व्यायाम हा फक्त सकाळी होतो, सायंकाळी होत नाही (Workout). असा काहींचा समज आहे. सकाळी व्यायाम केल्याने माणूस फिट राहतो. सायंकाळी व्यायाम केल्याने शरीरात बदल घडत नाही, असे म्हटले जाते (Weight Loss). हे कितपत खरं आहे? सकाळपेक्षा दुपारी आणि संध्याकाळी व्यायाम करताना त्यांना अधिक ऊर्जा मिळत असल्याचा अनुभव अनेकजण सांगतात (Evening Exercise).
व्यायामाला वेळ नसतो. पण वेळ मिळेल तसा व्यायाम करायला हवा. बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना सकाळी व्यायाम करायला वेळ मिळत नाही. अशावेळी आपण सायंकाळच्या वेळीही व्यायाम करून स्वतःला तंदुरुस्त ठेऊ शकता. सायंकाळी व्यायाम करण्याचे फायदे किती? याची माहिती माय हेल्थबडीचे फिटनेस प्रशिक्षक आरुषी वर्मा यांनी दिली आहे(4 benefits of evening workout you should know).
व्यायामासाठी अधिक वेळ देता येतो
सायंकाळी व्यायाम करण्याचे अनेक फायदे आहेत. यावेळी ऑफिसला जाण्यासाठी किंवा इतर कोणतेही काम करण्याची घाई नसते. अशा स्थितीत आपल्याला व्यायामासाठी भरपूर वेळ मिळतो.
स्ट्रेस फ्री राहण्यास मदत
धकाधकीच्या जीवनात लोक तणावाला बळी पडत आहेत. संध्याकाळी व्यायाम केल्याने दिवसभराचा थकवा आणि तणाव दूर होतो. व्यायाम केल्याने कॉर्टिसोल हार्मोनची पातळी कमी होते आणि एंडोर्फिन हार्मोन रिलीज होते. यामुळे तणाव दूर होतो, आणि आपण स्ट्रेस फ्री राहतो.
चांगली झोप
जर आपल्याला सायंकाळी झोप येत नसेल तर, सायंकाळी व्यायाम करणे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. संध्याकाळी व्यायाम केल्याने स्नायूंना आराम मिळतो, ज्यामुळे शरीर आरामदायी स्थितीत जाते. तसेच, संध्याकाळी व्यायाम केल्याने मानसिक ताण कमी होतो, ज्यामुळे रात्री चांगली झोप येण्यास मदत होते.
ना रवा - ना इनो; १० मिनिटात इन्स्टंट कुरकुरीत डोसा करण्याची सोपी कृती; नाश्ता होईल झटपट
वेट लॉससाठी मदत
दिवस सरल्यानंतर व्यायाम केल्याने उर्जा वाढते. ज्यामुळे आपण अधिक वेळ व्यायाम करतो. शिवाय सायंकाळी व्यायाम केल्याने सातत्य राहते. ज्यामुळे दांड्या न मारता आपण नियमित व्यायाम करतो, आणि वेट लॉसही होतेच.