Lokmat Sakhi >Fitness > जाडजूड मांडीवरची चरबी कमी करण्यासाठी उपयोगी ३ व्यायाम, पाय दिसतील सुंदर

जाडजूड मांडीवरची चरबी कमी करण्यासाठी उपयोगी ३ व्यायाम, पाय दिसतील सुंदर

Fitness Tips: मांड्यांवरची चरबी वाढली (thigh fat) की अक्षरश: मांडीवर मांडी घासली जाते... याचा त्रास होतो तो वेगळाच. शिवाय शरीरही अतिशय बेढब दिसू लागतं. म्हणूनच तर मांडीवरची चरबी कमी करण्यासाठी करून बघा हे व्यायाम. (How to reduce thigh fat)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2022 03:24 PM2022-06-16T15:24:16+5:302022-06-16T15:25:02+5:30

Fitness Tips: मांड्यांवरची चरबी वाढली (thigh fat) की अक्षरश: मांडीवर मांडी घासली जाते... याचा त्रास होतो तो वेगळाच. शिवाय शरीरही अतिशय बेढब दिसू लागतं. म्हणूनच तर मांडीवरची चरबी कमी करण्यासाठी करून बघा हे व्यायाम. (How to reduce thigh fat)

3 simple Exercises to reduce thigh fat, perfect exercise for tonned leg and to reduce thigh fat | जाडजूड मांडीवरची चरबी कमी करण्यासाठी उपयोगी ३ व्यायाम, पाय दिसतील सुंदर

जाडजूड मांडीवरची चरबी कमी करण्यासाठी उपयोगी ३ व्यायाम, पाय दिसतील सुंदर

Highlightsया व्यायाम प्रकारांमुळे थाय फॅट कमी करण्यासाठी मदत तर होईलच शिवाय शरीराच्या इतर भागांवरील फॅट्स कमी होऊन परफेक्ट बॉडी शेप मिळण्यास मदत होईल.

आजकाल प्रत्येकाच्याच बाबतीत असं झालं आहे की बैठ्या कामाचं स्वरुप वाढलं आहे आणि चालायला किंवा मग व्यायाम  (exercise) करायला फारचा वेळच मिळत नाही. यामुळे वजन वाढीची समस्या खूप वाढली आहे. वजनाच्या खाणाखुणा सगळ्यात आधी  दिसायला लागतात ते पोटावर, दंडावर, हिप्सवर आणि मांड्यांवर. मांड्यांवरची चरबी (heavy fats on thighs) वाढली की चालतानाही खूप त्रास होतो. हा सगळा त्रास कमी करण्यासाठी शिवाय बेढब दिसू लागणारे शरीर सुडौल दिसण्यासाठी करून बघा हे काही व्यायामप्रकार. या व्यायाम प्रकारांमुळे थाय फॅट कमी करण्यासाठी मदत तर होईलच शिवाय शरीराच्या इतर भागांवरील फॅट्स कमी होऊन परफेक्ट बॉडी शेप मिळण्यास मदत होईल. (how to get perfect shape thigh)

 

१. सुमो स्क्वॅट्स (sumo squats)
- हा व्यायाम करण्यासाठी सगळ्यात आधी ताठ उभे रहा. दोन्ही पाय एकमेकांपासून दूर करा. तुमच्या खांद्यांपेक्षाही पायातले अंतर जास्त असावे. दोन्ही पायांचे तळवे साधारण ४५ डिग्री कोनात बाहेरच्या बाजूने काढा.
- आता पाठीचा कणा ताठ ठेवत पाय गुडघ्यात वाकवा आणि हाताची बोटे जमिनीला टेकेपर्यंत खाली वाका. 
- एखादी खाली पडलेली वस्तू उचलण्यासाठी वाकतो, त्याप्रमाणे वाकायचे नाही. नजर आणि चेहरा सरळ ठेवत खाली वाकायचे आहे. या अवस्थेत ५ ते १० सेकंद राहण्याचा प्रयत्न करा. पुन्हा आधीच्या पोझिशनला या. अशा पद्धतीने १२ ते १५ वेळा व्यायाम करावा.

 

२. फॉरवर्ड लंजेस (forward lunges)
- हा व्यायाम करण्यासाठी ताठ उभे रहा. दोन्ही हात कंबरेवर ठेवा. आता एक पाय साधारण एखादा फुट पुढे घ्या. आता हळूहळू दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवा.
- जोपर्यंत मागच्या पायाचा गुडघा जमिनीला टेकत नाही तोपर्यंत खाली वाका. यानंतर या अवस्थेत ५ ते १० सेकंद राहण्याचा प्रयत्न करा.
- एकूण १० ते १२ वेळा ही क्रिया पुन्हा पुन्हा करा. यानंतर दुसऱ्या पायाने पुन्हा अशाच पद्धतीने व्यायाम करावा. 

 

३. जंपिंग जॅक्स (jumping jacks)
- हा एक छान व्यायाम आहे. लहानपणी बऱ्याच जणांनी हा व्यायाम केलेला असतोच, तोच आता पुन्हा करायचा आहे.
- या प्रकारामुळे संपूर्ण शरीराचा खूप उत्तम प्रकारे व्यायाम होतो. जंपिंग जॅक्स करण्यासाठी सगळ्यात आधी ताठ उभे रहा. यानंतर उडी मारत दोन्ही पायातले अंतर वाढवा आणि त्याचवेळी दोन्ही हात डोक्यावर नेऊन टाळी वाजवा. 
- दुसऱ्या स्टेपमध्ये पुन्हा उडी मारत दोन्ही पाय जवळ आणा आणि दोन्ही हात खाली घ्या.
- जलद पद्धतीने उड्या मारत १० ते १५ वेळा हा व्यायाम करावा. 

 

Web Title: 3 simple Exercises to reduce thigh fat, perfect exercise for tonned leg and to reduce thigh fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.