स्ट्रेचिंग हा आपल्या शरीराची हालचाल करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. स्ट्रेचिंगमुळे आपल्या स्नायूंना आणि सांध्यांना प्रचंड फायदा होतो. जर आपण आपले शरीर वेळोवेळी स्ट्रेच केले नाही तर आपले स्नायू ताठ होऊ शकतात आणि दुखापत होण्याची देखील शक्यता असते. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे तसेच ऑफिसच्या कामानिमित्त किंवा इतर गोष्टींसाठी आपण बराच वेळ एका ठिकाणी बसून राहतो. अशावेळी आपल्या शरीराला स्ट्रेचिंगची खूपच गरज असते. आपल्या शारीरिक दुखापती टाळण्यासाठी आणि स्नायू बळकट करण्यासाठी स्ट्रेचिंगचा आपल्या व्यायामाच्या दिनक्रमात समावेश करणे फारच गरजेचे आहे.
नियमित स्ट्रेचिंग केल्याने त्रासदायक पाठीच्या आणि मानेच्या वेदनांना दूर ठेवू शकते. तसेच तुमचे बॉडी पोश्चर्स सुधारण्यास मदत करू शकते. नियमितपणे स्ट्रेचिंग हा स्वतःला तणावमुक्त करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे आणि तो मानसिक आरोग्यासाठीही उत्कृष्ट आहे. दिवसभर थकून आल्यावर आपल्याला रात्रीची झोप ही फारच महत्वाची असते. रात्री झोपताना आपण लगेच अंथरुणात पडून झोपी जातो, परंतु असे न करता झोपण्याआधी जर आपण थोडे स्ट्रेचिंग केले तर ते आपल्या शरीराला फायदेशीर ठरू शकते व शांत झोप येण्यास देखील मदत होते. झोपण्यापूर्वी कोणत्या प्रकारचे स्ट्रेचिंग करावेत हे लक्षात ठेवूयात(4 Bedtime Stretches That Will Help You Actually Get to Sleep).
झोपण्यापूर्वी करा थोडे स्ट्रेचिंग....
१. कॅट काऊ पोझ (Cat - Cow Pose) :- सर्वप्रथम वज्रासनात बसावे. त्यानंतर दोन्ही तळवे पसरवून जमिनीवर ठेवा आणि गायीप्रमाणे हातांचे पंजे आणि गुडघ्यावर उभे राहा. या अवस्थेत तुमच्या शरीराचा आकार मांजर किंवा गायीसारखा होतो. नंतर दीर्घ श्वास घ्या आणि पाठीचा कणा खाली वाकवा आणि मान वरच्या दिशेने उचलत काही वेळ याच स्थितीत रहा. त्यानंतर, श्वास सोडताना, पाठीचा कणा वरच्या दिशेने वळवा आणि मान खाली वाकवा आणि काही सेकंद या स्थितीत रहा. नंतर सामान्य स्थितीत परत या. योग्य परिणामांसाठी आपण हे योगासन ३ ते ५ वेळा पुन्हा करू शकता.
ग्रीन टी पिताना हमखास ५ चुका करताय? वजन तर कमी होणारच नाही उडेल झोप, बिघडेल तब्येत...
२. पपी पोझ (Puppy Pose) :- पपी पोझ यामध्ये कुत्र्याच्या लहान पिल्ला प्रमाणे आपल्याला जमिनीवर झोपायचे आहे म्हणून या योगा प्रकाराला पपी पोझ असे म्हटले जाते. सर्वप्रथम वज्रासनात बसावे. त्यानंतर दोन्ही तळवे पसरवून जमिनीवर ठेवा. आता गुडघ्यांवर जोर देऊन कमरेचा भाग वर उचलाव आपली हनुवटी समोर जमिनीला टेकवा. दोन्ही हात समोर सरळ रेषेत जमिनीला टेकलेले असू दयावेत.
सिधे रस्ते की उलटी चाल! डोकं फारच भंजाळलं, स्ट्रेस वाढला तर १ सोपा उपाय...
३. स्विम लेग्स (Swim Legs) :- स्विम लेग्स या प्रकारामध्ये आपल्याला पाण्यात पोहोताना जशी क्रिया करतो तशीच पायांची हालचाल करायची आहे. सर्वप्रथम पोटावर झोपून दोन्ही हातांचे कोपरे जमिनीला टेकवून त्यावर आपली हनुवटी ठेवून रिलॅक्स झोपावे. त्यानंतर आपले पाय गुडघ्यात दुमडून वर - खाली हलवावे.
४. स्कॉर्पियन पोझ (Scorpion Pose) :- सर्वप्रथम अंथरुणात पोट, छातीचा भाग जमिनीला टेकवून उलटे झोपावे. त्यानंतर आपले दोन्ही हात दोन्ही दिशांना लांब सोडावे. आता उजवा पाय उचलून तो मागच्या दिशेने डाव्या हाताजवळ नेऊन स्पर्श करावा. त्याचप्रमाणे डावा पाय उचलून उजव्या हाताजवळ न्यावा आणि उजव्या हातानं स्पर्श करत हा स्ट्रेचिंग व्यायाम पूर्ण करावा.
घोट - घोट पाणी पिण्याचा आहे खास नियम, लठ्ठपणा ते डिहायड्रेशन पर्यंतच्या समस्या होतील दूर...