योग फक्त शारीरिक नाही तर मानसिक स्थिती देखील स्थिर ठेवण्यास मदत करते. त्यातलेच हे एक सोपे मात्र अत्यंत परिणामकारक आसन. म्हणजेच भुजंगासन. हे आसन केल्यानं लठ्ठपणा कमी होतो. पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी खूप उपयुक्त ठरलेला आहे. भुजंग म्हणजे साप/ नाग. त्यामुळे भुजंगासनाला 'सर्पासन, कोबरा आसन किंवा सर्प मुद्रा' असेही म्हटले जाते. या आसनामध्ये प्रथम पोटावर झोपून नंतर पाठ वर वाकवावी. दिवाळीत फराळ आणि गोड पदार्थ खाऊन अनेकांचं डायट ढिलं पडलेलं आहे. या कारणामुळे अनेकांना पोटाच्या निगडीत समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे भुजंगासन करा. फायदाच होईल.
भुजंगासन करण्याचे फायदे
भुजंगासन विशेषतः वजन आणि अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते. यासह स्नायूंची ताकद आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी फायदेशीर ठरलेलं आहे. या आसनाच्या सरावाने मेटाबॉलिझमलाही चालना मिळते, कॅलरीज बर्न होतात. याव्यतिरिक्त, अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी आणि पाठीच्या स्नायूंना टोन करण्यासाठी आणि पाठदुखीपासून आराम देण्यासाठी भुजंगासन उत्तम मानला जातो.
भुजंगासन या योगाच्या नियमित सरावाने गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सारख्या समस्येपासून आराम मिळू शकतो. या आसनाच्या नियमित सरावाने पचनसंस्थेची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे पोटाच्या अनेक समस्यांवर हे आसाम प्रभावी ठरू शकते. ज्या लोकांना बद्धकोष्ठता किंवा पोटाशी संबंधित समस्या आहेत, अशा लोकांनी दररोज भुजंगासन केले पाहिजे.
योगासन वजन कमी करण्यास, मन स्थिर ठेवण्यास आणि शरीरात लवचिकता निर्माण करते. रक्ताभिसरण चांगले होते.. ज्या लोकांना पाठदुखीचा त्रास आहे त्यांना या योगाच्या सरावाने विशेष फायदा होऊ शकतो. या आसनामुळे पाठदुखी कमी होते. भुजंगासनाचा नित्यक्रमात समावेश करणे आरोग्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.