चाळिशीनंतरच्या बऱ्याच महिलांना व्हेरीकोज व्हेन्सचा त्रास जाणवतो. काही महिलांना गरोदरपणातही व्हेरीकोज व्हेन्सचा त्रास सुरू होतो, पण बाळंतपणानंतर तो कमी होतो. पण हल्ली तर असं दिसून येत आहे की अगदी पंचविशीतल्या तरुण महिलांनाही हा त्रास जाणवतो आहे. शरीराच्या रक्ताभिसरण क्रियेमध्ये अडथळा आल्यास व्हेरीकोज व्हेन्सचा त्रास सुरू होतो. आपल्या शरीरातले रक्त हृदयाकडे आणि हृदयाकडून पुन्हा शरीराच्या सगळ्या भागात प्रवाहीत होत असते, हे आपल्याला माहिती आहेच. पायाकडून जे रक्त हृदयाकडे जाते ते पुन्हा उलट मागे येऊ नये म्हणून रक्तवाहिन्यांना काही झडपा असतात. त्यांचे कार्य नीट झाले नाही तर रक्त साठण्याची सुरुवात होते आणि मग हळूहळू व्हेरिकोज व्हेन्सची लक्षणे दिसू लागतात. (how to reduce varicose veins problem?). हा त्रास नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या टाळाव्या ते पाहूया..(3 important rules for the people suffering from varicose veins)
व्हेरीकोज व्हेन्सचा त्रास होऊ नये म्हणून उपाय
व्हेरीकोज व्हेन्सचा त्रास होऊ नये म्हणून काय उपाय करावा याविषयीची माहिती योग अभ्यासकांनी theyoginiworld या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी ३ गोष्टी कटाक्षाने टाळायला सांगितल्या आहेत.
डॉ. श्रीराम नेनेंचा सल्ला, हिवाळ्यात आजारी पडायचं नसेल तर करा ५ गोष्टी -सर्दी खोकला होणार नाही
१. पाय लाेंबकळते ठेवणे
व्हेरीकोज व्हेन्सचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी बराच वेळ पाय लाेंबकळत ठेवू नयेत. पायांच्या खाली काहीतरी उंच ठेवून त्यावर पाय ठेवावे किंवा मग शक्य असेल तर सरळ पाय पसरून बसावे.
२. जास्त वेळ उभे राहू नये
जास्त वेळ उभे राहिल्यामुळेच खरेतर व्हेरीकोज व्हेन्सचा त्रास होतो. त्यामुळे जास्त वेळ एकाच स्थितीमध्ये पाय ठेवून उभे राहणे टाळावे. उभे राहाणे गरजेचेच असेल तर थोड्या थोड्या वेळाने पायाची हालचाल करावी.
पेरू भाजून खाण्याचे फायदे माहिती आहेत? बघा पेरू खाण्याची खास पद्धत- वजन उतरेल भराभर
पायाची बोटे हलवावी. तळपाय हलवून गोलाकार फिरवावा. पाय गुडघ्यातून वाकवून त्याची थोडी हालचाल करावी.
३. मांडी घालून बसे नये
व्हेरीकोज व्हेन्सचा त्रास असणाऱ्या लोकांनी जास्त वेळ मांडी घालून बसणे टाळावे. तसेच पायाच्या बोटांची हालचाल करणे, तळपायाची हालचाल करणे आणि पायांचे इतर व्यायाम नियमितपणे करावे.