Join us  

पोटावर चरबी-वजन वाढले खूप सारे, घरात आहेत ना लवंग-दालचिनी-जिरे! करा सोपा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2023 6:30 PM

3 Indian spices that can help you in weight loss सुटलेलं पोट, वाढतं वजन यासाठी करुन पाहा एक खास उपाय, सांभाळा डाएटही

लठ्ठपणाचा आपल्या शरीरावर खूप गंभीर परिणाम होतो. सध्या लोकांमध्ये व्यायामाचा अभाव, जंक फूडचे सेवन, अपुरी झोप, या समस्यांमुळे लठ्ठपणाची समस्या वाढते. वाढत्या लठ्ठपणामुळे शरीरात एलडीएल कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड, रक्तदाब, मधुमेह आणि कर्करोग यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. याचे एक प्रमुख कारण म्हणजे चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि दुसरे म्हणजे आरोग्याबाबत निष्काळजीपणा.

जर आपल्याला शरीरातील अतिरक्त चरबी कमी करायची असेल तर, या तीन मसाल्यांपासून वेट लॉस पावडर तयार करा. यासंदर्भात, बलरामपूर हॉस्पिटलचे आयुर्वेदाचार्य जितेंद्र शर्मा यांनी किचनमधील तीन मसाल्यांची यादी दिली आहे, याच्या सेवनाने शरीरातील अतिरिक्त चरबी वितळेल व बाहेर पडेल(3 Indian spices that can help you in weight loss).

लवंग

लवंग आपल्या पोटाभोवती साठलेली चरबी वितळवण्याचे काम करते. त्यात व्हिटॅमिन ए, ई, के, प्रोटीन आणि फायबर आढळतात. यासोबतच, लवंग आपल्या शरीरातील बेसल मेटाबॉलिक रेट वाढवून अधिक कॅलरीज बर्न करतात. लवंगामधील अँटी-ऑक्सिडंट शरीर मेन्टेन ठेवण्यासाठी मदत करते.

सुटलेलं पोट होईल कमी, डबल चिन गायब,रामदेव बाबा सांगतात सोपे उपाय

दालचिनी

दालचिनीच्या सेवनाने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत होते. यासोबतच दालचिनी रक्तातील साखरही नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. यासह आपल्या शरीरातील चयापचय क्रिया वाढवून कॅलरी बर्न करते.

जिरं

जिरं आपल्या शरीरातील पचनशक्ती वाढवतात. बहुतांश लोकं जंक फूड अधिक प्रमाणात खातात. ज्यामुळे वजन वाढते. जिरे खाल्ल्यास फॅट्स कमी होतात. जिरे आपल्या शरीरातील चयापचय गती देखील वाढवते. याचे नियमित सेवन केल्याने वजन कमी होते. यासह रक्तातील साखरही नियंत्रित राहते. व शरीरातील वाढलेले कोलेस्ट्रॉलही कमी होते.

सकाळी उपाशीपोटी चुकूनही खाऊ नयेत असे ४ पदार्थ, वजन कमी होण्याऐवजी वाढेल झपाट्याने

वेट लॉस पावडर करण्याची कृती

वेट लॉस पावडर करण्यासाठी तिन्ही मसाले समान प्रमाणात घ्या. यानंतर मसाल्यांची बारीक पावडर तयार करून घ्या. हे मिश्रण चाळणीमधून गाळून, पावडर एका हवाबंद डब्यात गाळून ठेवा.

या पद्धतीने करा सेवन

वजन कमी करण्यासाठी वेट लॉस पावडरचे सेवन करा. यासाठी एका भांड्यात पाणी घालून गरम करण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात वेट लॉस पावडर घालून मिक्स करा. १० मिनिटानंतर गॅस बंद करा. व चाळणीतून गाळून त्याचे पाणी प्या. आपण त्यात मध देखील मिक्स करू शकता. 

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्स