Lokmat Sakhi >Fitness > How To Increase Fitness: फिटनेस वाढवायचा तर ३ गोष्टींकडे मुळीच दुर्लक्ष नको, व्यायाम, आहाराप्रमाणेच हे 'त्रिकुट' फार महत्त्वाचे

How To Increase Fitness: फिटनेस वाढवायचा तर ३ गोष्टींकडे मुळीच दुर्लक्ष नको, व्यायाम, आहाराप्रमाणेच हे 'त्रिकुट' फार महत्त्वाचे

Fitness Tips: फिटनेस टिकवायचा, वाढवायचा असेल तर डाएट, व्यायाम याकडे आपण लक्ष देताेच.. पण त्यासोबतच या ३ गोष्टीही अतिशय आवश्यक आहेत.. त्या सांभाळल्या तरच फिटनेस वाढेल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2022 06:58 PM2022-03-30T18:58:14+5:302022-03-30T18:58:55+5:30

Fitness Tips: फिटनेस टिकवायचा, वाढवायचा असेल तर डाएट, व्यायाम याकडे आपण लक्ष देताेच.. पण त्यासोबतच या ३ गोष्टीही अतिशय आवश्यक आहेत.. त्या सांभाळल्या तरच फिटनेस वाढेल...

3 Important things for improving fitness level along with diet and regular workout | How To Increase Fitness: फिटनेस वाढवायचा तर ३ गोष्टींकडे मुळीच दुर्लक्ष नको, व्यायाम, आहाराप्रमाणेच हे 'त्रिकुट' फार महत्त्वाचे

How To Increase Fitness: फिटनेस वाढवायचा तर ३ गोष्टींकडे मुळीच दुर्लक्ष नको, व्यायाम, आहाराप्रमाणेच हे 'त्रिकुट' फार महत्त्वाचे

Highlightsफिटनेस लेव्हल वाढवायची असेल तर केवळ व्यायाम आणि आहार या दोन गोष्टींकडेच फोकस करून चालणार नाही.

आरोग्याच्या तक्रारी कमी वयातच सुरू झालेल्या अनेक व्यक्ती आपण आपल्या आजुबाजूला बघत असतो. त्यामुळे त्यांचं पाहून अनेक जण स्वत:च्या फिटनेसबाबत जागरूक झाले आहेत किंवा होत आहेत, ही खरोखरंच एक सकारात्मक बाब आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात तर प्रत्येक बाबतीत एवढी स्पर्धा वाढली आहे की त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी, इतरांच्या बरोबरीने धावण्यासाठी आपल्याला आपला फिटनेस सांभाळणं, वाढवणं गरजेचंच आहे. पण फिटनेस लेव्हल वाढवायची असेल तर केवळ व्यायाम आणि आहार या दोन गोष्टींकडेच फोकस करून चालणार नाही. (5 important things for improving fitness)

 

सामान्यपणे फिटनेस लेव्हल वाढवायची म्हणजे एकतर तुमचं रेग्युलर वर्कआऊट महत्त्वाचं आणि दुसरं म्हणजे तुमचा आहार व्यवस्थित हवा, असं आपल्याला वाटत असतं. पण या २ गोष्टींमध्येच तुमचा फिटनेस दडलेला नसतो. हे तर कराच, पण त्यासोबत आणखीही ३ गोष्टींकडे लक्ष द्या. व्यायाम आणि आहार या जोडीला जेव्हा या ३ गोष्टी सांभाळाल, तेव्हाच तुमची फिटनेस लेव्हल खऱ्या अर्थाने वाढते आहे, असं म्हणता येईल. 

 

फिटनेस लेव्हल वाढवायची तर ३ गोष्टीही सांभाळा..
१. झोपण्याची, उठण्याची वेळ..

आपण व्यायाम करतो, डाएटिंग आपलं एकदम मस्त आणि शिस्तीत सुरू आहे... मग थोडं नाईट लाईफ एन्जॉय केलं किंवा सकाळी आरामात उठलं तर काय बिघडलं. असा अनेक तरुणाईचा समज असतो. पण दररोज रात्री ११- १२ वाजता किंवा त्याही नंतर झोपण्याची सवय असेल तर ती चुकीची आहे. अपूरी झोप फिटनेस लेव्हल झपाट्याने खाली आणते. ७ ते ८ तासांची रात्रीची झोप अतिशय आवश्यक आहे.

 

२. भरपूर पाणी प्या...
या बाबतीत अनेकांचं गणित हुकतं.. प्रोटीन शेक किती प्यायचा, याचं अचूक माप आपण फिटनेस ट्रेनरकडून आणलेलं असतं. पण पाणी पिण्याचं मात्र अनेकांच्या लक्षात राहत नाही. त्यामुळे भरपूर पाणी प्या. यामुळे शरीरातील टॉक्झिन्स शरीराबाहेर टाकले जातात, शरीर स्वच्छ होतं, हायड्रेटेड राहतं आणि फिटनेस लेव्हल वाढते. 

 

३. व्यायामात बदल
जे लोक जिममध्ये न जाता मनाने व्यायाम करतात, त्यांचं रोजचं व्यायामाचं रुटीन ठरलेलं असतं. त्यात ते फार बदल करत नाहीत. पण फिटनेस वाढवायचा असेल, तर नेहमी वेगवेगळे व्यायाम करून पाहिले पाहिजेत. त्यामुळे शरीराला एकसारख्या व्यायामाची सवय होत नाही. व्यायामाच्या बदलांनुसार शरीर आपोआपच अधिक फिट होत जातं. 


 

Web Title: 3 Important things for improving fitness level along with diet and regular workout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.