Lokmat Sakhi >Fitness > वजन वाढतच चाललंय? काही केल्या कमी होत नाही? फॉलो करा जपानी ३ सूत्र; वेट लॉस होणारच..

वजन वाढतच चाललंय? काही केल्या कमी होत नाही? फॉलो करा जपानी ३ सूत्र; वेट लॉस होणारच..

3 Japanese Weight Loss Tips To Burn Fat Easily : जपानी लोकं वजन कमी करण्यासाठी काय करतात? ३ टिप्स; सुडौल शरीर हवं असेल तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2024 04:36 PM2024-07-01T16:36:14+5:302024-07-01T16:37:29+5:30

3 Japanese Weight Loss Tips To Burn Fat Easily : जपानी लोकं वजन कमी करण्यासाठी काय करतात? ३ टिप्स; सुडौल शरीर हवं असेल तर..

3 Japanese Weight Loss Tips To Burn Fat Easily | वजन वाढतच चाललंय? काही केल्या कमी होत नाही? फॉलो करा जपानी ३ सूत्र; वेट लॉस होणारच..

वजन वाढतच चाललंय? काही केल्या कमी होत नाही? फॉलो करा जपानी ३ सूत्र; वेट लॉस होणारच..

वजन वाढण्याच्या समस्येने प्रत्येक जण त्रस्त आहेत (Weight Loss Tips). वजन वाढण्यामागे अनेक कारणं असू शकतात. खाण्याच्या सवयींमध्ये बदल, अपुरी झोप, यासह व्यायामाचा अभाव, यामुळे वजन वाढते. वजन कमी करण्यासाठी आपण विविध उपाय करून पाहतो (Japanese rules). जिम, डाएट काटेकोरपणे फॉलो करतो. पण तरीही काहींचे वजन कमी होत नाही.

जर आपण देखील वाढलेल्या वजनामुळे त्रस्त आहात तर, जपानी सूत्र वापरून पाहा (Fitness). यामुळे आपण लठ्ठपणापासून मुक्त होऊ शकता. जपानच्या या ३ पद्धतीमुळे वजन कमी करण्यास मदत होऊ शकते. शिवाय आरोग्य ही सुधारेल. पण जपानी लोक वेट लॉससाठी नक्की कोणता उपाय फॉलो करतात? हे उपाय प्रभावी ठरतात का?(3 Japanese Weight Loss Tips To Burn Fat Easily).

लठ्ठपणा कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय

शरीराला अॅक्टिव्ह ठेवा

इकीगाई या जपानी पुस्तकानुसार, अधिक वर्ष जगण्यासाठी आणि वेट लॉस करण्यासाठी स्वतःचे शरीर अॅक्टिव्ह ठेवा. आपण लहानपणी खूप अॅक्टिव्ह असतो. पण सध्याच्या बिघडलेली जीवनशैली आणि कामामुळे लोकांना स्वतःसाठी वेळ मिळत नाही. जर बैठी जीवनशैलीमुळे वेट लॉस होत नसेल तर, स्वतःला अॅक्टिव्ह ठेवा. वेट लॉस होईल.

ब्रश करण्याआधी आणि नंतर काय खाऊ नये? ब्रश करताना आपणही 'ही' चूक करता का?

ग्रीन टी

वेट लॉससाठी दूध आणि साखरेचा चहा पिण्याव्यतिरिक्त ग्रीन टी प्या. ग्रीन टीमध्ये न्यूट्रिशन आणि अँटीऑक्सिडंट्स घटक असतात. ज्यामुळे चयापचय सुधारते, पचनक्रिया सुधारते, शिवाय वेट लॉससाठीही मदत होते. त्यामुळे ग्रीन टी प्या. वेट लॉससाठी नक्कीच मदत होईल.

गुलाबाचे रोप वाढते पण फुलंच नाही? मातीत मिसळा १ घरगुती गोष्ट; पावसाळ्यात फुलांनी बहरेल झाड

छोट्या प्लेटमध्ये अन्न खा

वजन कमी करण्यासाठी नेहमी छोट्या प्लेटमध्ये अन्न खा. यामुळे वेट लॉससाठी नक्कीच मदत होईल. छोट्या प्लेटमध्ये खाणं म्हणजे पोर्शन कण्ट्रोलमध्ये खाणं. जेव्हा आपण पोर्शन कण्ट्रोलमध्ये ठेवून खातो, तेव्हा वेट लॉससाठी मदत होते. शिवाय कमी आणि हेल्दी खाण्याची सवय लागते. जर बैठी जीवनशैलीमुळे वेट लॉस करणं कठीण होत असेल तर, जपानी सूत्र फॉलो करून पाहा. वेट लॉस नक्कीच होईल.

Web Title: 3 Japanese Weight Loss Tips To Burn Fat Easily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.