फिट आणि वजन कमी करण्यासाठी लोकं अनेक गोष्टी करून पाहतात. प्रत्येक बॉडी टाईपनुसार वजन देखील काही विशिष्ट गोष्ट करून कमी होते. काहींचे जिम, डाएट, तर काहींचं वजन योगाभ्यास करून कमी होते. तर काही सकाळी वॉक करून शरीराला फिट ठेवण्याचा प्रयत्न करतात. सकाळी वॉक करणं शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतं.
सकाळी वॉक केल्याने शरीरातील ब्लड सर्क्युलेशन सुधारते. यासह नियमित वॉकची सवय लावल्याने शरीरातील फॅट्स कमी होतात. सकाळची सुरुवात वॉकने केल्याने दिवसभर फ्रेश वाटते, यासह स्ट्रेस देखील कमी होतो. परंतु, मॉर्निंग वॉक करून आल्यानंतर कोणत्या गोष्टी टाळायला हव्या, कोणती गोष्ट केल्याने शरीराला फायदे होतील हे पाहूयात(3 Must-Dos After Every Walking Workout ).
प्रोटीनयुक्त फुड्स
सकाळचा नाश्ता खूप महत्वाचा असतो. सकाळी प्रोटीनयुक्त नाश्ता केल्याने दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. साधारण एक तासानंतर प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन करा. यामुळे एनर्जेटिक राहाल. मॉर्निंग वॉकवरून परतल्यानंतर प्रोटीन शेक किंवा केळीसारख्या गोष्टी खा. यामुळे स्नायू मजबूत होतील. यासोबतच शरीराला भरपूर जीवनसत्त्वेही मिळतील.
लिंबू जास्त खाल्ल्याने खरेच वजन कमी होते का? लिंबू आहारात किती असावा?
भरपूर पाणी प्या
मॉर्निंग वॉकवरून परतल्यानंतर एक तासानंतर भरपूर पाणी प्या. यामुळे शरीर हायड्रेट होईल. सकाळी वॉक केल्यानंतर खूप थकवा येतो. ज्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. अशा स्थितीत शरीरात पाण्याची कमतरता भासू नये म्हणून, घरी आल्यानंतर साधारण एका तासाने पाणी पिणे योग्य ठरू शकते. यामुळे स्किन देखील ग्लो करेल.
आवडतात म्हणून एकावेळी ४-५ गुलाबजाम खाता? पण विचार करा, एका गुलाबजाममध्ये किती कॅलरी असतात?
आराम करा
शरीराला आराम देणं खूप महत्वाचं आहे. सकाळी वॉक केल्यानंतर आपण घाई - घाईत इतर कामाला सुरुवात करतो. आधीच वॉक केल्यानंतर शरीर खूप थकते. ज्यामुळे शरीरातील उर्जा आणखी कमी होते. चालण्याने शरीरात उष्णता निर्माण होते. त्यामुळे काही वेळ चालल्यानंतर शरीराला थंडावा देणं गरजेचं आहे. त्यामुळे निदान अर्धा तास तरी आराम करावा.