Join us  

रोज १० किमी पळूनही कणभरही कमी होणार नाही पोट, ३ चुका - आयुष्यात वजन कमी होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2024 1:00 PM

3 reasons you're not losing weight from running : सकाळी वॉक किंवा जॉगिंग करता तरी पोट कमी होत नसेल तर, ३ चुका करणं थांबवा, नाहीतर मेहनत वेस्ट

जगभरातील बरेचसे लोकं वजन वाढीच्या (Weight Gain) समस्येने त्रस्त आहेत. बहुतांश जणांचे वजन तर कमी असते, पण वाढलेल्या पोटामुळे शरीर बेढप दिसते. वजन कमी करण्यासाठी काही जण जिम किंवा डाएटवर भर देतात. तर काही जण वॉक-जॉगिंग करून कॅलरीज बर्न करतात (Walking Weight loss). पण काहींचे ५ ते १० किलोमीटर वॉक-जॉगिंग केल्यानंतरही वजन कमी होत नाही (Fitness). अशावेळी कोणत्या चुकामुळे वजन घटत नाही असा प्रश्न निर्माण होतो.

यासंदर्भात, आहारतज्ज्ञ पूनम दुनेजा सांगतात, 'फिजिकल अॅक्टिव्हिटी व्यतिरिक्त मुख्य म्हणजे आहाराकडेही विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. वेट लॉससाठी वॉक किंवा जॉगिंग करणं बेस्ट मानले जाते. जे वाढलेल्या पोटाच्या समस्येमुळे त्रस्त आहेत, त्यांनी ३० मिनिटे ब्रिस्क वॉक करावे. यासह आहाराकडेही विशेष लक्ष द्यायला हवे(3 reasons you're not losing weight from running)'.

वॉक किंवा जॉगिंग करताना मोबाईल फोन वापरणे टाळा

बहुतांश व्यक्तींना वॉक किंवा जॉगिंग करताना मोबाईल फोन वापरण्याची सवय असते. पण वॉक किंवा जॉगिंग करताना वारंवार फोन वापरणे टाळावे. यामुळे आपण धावताना किंवा चालताना ब्रेक घेतो. ज्यामुळे कॅलरीज योग्यरित्या बर्न होत नाही. त्यामुळे ३० मिनिटे न थांबता वॉक किंवा जॉगिंग करा.

ना व्यायाम-ना डाएट, फक्त उकळत्या पाण्यात ४ पैकी १ मसाला घालून प्या, काही दिवसात दिसेल फरक

स्नॅक्स-साखरयुक्त पदार्थ खाणे टाळा

बरेच जण वर्कआउट करताना साखरयुक्त पेय पितात. ज्यामुळे कॅलरीज कमी होण्याऐवजी वाढतात. त्याऐवजी आपण एनर्जी ड्रिंक पिऊ शकता. शिवाय वर्कआऊट केल्यानंतर स्नॅक्स खाणं टाळा. वॉक किंवा जॉगिंग करताना खाणं - पिणे टाळा.

कोण म्हणतं फक्त डाएट- वर्कआउट केल्यानेच वजन घटतं? ५ सोपे बदल, सहज घटेल वजन

स्टायलिश कपडे फुटवेअर घालणे टाळा

काही लोकं वॉक किंवा जॉगिंग करताना स्टायलिश कपडे फुटवेअर घालतात. ज्यामुळे धावताना अडचण निर्माण होते. त्यामुळे साधे शूज सिंपल कपडे परिधान करा. शिवाय वर्कआउट केल्यानंतर हेल्दी आहाराचे सेवन करा. 

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स