व्यायाम, फिटनेस, योगा हे सगळं काही मलायका अरोराचं पॅशन आहे. त्यामुळे तिच्या दिवसाची सुरवातच या गोष्टींनी होते आणि त्याशिवाय तिचा दिवस पुर्णही होत नाही. आपल्या सारखंच आपल्या चाहत्यांनीही फिटनेसबाबत (fitness and health) जागरुक व्हावं, असं तिला वाटतं. त्यामुळेच तर दर आठवड्यात ती तिच्या चाहत्यांना इन्स्टाग्राम व्हिडिओच्या माध्यमातून एक फिटनेस मोटीव्हेशन देत असते. तिने नुकताच तिचा एक व्हिडिओ शेअर केला असून यामध्ये ती व्यायामाच्या ३ स्टेप्स कोणत्या याबाबत माहिती सांगते आहे. (3 steps to make your regular workout more effective)
सध्या प्रत्येकाच्याच आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे आता बऱ्याच प्रमाणात लोक वर्कआऊट, डाएट याविषयी जागरुक झाले आहेत. दररोज नियमितपणे वर्कआऊट करणाऱ्यांची संख्याही भरपूर आहे. रोजच्या वर्कआऊटसाठी जीम, योगा, झुंबा अशा कोणत्याही क्लासला जात नसाल, तर घरच्याघरी व्यायाम करताना तुमचं व्यायामाचं शेड्यूल कसं असावं, व्यायामाच्या सुरुवातीला काय करावं, शेवट कशाने करावा, याची आपल्याला योग्य माहिती नसते. म्हणूनच तर मलायकाने त्यासाठीच हा एक खास व्हिडिओ शेअर केला असून घरच्याघरी योग्य पद्धतीने व्यायाम कसा करावा, त्याच्या ३ स्टेप्स कोणत्या याविषयी ती माहिती देत आहे. तसंच तिचं स्वत:चं वर्कआऊट रुटीन कसं आहे, हे ही तिने सांगितलं आहे.
असं असावं व्यायामाचं रुटीन
१. Move
मुव्ह अर्थातच हालचाल. व्यायाम म्हटला की ही गोष्ट सगळ्यात आधी येणारच. त्यामुळे सगळ्यात आधी तर काही ना काही शारिरीक हालचाल होऊनच तुमच्या वर्कआऊट रुटीनची सुरुवात होणार. यामध्ये तुम्ही योगासनं, जीम, पिलेट्स, कार्डिओ एक्सरसाईज असा तुम्हाला जो व्यायाम आवडत असेल तो करू शकता. पण एकदम हेवी वर्कआऊटला सुरुवात करण्याआधी थोडं वार्मअप जरूर करा आणि त्यानंतर व्यायामाला लागा.
२. Breathe म्हणजेच प्राणायाम
तुमच्या वर्कआऊट रुटीनची ही दुसरी पायरी असली पाहिजे. यामध्ये तुम्ही श्वसनावर लक्ष केंद्रित करा. यामध्ये दिर्घश्वसन किंवा वेगवेगळे प्राणायाम करू शकता. नियमित प्राणायाम केल्याने अनेक मानसिक, शारिरीक फायदे होतात. फुफ्फुसांची क्षमता वाढविण्यासाठी हे अतिशय गरजेचं आहे. दिवसभरातून बहुतांश वेळा आपण अपुरा श्वास घेतो. म्हणून दिवसांतून काही मिनिटांसाठी दिर्घश्वसन करणं गरजेचं असतं.
३. मेडिटेशन
वर्कआऊट, प्राणायाम करून झाल्यानंतर ४ ते ५ मिनिटांचा वेळ स्वत:साठी द्या. या वेळात मेडिटेशन म्हणजेच ध्यानधारणा करा. यावेळी तुमच्या आजुबाजुचा, आसपासच्या लोकांचा, कुटुंबाचा असा काेणाचाही विचार करू नका. केवळ स्वत:शी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा. स्वत:चा विचार करा आणि स्वत:शी संवाद साधा. दररोज हा असा स्वत:शी साधलेला ४ ते ५ मिनिटांचा संवादही तुमच्या मानसिक आणि शारिरीक आरोग्यात कमालीचा बदल घडवून आणू शकतो, असंही मलायका सांगते आहे.