Lokmat Sakhi >Fitness > महिलांनी रोज न चुकता फक्त ५ मिनिटं करायला हवी फक्त ३ योगासनं, तब्येतीच्या कुरकुरी-चिडचिड होईल कमी

महिलांनी रोज न चुकता फक्त ५ मिनिटं करायला हवी फक्त ३ योगासनं, तब्येतीच्या कुरकुरी-चिडचिड होईल कमी

3 Easy Exercises yoga asana for good health of women Fitness tips : केवळ ५ ते ७ मिनीटे वेळ लागत असल्याने जाता येताही ही आसने आपण सहज करु शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2023 03:01 PM2023-10-05T15:01:35+5:302023-10-05T15:42:19+5:30

3 Easy Exercises yoga asana for good health of women Fitness tips : केवळ ५ ते ७ मिनीटे वेळ लागत असल्याने जाता येताही ही आसने आपण सहज करु शकतो.

3 Easy Exercises yoga asana for good health of women Fitness tips : Do 3 yoga poses in just 5 minutes without fail every day; Always stay fit and fine | महिलांनी रोज न चुकता फक्त ५ मिनिटं करायला हवी फक्त ३ योगासनं, तब्येतीच्या कुरकुरी-चिडचिड होईल कमी

महिलांनी रोज न चुकता फक्त ५ मिनिटं करायला हवी फक्त ३ योगासनं, तब्येतीच्या कुरकुरी-चिडचिड होईल कमी

महिला दिवसभर विविध प्रकारची कामं करत असतात. झोपेतून उठल्यापासून घराची साफसफाई, स्वयंपाक, नोकरी, बाहेरची कामं अशा एक ना अनेका पातळ्यांवर त्या लढत असतात. हे सगळे करताना त्यांना स्वत:च्या व्यायामासाठी अजिबात वेळ मिळत नाही. घरातली कामं म्हणजे व्यायाम मुळीच नाही. योगासने, सूर्यनमस्कार किंवा किमान चालणे अशाप्रकारचा व्यायाम तरी करायलाच हवा हे आपल्याला अनेकदा जाणवते पण वेळेचे गणित जमत नसल्याने खूप ठरवूनही आपण व्यायामाला वेळ देऊ शकत नाही. वयाच्या चाळीशीपर्यंत आपण करिअर, संसार या गोष्टींमागे धावत राहतो. पण आपल्याला वयाच्या विशिष्ट टप्प्यानंतरही फिट राहायचं असेल तर रोज न चुकता किमान ३ आसने जरुर करायला हवीत. या आसनांसाठी केवळ ५ ते ७ मिनीटे वेळ लागत असल्याने जाता येताही ही आसने आपण सहज करु शकतो. हाडांचे कार्य, शरीराचा एकूण फिटनेस जपण्यासाठी या आसनांचा अतिशय चांगला उपयोग होतो. ही आसने कोणती, ती कशी करायची आणि त्याचे आपल्याला काय काय फायदे होतात याविषयी (3 Easy Exercises yoga asana for good health of women Fitness tips)...

१. उत्कटकोनासन

दोन्ही पायांमध्ये भरपूर अंतर घेऊन पायाची पावले बाहेरच्या बाजूला वळवायची. हात दंडातून बाहेर काढून जमिनीला समांतर ठेवायचे आणि कोपरात दुमडून कानाच्या रेषेत सरळ ठेवायचे. कंबरेतून आणि गुडघ्यातून खाली वाकायचे मात्र पाठ ताठ राहील असे पाहायचे. 

(Image : Google )
(Image : Google )

फायदे 

१. पेल्विक फ्लोर मजबूत होण्यास मदत होते
२. मासिक पाळीच्या तक्रारी दूर होतात
३. पाय आणि मांड्यांच्या स्नायूंची ताकद वाढण्यास मदत होते

२. मलासन

मलासन म्हणजे दोन्ही पायांच्या तळव्यावर खाली बसणे होय. या आसनात चालण्याचा सराव करायला हवा. बराच वेळ या आसनात बसल्यानंतर गुडघे, पोटऱ्या यांना कळ लागते. दोन्ही हात समोर घेऊन या आसनात चालण्याचा प्रयत्न करावा. 

(Image : Google )
(Image : Google )

फायदे

१. पचनशक्ती सुधारण्यास मदत होते
२. प्रजननसंस्थेतील अडथळे दूर होण्यास मदत 
३. पायांची ताकद वाढून ते मजबूत होण्यास मदत

३. बद्धकोनासन

हे आसन म्हणजेच आपण करतो ती बटरफ्लाय पोज. पायाचे तळवे एकमेकांना जोडून ठेवून गुडघे जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. तळवे पुढे सरकू नयेत म्हणून ते हाताने घट्ट धरुन ठेवायचे. मांड्या सतत हलवत राहिल्याने पायांचा चांगला व्यायाम होतो. 

(Image : Google )
(Image : Google )

फायदे - 

१. मन शांत होते.
२. मूत्राशय आणि गर्भाशय यांचे आरोग्य सुधारते. 
३. लवचिकता सुधारण्यास मदत होते. 

Web Title: 3 Easy Exercises yoga asana for good health of women Fitness tips : Do 3 yoga poses in just 5 minutes without fail every day; Always stay fit and fine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.