Join us  

कंबर - नितंबावरील चरबी वाढली? ३ सोपी योगासने नियमित, बेढब शरीर होईल सुडौल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2023 11:55 AM

3 Effective Yoga Asanas To Tone Your Buttocks शरीर सडपातळ, पण कंबर - नितंबाची चरबी कमी होत नाही? करून पाहा हे ३ योगासने..

पोट आणि मांड्यांप्रमाणेच नितंबांवरही चरबी झपाट्याने वाढते. ज्याला हिप फॅट देखील म्हणतात. अशा प्रकारच्या चरबीचा महिलांना जास्त त्रास होतो. ही वाढती चरबी कमी करायची असेल तर, काही योगासने करा. या ३ सोप्या योगासनाच्या मदतीने आपण हिप्सची चरबी कमी करू शकता.

आहारतज्ञ मानसी पडेचियाच्या मते, ''हे ३ योगासन शरीराच्या खालच्या भागासाठी खूप चांगले आहेत, ज्यामुळे केवळ नितंबांवरच नव्हे तर, मांड्यांवरची चरबी कमी होण्यास मदत होईल. नियमित व्यायाम केल्याने शरीराचा खालचा भाग सडपातळ होईल, यासह स्नायूही मजबूत होतील''(3 Effective Yoga Asanas To Tone Your Buttocks).

हिप फॅट कमी करण्यासाठी योगा

देवियासन

देवी मुद्रा, या आसनाला देवियासन म्हणूनही ओळखले जाते, हे आसन नितंब, गुडघे आणि घोट्याला बळकट बनवते. यासाठी पाय तुमच्या कमरेपेक्षा रुंद करून उभे रहा. आता हात पायांच्या दोन्ही बाजूला ठेवा. यानंतर, कंबर सरळ ठेवून, मांड्या जमिनीला समांतर येईपर्यंत नितंब खाली आणा. या दरम्यान, हात डोक्याच्या अगदी वर घ्या आणि तळवे जोडा. ही प्रक्रिया २० वेळा पुन्हा करा, व असे ५ सेट करा. प्रत्येक सेट दरम्यान सुमारे २० सेकंद पोझ धरा.

सुष्मिता सेनचे डॉक्टर सांगतात, व्यायाम आठवड्यातून किती दिवस आणि कधी करावा?

अंजनेयासन

यामध्ये एक पाय पुढे आणि दुसरा पाय शरीराच्या मागे ठेवा. जसे आपण चालत आहात, आता पुढचा गुडघा वाकवा आणि मागचा गुडघा वाकवून जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. हे आसन प्रत्येक पायाने २० वेळा करा आणि त्याचे ३ सेट करा.

‘मला व्हायचं होतं फिट म्हणून..’ लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात वजन कमी करणारी आलिया भट सांगते..

सेतुबंधासन

सेतुबंधासन करण्यासाठी पाठीवर जमिनीवर झोपा. दोन्ही हात बाजूला ठेवा. तळवे नितंबांच्या जवळ आणा आणि गुडघे आकाशाच्या दिशेने वर करा. यानंतर, नितंब शक्य तितक्या उंच करा, नंतर खाली आणा. असे ३० वेळा करा, व याचे ५ सेट करा. प्रत्येक सेट दरम्यान सुमारे २० सेकंद पोझ धरा.

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामहेल्थ टिप्सआरोग्य