Join us  

कंबरेवर वाढलेल्या फॅट्समुळे बेढब दिसता? चरबी कमी करण्यासाठी नियमित करा ३ योगासनं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2022 3:05 PM

3 Yoga Poses for Women to Reduce Belly Fat at Home : कंबरेवरची चरबी कमी करण्यासाठी नेमकी कोणती आसनं करायची ते पाहूया...

ठळक मुद्देकंबरेवरची चरबी वाढली की आपल्याला फॅशन करता येत नाही..शरीर बेढब असेल की काही वेळा नैराश्य येणे किंवा आत्मविश्वास कमी होणे अशा समस्या उद्भवतात

लठ्ठपणा ही अनेकांच्या आयुष्यातील एक महत्त्वाची समस्या असते. केवळ तब्येतीसाठीच नाही तर वाढलेल्या लठ्ठपणामुळे आपण बेढब दिसायला लागतो आणि त्यामुळे आपल्याला कधी नैराश्य येते तर कधी आपल्यातील आत्मविश्वास कमी होतो. चुकीची जीवनशैली, अनुवंशिकता, आरोग्याच्या समस्या, गरोदरपण यांमुळे वजन वाढते. महिलांमध्ये साधारणपणे ओटीपोट, कंबर, मांड्या या भागांत चरबी वाढण्याचे प्रमाण जास्त असते. एकदा याठिकाणची चरबी वाढायला लागली की ती कमी करण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात. मग डाएट, जीम अशा सगळ्या प्रयत्नांनी आपण हा लठ्ठपणा कमी करण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्यामध्ये आपल्याला यश येतेच असे नाही (3 Yoga Poses for Women to Reduce Belly Fat at Home). 

(Image : Google)

कंबरेवर टरबी वाढली असेल तर आपली फिगर तर बेढब दिसतेच. पण यामुळे आपल्याला वेगवेगळ्या स्टाइलचे किंवा फॅशनचे कपडेही घालता येत नाहीत. योगासने हा काहीसा संथ वाटणारा मात्र दिर्घकालिन परिणाम दर्शवणारा व्यायामप्रकार आहे. योगासनांमुळे म्हणावा तसा घाम येत नाही. मात्र यामध्ये होणाऱ्या सूत्रबद्ध हालचालींमुळे आपले स्नायू विशिष्ट लयीत काम करतात आणि त्यामुळे आपल्या आरोग्याच्या तसेच मनाच्या समस्या दूर होण्यास मदत होते. आता कंबरेवरची चरबी कमी करण्यासाठी नेमकी कोणती आसनं करायची ते पाहूया...

(Image : Google)

१. उत्तानपादासन

- सुरुवातीला जमिनीवर पाठीवर झोपायचे. पाय आणि हात सरळ रेषेत ठेवायचे. 

- दोन्ही पाय ३० अंशाच्या कोनात उचलायचे. हातही उचलून पायाच्या रेषेत ठेवायचे. 

- डोक्याचा टाळू जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. 

- या पोझिशनमध्ये किमान काही सेकंद थांबायचे.

- हे आसन ५ ते ७ वेळा केल्यास त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. 

(Image : Google)

२. उष्ट्रासन 

- वज्रासनात बसावे आणि पाठ ताठ राहील असे पाहावे. 

- कंबरेतून वाकून मागच्या बाजुने हात पायाच्या घोट्यांना किंवा टाचांना लावण्याचा प्रयत्न करावा. 

- काही सेकंद किंवा शक्य असेल तर मिनीटे याच अवस्थेत थांबण्याचा प्रयत्न करावा.

- आसन सोडताना हळूवारपणे सोडावे, स्नायूंना झटका बसणार नाही याची काळजी घ्यावी. 

(Image : Google)

३. पवनमुक्तासन

- पाठीवर सरळ झोपा आणि पाय ९० अंशाच्या कोनात वरती घ्या.

- पाय गुडघ्यातून पोटावर दुमडून दोन्ही हाताने पाय पोटावर दाबले जातील असे बघा.

- मान उचलून दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये कपाळ किंवा नाक लावण्याचा प्रयत्न करा. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्सयोगासने प्रकार व फायदे