पोटाची चरबी वाढण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे आपली खराब जीवनशैली (Lifestyle). विशेषतः डेस्क जॉब करणाऱ्या लोकांना याचा जास्त त्रास होतो. कारण डेस्क जॉबमध्ये बराच वेळ बसावे लागते (Weight Loss). यामुळे शरीराची चयापचय क्रिया मंदावते. ज्यामुळे खाल्लेलं अन्न पूर्णपणे पचण्याऐवजी पोटात जमा होते (Fitness).
याशिवाय व्यायामाचा अभाव आणि शारीरिक हालचालींमुळेही हा त्रास झपाट्याने वाढतो. अशावेळी पोटाची चरबी कमी करण्यासाठी दुपारच्या जेवणादरम्यान ३ गोष्टींमध्ये बदल करा. यामुळे वजन कमी करण्यास मदत होईल. शिवाय खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचेल(3 Mistakes You are Making After Eating a Meal - which makes u fat).
दुपारच्या जेवणादरम्यान ३ चुका टाळा, वजन घटेल
ब्रिस्टल विद्यापीठाने केलेल्या अभ्यासानुसार, 'कामाच्या डेस्कवर जेवताना लक्ष विचलित होते. आपण किती खातो, काय खातो, याकडे आपलं लक्ष नसतं. त्यामुळे आपण खूप खातो, आणि आपली हालचाल कमी होते. ज्यामुळे अन्न चरबीच्या रूपात स्टोअर होते आणि वजन वाढत जाते.
वजन वाढत नाही? लोक हडकुळे म्हणून टोमणे मरतात? सोयाबीन 'या' पद्धतीने खा-वाढेल ताकद
दुपारच्या जेवणानंतर लगेच बसणे
इंटरनॅशनल जर्नल ऑफ जनरल मेडिसिनच्या मते, लंचनंतर लगेच बसणे आणि काम केल्याने तणावाचे हार्मोन्स वाढतात, ज्यामुळे चयापचयवर परिणाम होतो. त्यामुळे अन्न पचनाचा वेग कमी होऊन वजन वाढू लागते. त्यामुळे पोटाची चरबी वाढते. म्हणून, दुपारच्या जेवणानंतर सुमारे ३० मिनिटे आपल्या डेस्कवर बसू नका. शतपावलीला जा.
चपाती-भात खाऊन वजन वाढतं असं कोण म्हणतं? आहारतज्ज्ञ सांगतात, गैरसमजावर खरंखुरं उत्तर
दुपारच्या जेवणानंतर सोडा किंवा कॉफी घेणं टाळा
दुपारच्या जेवणानंतर सोडा किंवा कॉफीचे सेवन केल्यानेही वजन वाढू शकते. त्यात कृत्रिम स्वीटनर्स असतात जे कॅलरी वाढवतात आणि खाण्याची इच्छा अधिक वाढतात. याशिवाय दुपारच्या जेवणानंतर लगेच कॉफी घेतल्याने पचनक्रियेवर परिणाम होतो. ज्यामुळे वजन झपाट्याने वाढत होते. त्यामुळे वजन वाढू नये म्हणून जेवणानंतर या गोष्टींची काळजी घ्या.