शरीरावरची वाढत जाणारी चरबी सगळ्यात आधी दिसून येते ती पोटावर, मांड्यांवर आणि कंबरेवर (belly fat, thigh fat and waist fat). सर्वात आधी पोटाचा, कंबरेचा घेर वाढत जातो आणि त्यानंतर दंड, मांड्या असं सगळंच जाड होत जातं. काही जणांकडे व्यायाम करण्यासाठी खरंच वेळ नसतो, तर काही जण मात्र वेळ असूनही व्यायामाचा कंटाळा करतात. यापैकी कोणतंही कारण का असेना, पण जर तुम्हाला पोट, कंबर आणि मांड्यांवरची चरबी कमी करायची असेल, तर हे काही व्यायाम (Exercise) करून बघा. यामुळे पोट, कंबर, मांड्या याठिकाणचा इंचेस लॉस होण्यास तर मदत होईलच. पण दंडावरची चरबी कमी करण्यासाठीही हा व्यायाम फायदेशीर ठरेल (How to reduce belly fat and thigh fat).
पोट, कंबर आणि मांड्यांवरची चरबी कमी करण्यासाठी व्यायाम
हे तिन्ही व्यायाम इन्स्टाग्रामच्या nehafunandfitness या पेजवर शेअर करण्यात आले आहे. हे तिन्ही व्यायाम आपल्याला उभे राहूनच करायचे आहेत.
श्रावणात उपवास करताय पण ५ गोष्टी लक्षात ठेवा, उपवास होतील सोपे- आणि वाढेल फिटनेस
१. पहिला व्यायाम
हा व्यायाम करण्यासाठी सगळ्यात आधी दोन्ही हात कोपऱ्यातून वाकवून वर घ्या. हाताचा तळवा जमिनीच्या दिशेने असावा आणि हात साधारणपणे कंबरेच्या बरोबरीने असावेत. आता उजवा पाय उचला आणि त्याचा तळवा डाव्या हाताला लावा. नंतर डावा पाय उचलून त्याचा तळवा उजव्या पायाला लावा. असे एकानंतर एक १०० वेळा करा. २५- २५ चे ४ सेट करून व्यायाम केला तरी चालेल.
२. दुसरा व्यायाम
हा व्यायाम करण्यासाठी पाय गुडघ्यातून वाकवून वर उचलावा. पाय तसाच वर ठेवून दोन्ही हात एकाच वेळी मांडीखाली घेऊन एकमेकांना जुळवावेत. हा व्यायामही एकानंतर एका पायाने याप्रमाणे १०० वेळा करावा.
नागपंचमीच्या नैवैद्यासाठी गव्हाची खीर करताना लक्षात ठेवा ५ सोप्या गोष्टी; खीर होईल परफेक्ट
३. तिसरा व्यायाम
हा व्यायाम करण्यासाठी दोन्ही हातांचे तळवे डोक्याच्या मागच्या बाजुने लावावेत. डावा पाय गुडघ्यातून वाकवून वर उचलावा. त्याचवेळी उजव्या हाताचा कोपरा डाव्या पायाच्या गुडघ्याला लावावा. असेच उजवा पाय आणि डाव्या हातानेही करावे. हा व्यायामही १०० वेळा करावा. २५- २५ चे ४ सेट करून व्यायाम केला तरी चालेल.