मलायका दर सोमवारी नियमितपणे तिचं फिटनेस सिक्रेट तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. असंच एक फिटनेस सिक्रेट मलायकानं या आठवड्यात इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. यामध्ये तिने पाेट कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणारी ३ आसनं (3 yogasana for reducing belly fats) करून दाखविली आहेत. वजन वाढू लागलं आहे, याची सूचना आपलं पोट आपल्याला लगेच देतं.. पोट सुटत गेलं की सगळं शरीरच बेढब दिसून लागतं. त्यामुळे पोटावर हळू हळू चढत जाणाऱ्या टायर्सला जितक्या लवकर थांबवता येईल, तेवढं उत्तम. कारण हे टायर्स एकदा जर चढले तर ते कमी करण्यासाठी दुपटी- तिपटीने मेहनत घ्यावी लागते. म्हणूनच तर आतापासूनच मलायका सांगतेय ती ३ आसनं करा आणि पोटावरची चरबी उतरवा... हिप्सवरील चरबी कमी करण्यासाठीही (how to reduce your weight) ही तीन आसने उपयुक्त ठरतील, असं मलायका सांगते आहे.
पोटावरची चरबी कमी करण्यासाठी ३ आसने१. नौकासन (benefits of naukasana in Marathi)नौकासन करण्याचे फायदे - पाेटावरची चरबी पटापट कमी करायचीअसेल तर नियमितपणे नौकासन करा आणि हळूहळू नौकासनाची आसनस्थिती टिकवण्याचा प्रयत्न् करा.- या आसनामुळे पोटाच्या स्नायुंचा व्यायाम होतो.- मांड्यांवरची चरबी देखील नौकासनाने कमी होते.- पोटाचे अनेक विकार नौकासनामुळे दूर होतात.कसे करायचे नौकासन- नौकासन करण्यासाठी सगळ्यात आधी पाठीवर झोपा.- त्यानंतर हळूहळू दोन्ही पाय वर उचला. त्यासोबतच डाेके, मान, छाती आणि दोन्ही हात देखील वर उचलण्याचा प्रयत्न करा. - ही अवस्था कमीतकमी ३० सेकंद टिकविण्याचा प्रयत्न करा.
२. भुजंगासन (benefits of bhujangasana in Marathi)भुजंगासन करण्याचे फायदे - भुजंगासन केल्यामुळे पोटाच्या स्नायुंवर ताण पडतो आणि पोटाचा चांगला व्यायाम होतो आणि त्यामुळे चरबी कमी होण्यास मदत होते.- छाती, खांदे, मान, हात, मांड्या या सगळ्यांच्या बळकटीसाठी भुजंगासन करणे फायद्याचे ठरते. - पाठीचे दुखणेही भुजंगासन नियमित केल्यामुळे कमी होते.- मासिक पाळीतील पोट दुखणे कमी करण्यासाठी नियमितपणे भुजंगासन करावे.कसे करायचे भुजंगासन- भुजंगासन करण्यासाठी जमिनीवर पालथे झोपा.- दोन्ही हात कोपऱ्यात वाकवून छातीजवळ दोन्ही बाजूंनी ठेवा.- यानंतर हळू हळू डोके, छाती पोटाचा कंबरेपर्यंतचा भाग हळूहळू उचला आणि शरीराचा भार दोन्ही हातांच्या तळव्यावर पेला.- यानंतर मान वर करा आणि नजर छताकडे स्थिर ठेवा.- ही आसनस्थिती ३० सेकंद टिकविण्याचा प्रयत्न करा.
३. पादोत्तानासन (benefits of padottanasana in Marathi)पादोत्तानासन करण्याचे फायदे - ही आसनस्थिती दंड, पोट, मांड्या आणि हिप्स या ठिकाणची चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. - या आसनाचा नियमित सराव केल्यास बॉडी टोन्ड होऊन शेपमध्ये ठेवण्यास खूपच मदत होते.- मानसिक ताण कमी करण्यासाठीही पादोत्तानासन करण्याचा सल्ला दिला जातो.
कसे करायचे पादोत्तानासन- पादोत्तानासन करण्यासाठी सगळ्यात आधी ताठ उभे रहा.- यानंतर दोन्ही पायांमधील अंतर वाढवत न्या.- दोन्ही हात मागच्या बाजूला नेऊन ते एकमेकात गुंफवून ठेवा.- यानंतर हळूहळू तोल कंबरेतून खाली वाका आणि डाेके जमिनीवर टेकविण्याचा प्रयत्न करा.- ही आसन स्थिती १५ ते २० सेकंद टिकविण्याचा प्रयत्न करा.