Join us  

सकाळी लवकर उठायचा कंटाळा येतो? मग झोपल्या झोपल्या करा ३ व्यायाम, पोट कमी करण्याचा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2023 8:25 PM

3 Morning Exercises that you can do at Home in Bed रोज सकाळी झोपल्या झोपल्या २० मिनिटं करा ३ सोपे व्यायाम

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला व्यायाम करायला जमेलच असे नाही. संपूर्ण वेळ कोणत्या न कोणत्या कामात गुंतलेला असतो. काहींचं काम हे बैठी असल्यामुळे वजन झपाट्याने वाढते. वजन वाढायला वेळ लागत नाही, मात्र कमी करण्यासाठी दुप्पट मेहनत घ्यावी लागते. अशा परिस्थितीत पोटाची चरबी जास्त वाढते.

आपल्याला जर व्यायामासाठी वेळ मिळत नसेल तर, सकाळी उठल्यानंतर पलंगावर व्यायाम आपण करू शकता. या व्यायामुळे फक्त बेली फॅट कमी होणार नाही तर, सकाळी येणारा आळस देखील दुर होइल. ज्यामुळे शरीरात एक नवी उर्जा निर्माण होईल. कोणते आहेत ते एक्सरसाईज पाहूयात(3 Morning Exercises that you can do at Home in Bed)..

विंडशिल्ड वायपर

पोट आणि मांड्यांची चरबी करण्यासाठी हा व्यायाम प्रभावशाली आहे. हा व्यायाम करताना, पाय कारच्या वायपरप्रमाणे हलवायचे आहेत. यासाठी, बेडवर सरळ झोपा, हात दोन्ही दिशेने पसरवा. आता पाय एकत्र करा आणि त्यांना वर उचलताना ९० अंशांचा कोन करून सरळ ठेवा. आता पाय जोडून चारही दिशांमध्ये सर्कल करून फिरवा.

भूमी पेडणेकरने कमी केलं ३२ किलो वजन, पण कसं? आईचा सल्ला तिने ऐकला आणि...

लेग रेज

पोटाची व मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी हा व्यायाम बेस्ट आहे. याने मेंदूतील रक्ताभिसरण देखील वाढते. यासाठी पहिले बेडवर सरळ झोपा. आता दोन्ही पाय वर करून जोडून घ्या. आता शक्य तितक्या वेळ धरून ठेवा. आता पाय बेडवर परत आणा आणि पुन्हा करा. हा व्यायाम किमान १५ मिनटे करा.

अतिशय देखण्या आणि फिट अभिनेत्री पाहा रोज ब्रेकफास्ट काय करतात? कोणते पदार्थ खातात..

क्रंचेस

क्रंचेस केल्याने शरीराच्या वरील भागाला खूप फायदा होतो. क्रंच करण्यासाठी, बेडवर सरळ झोपा. आता समोरचे पाय हवेत उचला. आता दोन्ही हात डोक्याखाली घ्या आणि बोटे एकमेकांना जोडून बंद करा. आता शरीराचा वरचा भाग उचला, व पुन्हा खाली डोके टेकवा. ही प्रक्रिया सुमारे १५ मिनिटे करा. सुरुवातीला हळू हळू करा आणि नंतर वेग वाढवा.

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य