Join us  

फेशियल फॅट्स कमी करण्यासाठी ३ उपाय,चेहरा दिसेल तरुण - सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2023 3:46 PM

Facial Exercise बहुतांश लोकं शरीरापेक्षा चेहऱ्यावरील फॅटमुळे त्रस्त असतात. चेहऱ्याला टोन देण्यासाठी ३ व्यायाम करा फॉलो..

प्रत्येक जण सुदंर आणि आकर्षक दिसण्यासाठी नव - नवीन उपायांचा वापर करून पाहतात. चेहरा सुंदर आणि तजेलदार दिसण्यासाठी अनेक महागड्या प्रोडक्ट्सचा वापर देखील करतात. काही लोकं शरीराला अधिक महत्व देतात, मात्र चेहऱ्याला नाही. चेहऱ्यासह शरीराला देखील तितकेच महत्व देणं गरजेचं आहे. शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी व्यायामासह आहाराकडे देखील लक्ष देणं महत्वाचे आहे.

मात्र, बहुतांशवेळा शरीरापेक्षा चेहऱ्यावर अतिरिक्त चरबी अधिक दिसून येते. यामुळे चेहऱ्याचा आकार तर बिघडून जातोच यासह कोणतेही प्रोडक्ट्स चेहऱ्यावर लावल्यास ते उठून दिसत नाही. काही महिला चेहऱ्यावरील फॅट कमी दिसण्यासाठी मेकअपचा आधार घेतात. परंतु, मेकअप चेहऱ्यावर अधिक काळ टिकून राहत नाही. आपल्याला जर चेहऱ्यावरील फॅट घरगुती पद्धतीने कमी करायचे असेल, तर काही एक्सरसाईज फॉलो करा. चेहऱ्याला योग्य आकार मिळेल.

फिश फेस एक्सरसाईज

फेशियल फॅट कमी करण्यासाठी फिश फेस एक्सरसाईज प्रभावी ठरेल. हा व्यायाम केल्याने चेहऱ्यावरील फॅट कमी होण्यास मदत मिळते. बहुतांश जणांना डबल चीनच्या समस्येला सामोरे जावे लागते. जर आपल्याला या समस्येपासून सुटका हवी असल्यास फिश फेस एक्सरसाईज करा. याने नक्कीच फरक जाणवेल. हा व्यायाम केल्याने चेहऱ्यावरील स्कीन टोन होते. यासह फॅट देखील कमी होण्यास मदत मिळते.

फिश फेस एक्सरसाईज करण्याची योग्य पद्धत

सर्वप्रथम, आपले तोंड बंद करा आणि गाल आतील बाजूस ओढा. हे करत असताना चेहऱ्याचा माशासारखा आकार बनवा. हा व्यायाम करत असताना हसण्याचा प्रयत्न करा. १० ते १५ मिनिटे हा व्यायाम करा. हा व्यायाम किमान 4 ते 5 वेळा करावा.

बलून पोझ

चेहऱ्यावरील फॅट कमी करण्यासाठी यासह स्नायूंना टोन करण्यासाठी हा व्यायाम प्रभावी ठरेल. हा व्यायाम केल्याने गालावर आणि हनुवटीवर जमा झालेली चरबी कमी होते. जर आपल्याला  सडपातळ चेहरा आणि जॉ लाईन हवी असल्यास हा व्यायास करा.

बलून पोझ एक्सरसाईज करण्याची योग्य पद्धत

हा व्यायाम करण्यासाठी दीर्घ श्वास घ्या. आता तुमचे गाल हवेने भरून फुगवा. तोंडात १० सेकंद हवा दाबून ठेवा. त्यानंतर डावीकडे १० सेकंद आणि नंतर उजव्या बाजूला १० सेकंद तोंडात हवा ठेवण्याचा प्रयत्न करा. यानंतर, हवा बाहेर सोडा आणि गालाला 5 सेकंद विश्रांती द्या. दिवसातून हा व्यायाम आपण तीन ते चार वेळा पुन्हा करू शकता.

एक्स - ओ एक्सरसाईज

चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी हा व्यायाम मदत करेल. जाड गाल आणि हनुवटीवर जमा झालेल्या अतिरिक्त चरबीमुळे चेहऱ्याचा आकार बदलतो. आपल्याला जर चेहऱ्याला योग्य आकार द्यायचा असेल तर हा व्यायाम करून पाहा. हा व्यायाम केल्याने चेहऱ्याचे स्नायू टोन होतील आणि तुमचा चेहरा खूप सडपातळ दिसेल.

एक्स - ओ एक्सरसाईज

 

सर्वप्रथम आपले तोंड उघडा आणि स्पष्टपणे X आणि O शब्दाचा उच्चार करा. ही प्रक्रिया १० ते १५ वेळा करा आणि नंतर ५ सेकंदांचा ब्रेक घ्या. नंतर ही स्टेप पुन्हा करा. हा व्यायाम आपण दिवसातून ४ ते ५ वेळा करू शकता.

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायाम