Lokmat Sakhi >Fitness > पाठीला बाक येतोय? बॉडी पोश्चर सुधारण्यासाठी ३ महत्त्वाची आसनं.. लहान मुलांसाठीही उपयुक्त 

पाठीला बाक येतोय? बॉडी पोश्चर सुधारण्यासाठी ३ महत्त्वाची आसनं.. लहान मुलांसाठीही उपयुक्त 

Yoga For Improving Body Posture: चुकीच्या पद्धतीने बसलं, उठलं की हळूहळू शरीरालाही तशीच सवय लागते आणि मग पाठीला बाक (curve to spine) येऊन बॉडी पोश्चर बदलू लागतं. म्हणूनच योग्य वेळी नियमितपणे ही ३ आसनं करायला लागा आणि बॉडी पोश्चर सुधारा.(change in body posture)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2022 01:01 PM2022-06-15T13:01:49+5:302022-06-15T13:02:49+5:30

Yoga For Improving Body Posture: चुकीच्या पद्धतीने बसलं, उठलं की हळूहळू शरीरालाही तशीच सवय लागते आणि मग पाठीला बाक (curve to spine) येऊन बॉडी पोश्चर बदलू लागतं. म्हणूनच योग्य वेळी नियमितपणे ही ३ आसनं करायला लागा आणि बॉडी पोश्चर सुधारा.(change in body posture)

3 Important yoga poses to improve your body posture, also very important for school students | पाठीला बाक येतोय? बॉडी पोश्चर सुधारण्यासाठी ३ महत्त्वाची आसनं.. लहान मुलांसाठीही उपयुक्त 

पाठीला बाक येतोय? बॉडी पोश्चर सुधारण्यासाठी ३ महत्त्वाची आसनं.. लहान मुलांसाठीही उपयुक्त 

Highlightsस्वत:च्या किंवा मुलांच्या बाॅडी पोश्चरमध्ये जर बदल दिसू लागला असेल तर वेळीच तो ओळखा आणि ही काही आसनं नियमितपणे करा.

ऑफिसमध्ये कॅम्प्युटरवर काम करताना किंवा लॅपटॉपवर काम करताना अनेक जण खूप चुकीच्या पद्धतीने बसतात. तासनतास एकाच अवस्थेत बसल्याने मग शरीरालाही हळूहळू तशीच सवय लागते. आजकाल तर अनेक लहान मुलांच्या बाबतीतही बॉडी पोश्चर (how to improve body posture) बिघडल्याचं दिसून येतं. मध्यंतरी कोरोनामुळे शाळा बंदच होत्या. त्यामुळे पाठीला दप्तर लावून शाळेत जाण्याची सवय मोडलेली होती. आता पाठीवर दप्तराचा भार आला की आपोआपच मुलांची चाल आणि त्यांची उभं राहण्याची पद्धत बदललेली दिसू लागली आहे. हेच जर सातत्याने होत राहिलं तर मुलं वाकून चालू लागतात आणि लहानपणीच त्याचं बॉडी पोश्चर बिघडतं.(yoga for improving body posture)

 

एकदा शरीराला वाकून चालण्याची, उभं राहण्याची किंवा तसंच वाकून बसण्याची सवय झाली की ती सवय मोडणं मग महाकठीण काम होऊन जातं. त्यामुळे स्वत:च्या किंवा मुलांच्या बाॅडी पोश्चरमध्ये जर बदल दिसू लागला असेल तर वेळीच तो ओळखा आणि ही काही आसनं नियमितपणे करा. या आसनांमुळे बॉडी पोश्चर सुधारण्यास मदत तर होतेच, पण आणखी काही आरोग्यदायी फायदेही नक्कीच होतात. हे आसनप्रकार इन्स्टाग्रामच्याsmriti.yoga या पेजवर शेअर करण्यात आले आहेत. ऑफिस चेअर योगा, आता ऑफिसमध्ये खुर्चीवर बसल्या बसल्या करा ३ योगासनं, सांगू नका कारणं

 

बॉडी पोश्चर सुधारण्यासाठी आसनं
१. गोमुखासन (Gomukhasana)

पाठीला आलेला बाक कमी करण्यासाठी गोमुखासन खरोखरंच अतिशय उपयुक्त ठरतं. तुम्ही बसल्या- बसल्या किंवा मग उभे राहून कसे ही तुमच्या सोयीनुसार हे आसन करू शकता. गोमुखासन करण्यासाठी सगळ्यात आधी पाठीचा कणा ताठ राहील अशा पद्धतीने बसा किंवा उभे रहा. यानंतर उजवा हात वर करा आणि कोपऱ्यातून वाकवून पाठीवर घ्या. तसेच डावा हातही कोपऱ्यातून वाकवा आणि पाठीवर घ्या. डाव्या हाताने उजव्या हाताची बोटे पकडण्याचा प्रयत्न करा. असे करताना चेहरा सरळ रेषेत असावा. आता हेच आसन डावा हात वरच्या बाजूने आणि उजवा हात खालच्या बाजूने घेऊन करावे. 

 

२. उत्तान शिशो आसन (Uttan Shisho Aasan)
हे आसन करण्यासाठी गुडघ्यावर उभे रहा. यानंतर दोन्ही तळहात जमिनीवर टेकवून हळूहळू हात पुढे न्या. चेहरा, पाठ, कंबर एका तिरक्या रेषेत येतील अशा पद्धतीने तुमच्या शरीराची अवस्था येऊ द्या. कपाळ, छाती जमिनीला टेकलेले तर ओटीपोट मांड्यांना स्पर्श करेल, अशी अवस्था करा. या अवस्थेत ३० ते ३५ सेकंद राहण्याचा प्रयत्न करावा. हे आसन केल्यामुळे पाठीचा कणा ताणला जातो. पाठीचं, कंबरेचं काही दुखणं असेल तर त्यानेही आराम मिळतो. पोटावरची चरबी कमी करण्यासाठीही हे आसन उपयुक्त ठरतं. 

 

३. पर्वतासन (Parvatasana)
पर्वतासन करण्यासाठी गुडघ्यावर उभे रहा. यानंतर दोन्ही तळहात जमिनीला टेकवा. शरीराचा भार हातावर आणा आणि गुडघे वर करून तळपाय जमिनीला टेकवा. आता तळहात आणि तळपाय जमिनीला टेकलेले असतील. तळहात आणि तळपाय शक्य तेवढे एकमेकांच्या जवळ आणा आणि शरीराला पर्वताप्रमाणे त्रिकोणी आकार देण्याचा प्रयत्न करा. हे आसन करताना तुमचे तळपाय पुर्णपणे जमिनीवर टेकलेले असावेत. पोटऱ्या दुखत असतील किंवा पोटरीमध्ये वारंवार वात येत असेल, तर हे आसन करणे खूप फायद्याचे ठरते. 

 

 

Web Title: 3 Important yoga poses to improve your body posture, also very important for school students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.