वजन कमी करण्यासाठी बरेच जण विविध उपाय करून पाहतात. सध्या लठ्ठपणाची (Weight loss) समस्या वाढत चालली आहे. बिघडलेल्या लाईफस्टाईलमुळे वजन तर वाढतेच, शिवाय इतरही आजार छळतात. त्यामुळे जीवनशैलीत काही विशेष हेल्दी बदल करणं गरजेचं आहे. अनेक जण वजन कमी करण्यासाठी दिवसभर मेहनत घेतात. पण रात्रीच्या वेळेस अशा काही चुका घडतात, ज्यामुळे वजन वाढते.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) च्या मते, 'खराब आहार आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे शरीरात अनेक आरोग्यच्या निगडीत समस्या वाढतात. त्यामुळे झोपण्याच्या वेळी किंवा त्याच्याआधी कोणत्या चुका टाळायला हव्या. हे प्रत्येकाला माहित असणं गरजेचं आहे'(4 Bedtime Habits That Are Making You Gain Weight).
वजन कमी करण्यासाठी रात्री कोणत्या चुका करणं टाळायला हवं
रात्रीच्यावेळी स्नॅक्स खाणं
दिवसभरातील कामाच्या गडबडीनंतर रात्रीच्या वेळी लोकं आपले आवडते पदार्थ खातात. किंवा टीव्ही, मोबाईल बघत तळकट, स्नॅक्सचे पदार्थ खातात. जे आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे झोपण्यापूर्वी स्नॅक्स खाणं टाळा. कारण झोपण्यापूर्वी स्नॅक्स खाल्ल्याने शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढते. रात्रीच्यावेळी आपल्या शरीराची हालचाल कमी असते. त्यामुळे डिनरनंतर किंवा डिनरच्यावेळी स्नॅक्स, तळकट किंवा साखरयुक्त पदार्थ खाणं टाळा.
वजन कमी करायचं असेल तर रात्री खा ३ पौष्टीक चटकदार सॅलेड, वजन होईल कमी
इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर टाळा
अनेकांना झोपेच्यावेळी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करण्याची सवय असते. काही लोकं अंथरुणावर स्मार्टफोन, टॅब्लेट किंवा लॅपटॉप यांसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरतात. त्याशिवाय काहींना झोपही लागत नाही. ही उपकरणे निळा प्रकाश उत्सर्जित करतात, ज्यामुळे शरीरातील मेलाटोनिनच्या उत्पादनामध्ये व्यत्यय येते. खराब झोपेमुळे हार्मोनल असंतुलन होते. ज्यामुळे रात्रीच्यावेळी अचानक भूक लागते.
स्ट्रेस
काहींना रात्रीच्यावेळी विविध गोष्टींचा विचार करून स्ट्रेस घ्यायची सवय असते. स्ट्रेस वाढले की विविध पदार्थ खाण्याची क्रेविंग्स होते. तणाव वाढले की शरीरात कॉर्टिसॉल हार्मोन्स वाढतात. ज्यामुळे भूक लागते, व भुकेमुळे आपली झोपही बिघडते.
फक्त २० मिनिटं रोज चालायची तयारी आहे? पोट कमी करण्याची आणि फिटनेस वाढवण्याची सोपी युक्ती
दिवसभर जेवण न करणे
अनेक जण वजन कमी करण्याच्या नादात दिवसभर काही खात नाही. किंवा एकवेळचं जेवण स्किप करतात. जेव्हा आपण दिवसभरात काही खात नाही, भूक मारतो. तेव्हा रात्रीच्या वेळी आपल्याला तीव्र भूक लागू शकते. दिवसभर अन्न स्किप केल्याने आपल्या शरीरातील उर्जेची पातळी देखील कमी होते.