Join us  

स्वयंपाकाला वापरुन पाहा मातीची भांडी, ४ फायदे, भरपूर पोषण मिळेल-पदार्थाला येईल दुप्पट चव...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2023 12:41 PM

4 benefits of cooking food in clay pot for good health : फक्त फॅशन म्हणून नाही तर पोषण मिळण्यासाठी करायला हवा या भांड्यांचा वापर...

आपण सगळेच स्वयंपाकासाठी स्टील, अॅल्युमिनिअम किंवा फारफारतर लोखंड आणि पितळ्याची भांडी वापरतो. पण मातीची भांडी आता रोजच्या स्वयंपाकासाठी वापरली जात नाहीत. फॅशन म्हणून वापरली जाणारी मातीची भांडी सगळ्यांनी वापरली तर आरोग्यासाठी ती अतिशय चांगली असतात. मातीच्या भांड्यात अन्न शिजवल्यास लोह, फायबर, कार्बोदके, फॉस्फरस, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मिळण्यास मदत होते, जे शरीरासाठी खूप फायदेशीर असते.

नव्या संशोधनानुसार, मातीच्या भांड्यात अन्न शिजवून खाल्यास कुपोषणाचे प्रमाण कमी होऊ शकते. एवढेच नाही, तर महिलांमधील अॅनिमिया तसेच खनिजांची कमतरता दूर करण्यासही याची मदत होते. आजकाल कढई, वेगवेगळ्या प्रकारचे पॉट, डाव, हंडी यांसारखी अतिशय सुंदर आकाराची मातीची भांडी बाजारात उपलब्ध असून आपल्या कुटुंबाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी आपण या भांड्याचा निश्चितच वापर करु शकतो.पाहूयात मातीची भांडी वापरण्याचे आरोग्यासाठी होणारे फायदे (4 benefits of cooking food in clay pot for good health)...

(Image : Google)

१. खनिजांचा उत्तम स्त्रोत

मातीच्या भांड्यात लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस चांगल्या प्रमाणात असते त्यामुळे शरीरातील खनिजांची कमतरता दूर होण्यास याचा चांगला उपयोग होतो. 

२. pH पातळी सुधारण्यास मदत 

मातीच्या भांड्यात असणारे क्षार अन्नातील रसायनांवर प्रक्रिया करतात. त्यामुळे अन्नातील pH पातळी वाढते आणि अन्नाचे पोषण वाढण्यास मदत होते. म्हणून मातीच्या भांड्यात शिजवलेले अन्नपदार्थ अधिक पोषक ठरतात. 

३. अन्न चांगले शिजण्यास मदत

मातीच्या भांड्यात असणारी लहान छिद्र आग आणि ओलावा समान रीतीने सगळीकडे पसरण्यास मदत करतात ज्यामुळे अन्नातील पोषक तत्त्व सुरक्षित राहतात.

(Image : Google)

४. हृदयासाठी चांगले

मातीच्या भांड्यात अन्न शिजवताना नकळत तेल कमी प्रमाणात वापरले जाते. मातीमुळे अन्नात नैसर्गिक तेल आणि ओलावा टिकण्यास मदत होते अशावेळी शिजवलेले अन्न हृदयासाठी उपयुक्त ठरते. 

टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.