Join us  

सूर्यनमस्कार घालताना तुम्हीही नकळत ३ चुका करता का? वाचा तज्ज्ञांचा सल्ला, तरच होईल नमस्काराचा फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2023 4:55 PM

3 Common Mistakes While Doing Surya Namaskar: सूर्यनमस्कार घालताना तुमच्याकडूनही या चुका होत नाहीत ना, हे एकदा तपासून बघायला हवं. त्यासाठी सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी शेअर केलेली ही माहिती एकदा नक्की वाचा....

ठळक मुद्देसुर्यनमस्कार घालून शरीराला फायदे होण्याऐवजी तोटा हाेऊ शकतो. म्हणूनच याविषयीचा एक महत्त्वाचा व्हिडिओ....

सूर्यनमस्कार हा एक पूर्ण व्यायाम (exercise) म्हणून ओळखला जातो. म्हणजे त्याचा अर्थ असा की सूर्यनमस्कार (Surya Namaskar) करताना आपल्या संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. ज्यांना व्यायाम करायला अजिबातच वेळ नाही, अशा लोकांनी सूर्यनमस्कार घातले तरी ते फायदेशीर ठरते. पण नेमकं सूर्यनमस्कार घालतानाच आपण चुकत तर नाही ना? हे एकदा तपासून घ्यायला हवं (3 Common mistakes while doing surya namaskar). नाहीतर सुर्यनमस्कार घालून शरीराला फायदे होण्याऐवजी तोटा हाेऊ शकतो. म्हणूनच याविषयीचा एक महत्त्वाचा व्हिडिओ सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Guidance by Rujuta Divekar) यांनी शेअर केला आहे.

 

सुर्यनमस्कार घालताना हाेणाऱ्या ३ सामान्य चुका१. सूर्यनमस्कार घालताना होणाऱ्या चुकांविषयी ऋजुता दिवेकर सांगतात की सूर्यनमस्कारातील जी तिसरी स्टेप आहे, त्यामध्ये आपण खाली वाकतो.

साध्या स्वस्त साड्या नेसून दिसा स्टायलिश! बघा आलिया भटचे ८ सुंदर लूक

वाकल्यानंतर खांदे कानांच्याजवळ ओढून धरतो किंवा तसा प्रयत्न करतो. तसे करणे टाळावे. खांदे चेहऱ्याजवळ ओढून घेऊ नयेत. ते ताठ ठेवावेत. तसेच पाय गुडघ्यातून वाकू देऊ नयेत आणि तळहात जमिनीला पूर्णपणे टेकविण्याचा प्रयत्न करावा.

 

२. दुसरी चूक सूर्यनमस्कारातील चौथी स्टेप करताना होते. यामध्ये दोन्ही तळहात आणि तळपाय जमिनीला टेकलेले असतात. ही स्टेप करताना हिप्सचा भाग एक तर खूप खाली झुकवला जातो किंवा मग गरजेपेक्षा जास्त वर ओढला जातो. असे करणे टाळावे. ही स्टेप करताना शरीर तिरक्या रेषेत असावे. 

फोटो काढताना सुटलेलं पोट कसं लपवायचं? पाहा ३ टिप्स, इंस्टाग्रामवर मिळतील चिक्कार लाइक्स

३. तिसरी चूक सूर्यनमस्कारातील पाचवी किंवा आठवी  स्टेप करताना होते. यामध्ये पुन्हा एकदा आपण खांदे कानाजवळ ओढण्याचा प्रयत्न करतो. तसे करणे टाळावे. हिप्सचा भाग शक्य तेवढा वर उचलून धरावा. पाय गुडघ्यात वाकवू नयेत.

 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामयोगासने प्रकार व फायदे