वाढलेलं वजन आणि पुढे आलेली पोटाची ढेरी कुणालाही नको असते. सध्याच्या काळात प्रत्येकजण आपले वजन आणि पोट कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतात. काहीवेळा आपले वजन कमी होते परंतु पोटाची वाढलेली ढेरी (Easy Exercise For Slim & Toned Figure You Can Do In Your Home) आहे तशीच राहते. अचानक पुढे आलेली ढेरी दिसायला लागते तेव्हा आपल्याला नकोसे वाटते. पोटाची ढेरी वाढल्याने एकूणच आपल्या पर्सनॅलिटीमध्ये बदल दिसून येतो. आपल्या शरीराला (3 simple home exercises to reduce belly fat) ही वाढलेली पोटाची ढेरी (3 Exercise To Lose Belly Fat Fast) शोभत नाही. या पोटामुळे आपली पर्सनॅलिटी बिघडते, शरीराचा शेप ओबडधोबड दिसतो. एवढंच नव्हे तर पोटात चरबीचे थर साचून राहिल्याने अनेक शारीरिक व्याधी देखील सतावतात. एकवेळ वजन कमी करणे सोपे आहे परंतु वाढलेली पोटाची ढेरी कमी करायची म्हणजे फार मेहेनत घ्यावी लागते( Top 3 Exercises to Reduce Belly Fat).
वाढलेले वजन व ढेरी कमी करण्यासाठी अनेकजण जिम किंवा डाएट करतात. परंतु काहीवेळा अनेक उपाय करूनही पोट आत जाता जात नाही. यासाठी रोजच्या रोज एक्सरसाइज करताना आपण पोटाची ढेरी कमी करण्यासाठी काही खास एक्सरसाइज करु शकतो. हे एक्सरसाइज करण्यासाठी आपल्याला जिममध्ये जायची गरज नाही आपण अगदी घरच्या घरी देखील हे एक्सरसाइज करू शकता. पोटाची हट्टी चरबी काढून टाकण्यासाठी आपण कोणत्या खास एक्सरसाइज कराव्यात ते पाहूयात.
बेली फॅट कमी करणं होईल सोपं...
१. ब्रिज पोज एक्सरसाइज :- योगा मॅटवर पाठ टेकवून झोपा. हलके हलके श्वास घ्या. यानंतर हात बाजूला ठेवा. आता सावकाशपणे पाय गुडघ्यात दुमडून नितंबांजवळ आणावेत. कंबर शक्य तितकी वर उचलून घ्या. हात जमिनीवरच ठेवा. काही वेळापुरता श्वास रोखून धरावा. यानंतर श्वास सोडत पुन्हा कंबर जमिनीवर टेकवावी. पाय सरळ करून विश्रांती घ्यावी. १० ते १५ सेकंद विश्रांती झाल्यानंतर पुन्हा आसन करावे. सेतू बंधासनालाच ब्रिज पोझ असे म्हटले जाते. यामुळे पोटातील सर्व अवयवांचे कार्य सुधारण्यास मदत होते. पायाचे तळवे, खांदे आणि मान यावर शरीराचा भार पेलायचा असल्याने पोटातील स्नायूं आणि अवयवांना ताण पडतो आणि त्यांचे कार्य सुधारते.
वजन कमी करण्यासाठी खात राहा ! झटपट वजन उतरवण्याचा अनोखा फंडा, दिसाल स्लिमट्रिम...
२. चेअर डिप्स :- ही एक्सरसाईज फार सहजपणे केली जाऊ शकते. यात एका खुर्चीवर हात टेकवून शरीर समोरच्या दिशेनं वाकवा. आता याच स्थितीत पायाचे गुडघे वाकवून डिप्स मारण्याचा प्रयत्न करा. याने संपूर्ण शरीरासोबतच मांड्यांच्या आजूबाजूच्या मांसपेशी सक्रिय होतात. तसेच याने गुडघ्यांची समस्याही दूर होते. चेअर डिप्स हा शरीराला टोन करण्यासाठी एक उत्तम व्यायाम आहे. यामुळे शरीराचे स्नायू मजबूत होतात आणि शरीराचे संतुलन सुधारते. हा व्यायाम हातांच्या मागील बाजूस असलेल्या ट्रायसेप्स स्नायूंना देखील मजबूत करतो.
भेळ- मखाणे- खाकरा हेल्दी म्हणून भरपूर आणि रोज खाता? थांबा, रडायची पाळी येईल कारण...
३. प्लॅंक :- सर्वप्रथम जमिनीवर पोटावर झोपा. यानंतर आपल्या पायांची बोटे आणि कोपरांच्या जोरावर संपूर्ण शरीर वर उचला.
यामध्ये आपले हात आपल्या खांद्यांच्या अगदी खाली असतील आणि आपल्या खांद्यांइतकेच हातही रुंद असले पाहिजेत. यावेळी आपले पाय खांद्यांच्या रुंदीपेक्षा किंचित आत असतील. आपल्याला आपले संपूर्ण शरीर सरळ ठेवावे लागेल, म्हणजेच आपले पोट किंवा हिप्स जास्त उंचही उचलायचे नाहीत किंवा जास्त खाली देखील ठेवायचे नाहीत. आपली मान सरळ रेषेत ठेवावी आणि नजर खाली ठेऊन जमिनीकडे पाहावे. या स्थितीत आपल्याला कमीतकमी १० ते ३० सेकंद रहावे लागेल. आपण एका मिनिटासाठी हे आसन होल्ड करून ठेवल्यास अधिक फायदेशीर ठरेल. प्लँक एक्सरसाईज शरीराच्या स्नायूंना टोनिंग आणि बळकट करण्यात विशेष मदत करतात. विशेषत: या योगाचा सराव पोटासाठी खुप फायदेशीर मानला जातो. कोर मजबूत करण्यासोबतच प्लँक एक्सरसाईज पोटातून अतिरिक्त चरबी कमी करण्यास आणि फिटनेस अधिक चांगला राखण्यास उपयुक्त आहे.
वजन कमी करण्यासाठी चपाती खाणं सोडू नका, ‘या’ पिठाची करा चपाती-वजनही उतरेल सरसर...