Lokmat Sakhi >Fitness > दोडका लाडका नसेलही, पण दोडक्याची भाजी खाण्याचे ४ फायदे वाचा, नक्की खाल दोडक्याची भाजी

दोडका लाडका नसेलही, पण दोडक्याची भाजी खाण्याचे ४ फायदे वाचा, नक्की खाल दोडक्याची भाजी

4 benefits of eating tori or ridge gourd दोडके अनेकांना आवडत नाहीत, पण दोडक्याची भाजी अतिशय पौष्टिक.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2023 04:34 PM2023-09-11T16:34:42+5:302023-09-11T16:36:01+5:30

4 benefits of eating tori or ridge gourd दोडके अनेकांना आवडत नाहीत, पण दोडक्याची भाजी अतिशय पौष्टिक.

4 benefits of eating tori or ridge gourd | दोडका लाडका नसेलही, पण दोडक्याची भाजी खाण्याचे ४ फायदे वाचा, नक्की खाल दोडक्याची भाजी

दोडका लाडका नसेलही, पण दोडक्याची भाजी खाण्याचे ४ फायदे वाचा, नक्की खाल दोडक्याची भाजी

'कीस बाई कीस दोडका कीस' हे गीत आपण मंगळागौरीत ऐकलेच असेल. काहींना दोडका ही भाजी आवडते, तर काही लोकं नाक मुरडत ही भाजी खातात. भारतीय थाळीमध्ये अनेक पालेभाज्यांचा समावेश आहे. हिरव्या भाज्यांमध्ये फायबर, खनिजे आणि जीवनसत्त्वांचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. यातीलच एक भाजी म्हणजे दोडका. याला तोराईची भाजी असेही म्हणतात. दोडका पचायला हलकी असते.

दोडक्यात दाहक-विरोधी, अँटी-बॅक्टेरियल, आयर्न, कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम याबरोबरच जीवनसत्त्व ए, बी, सी, फ्लोरिन आणि आयोडीन यांसारखे पोषक घटक असतात. दोडका खाल्ल्याने हाडं तर मजबूत होतातच, शिवाय ब्लड शुगर आणि वजन देखील नियंत्रित राहते. दोडका आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, याची माहिती लखनौस्थित सेंट्रल कमांड हॉस्पिटलचे आहारतज्ज्ञ रोहित यादव यांनी दिली आहे(4 benefits of eating tori or ridge gourd).

दोडका खाण्याचे ४ आरोग्यदायी फायदे

रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते

दोडका खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. याचे नियमित सेवन केल्याने हवामानातील बदलांदरम्यान होणाऱ्या आजारांपासून सरंक्षण होते. यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात आढळते. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती बुस्ट होते.

दररोज मुठभर भाजलेले चणे खाण्याचे ६ फायदे, फक्त स्नॅक्स म्हणून खाऊ नका - आनंदाने खा पोटभर

कंट्रोलमध्ये राहते ब्लड शुगर

मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी दोडका फायदेशीर ठरते. दोडक्यामध्ये पेप्टाइड्स आणि अल्कलॉइड्स असते. जे चयापचय वाढवण्याचे काम करतात. दोडका खाल्ल्याने इन्शुलिनची पातळी देखील नियंत्रित राहते. त्यामुळे  तज्ज्ञ दोडका खाण्याचा सल्ला देतात.

वजन राहते नियंत्रणात

अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी दोडका मदत करते. दोडक्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. व फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पोट बराच काळ भरलेले राहते. यासह पचनाच्या निगडीत त्रास होत नाही. जर आपल्याला वेट लॉस करायचं असेल तर, आपल्या आहारात दोडक्याचा नक्कीच समावेश करा.

दूध प्यायले नाही तर काय होईल? कॅल्शियमच्या कमतरतेव्यतिरिक्त शरीरात आणखी काय बदल घडतील?

रक्ताची कमतरता भरून निघते

लोह, व्हिटॅमिन बी आणि सीने परिपूर्ण दोडका आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यातील आयर्नमुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते, व व्हिटॅमिन बी ६ शरीरात लाल रक्तपेशी तयार करण्यात मदत करते. जर आपण दोडक्याचा आहारात समावेश करीत असाल तर, शरीरातील रक्ताची कमतरता दूर होईल. 

Web Title: 4 benefits of eating tori or ridge gourd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.