Join us  

पार्लरमध्ये न जाता, मेकअप न करताही दिवाळीत येईल चेहऱ्यावर ग्लो, ३ फेशियल एक्सरसाईज, दिसाल सुंदर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2023 4:04 PM

3 Facial Exercises poses for instant festive glow : चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो हवा असेल तर फेशियल व्यायाम करणे अतिशय फायदेशीर ठरते...

सणवार म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खरेदी आणि आपलं दिसणं. सणावाराला एकमेकांकडे जाताना आपण सुंदर दिसावं असं प्रत्येकाला वाटतं. म्हणूनच दसरा, दिवाळीच्या काळात एकतर आपल्या पार्लरच्या फेऱ्या वाढतात किंवा आपण मेकअपची उत्पादने मोठ्या प्रमाणात खरेदी करतो. पण हे दोन्हीही तात्पुरते उपाय असून त्याचा दिर्घकाळ फायदा होतोच असे नाही. आठवडाभरात पार्लरचा इफेक्ट कमी होतो आणि काही तासांत मेकअपही जातो. पण कायमसाठी चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो हवा असेल तर फेशियल व्यायाम करणे अतिशय फायदेशीर ठरते. आता हे व्यायाम करायचे म्हणजे नेमकं काय, ते कसे करायचे आणि त्याचा कसा फायदा होतो हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. ‘द योगिनी वर्ल्ड’ या इन्स्टाग्राम पेजच्या माध्यमातून जूही कपूर आपल्याला याविषयीच अतिशय महत्त्वाची माहिती देतात. त्या नेमके काय सांगतात पाहूया (3 Facial Exercises poses for instant festive glow)...

१. कानाच्या वरच्या बाजूला डोक्याला हाताच्या तळव्याने दोन्ही बाजूला धरुन तोंडाचा चंबू करायचा.हा चंबू बंद न करता शून्य आकडा दिसेल असा उघडा ठेवायचा. यामुळे चेहऱ्याचे स्नायू ताणले जातात आणि त्यांना ताण पडल्याने नकळत चेहऱ्याचा व्यायाम होतो. 

२. तोंडाच्या आतून जीभ गोलाकार फिरवायची आणि त्याचवेळी डोळ्याची बुबुळेही गोलाकार फिरवायची. हो दोन्ही बाजुने केल्यास अगदी कपाळापासून ते हनुवटीपर्यंत बऱ्याचशा स्नायूंचा व्यायाम होतो. हे व्यायाम दिवसातून ५ ते ६ मिनीटे आवर्जून केल्यास त्याचा रक्तप्रवाह सुरळीत होण्यासही अतिशय चांगला फायदा होतो. 

३. मान वर करायची आणि मासा पाण्यात ज्याप्रमाणे तोंडाची हालचाल करतो त्याप्रमाणे तोंडाची हालचाल करायची. याला हवेत चुंबन घेणे असेही म्हणू शकतो. रोज हा व्यायाम साधारण ३० वेळा जरुर करावा. यामुळे चेहऱ्याचे स्नायू बळकट होण्यास मदत होते आणि त्वचाही टोन होण्यास याचा चांगला उपयोग होतो.  

टॅग्स :फिटनेस टिप्सब्यूटी टिप्सव्यायाम