निरोगी आरोग्य आणि वजन घटवण्यासाठी (Weight Loss) पौष्टीक आहाराचे सेवन करणं गरजेचं आहे. वजन घटवताना फक्त व्यायाम नसून सकस आहार घेणं देखील गरजेचं आहे. वजन कमी करण्याचे अनेक फंडे आपण पाहिले असतील. काही उपायांमुळे वजन कमी होते तर, काही उपाय फेल ठरतात. तर अशा काही गोष्टी स्वयंपाकघरात आढळतात, जे वजन कमी करण्यास प्रभावी ठरतात. त्यातीलचं एक उपाय म्हणजे मेथी दाणे (Fenugreek Seeds).
आपल्या प्रत्येकाच्या घरात मेथी दाणे असतेच. मेथी दाण्यांचा वापर अनेक पदार्थांमध्ये केला जातो. मुख्य म्हणजे मेथी दाणे डायबिटिजग्रस्त (Diabetic Patients) रुग्णांसाठी फायदेशीर ठरते. मेथीच्या छोट्याशा दाण्यांमध्ये पोषण तत्त्वांची मात्रा भरपूर असते. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. मेथी दाण्यांचा वापर वजन कमी करण्यासाठी कसा करावा पाहूयात(3 Best Ways To Use Methi Dana For Quick Weight Loss).
मेथी दाणे खाण्याचे फायदे
ऑन्ली माय हेल्थ या वेबसाईटनुसार, वजन कमी करण्यासाठी मेथीचे दाणे खूप फायदेशीर मानले जाते. त्यात लोह, फायबर, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन डी सारखे पौष्टीक घटक असतात. मेथीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. ज्यामुळे मेटाबॉलिज्म बुस्ट होते. त्यामुळे खाल्लेलं अन्न व्यवस्थितरीत्या पचते. शिवाय वजन कमी करण्यास मदत होते. मुख्य म्हणजे त्यातील गुणधर्मांमुळे ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहते.
वजन कमी करण्यासाठी मेथी दाण्याचे कसे सेवन करावे?
मेथीचा चहा
दूध-साखरेचा चहा पिण्याव्यतिरिक्त आपण मेथीचा चहा पिऊ शकता. मेथीचा चहा करण्यासाठी एका पॅनमध्ये एक चमचा मेथीचे दाणे घ्या आणि त्यात दालचिनीचा तुकडा घाला. नंतर त्यात एक ग्लास पाणी घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. चहाच्या गाळणीने गाळून सकाळी चहा रिकाम्या पोटी प्या.
मोड आलेले मेथी दाणे
आपण आपल्या आहारात मोड आलेल्या मेथी दाण्यांचा समावेश करू शकता, यासाठी रात्रभर पाण्यात मेथी दाणे भिजत ठेवा. सकाळी सॅलॅडमध्ये मेथी दाणे मिक्स करून खा.
मेथी आणि मध
मेथीसह मध देखील वजन कमी करण्यास मदत करते. मधामधील गुणधर्म वजन कमी करण्यास मदत करते. यासाठी मेथी दाण्याची पावडर तयार करा. त्यात मध मिसळून दररोज खा. नंतर कोमट पाणी प्या. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होईल.