तो अलार्म आपण लगेच बंद करु शकतो. मोबाईल अलार्म लगेच बंद केल्याने आपल्याला परत अंथरुणात झोपायचा मोह होतो. त्यामुळे शक्यतो अलार्म लावून मोबाईल आपल्या झोपण्याच्या ठिकाणापासून थोडा लांबच ठेवावा. जेणेकरून मोबाईल अलार्म  वाजल्याने आपल्याला जाग येईल व तो अलार्म बंद करण्यासाठी आपल्याला अंथरुणातून उठावे लागेल. एकदा का अंथरुणातून उठल्यावर आपली झोपमोड झाली की परत आपल्याला झोपायची इच्छा होणार नाही. यामुळे अलार्म लावून मोबाईल किंवा घड्याळ आपल्याला हाताशी लगेच लागेल इतक्या अंतरावर न ठेवता जरा लांबच ठेवावा.  


 

३. अलार्म म्हणून मोबाईलचा वापर टाळा :- अलार्म सेट करण्यासाठी शक्यतो मोबाईल वापरणे टाळा. रात्री झोपताना आपण मोबाईलमध्ये अलार्म सेट करुन मोबाईल लगेच आपल्या उश्याशी ठेवून देतो. मोबाईल आपल्या जवळच असल्याकारणाने वारंवार त्यात येणारे मेसेजेस, नोटिफिकेशन्स चेक करण्याचा आपल्याला मोह होतो. यामुळे आपण रात्रभर फोनचा वापर करतो. परंतु अशावेळी मोबाईल सारख्या इलेक्ट्रिनिक्स वस्तूमधून येणाऱ्या निळ्या लाइट्समुळे याचा आपल्या झोपेवर परिणाम होतो. इलेक्ट्रिनिक्स वस्तूमधून उत्सर्जित होणाऱ्या निळ्या लाइट्समुळे आपल्याला नैसर्गिकरित्या झोप आणणारे मेलॅटोनीन हार्मोन तयार होत नाही. परिणामी आपल्याला वेळेवर झोप येत नाही. यामुळे आपण अलार्म लावूनही सकाळी वेळेवर उठत नाही. यामुळे अलार्म लावण्यासाठी मोबाईलचा वापर करण्याऐवजी एखादे घड्याळ घेऊन त्यावर अलार्म लावावा.

Web Title: 3 Alarm Clock Mistakes Stopping You From Waking Up Early

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.