Lokmat Sakhi >Fitness > दीपीका ते आलिया-अभिनेत्रींसारखी फिगर हवी? आहारतज्ज्ञ सांगतात, ४ सोपे बदल- पोट कमी-दिसाल फिट

दीपीका ते आलिया-अभिनेत्रींसारखी फिगर हवी? आहारतज्ज्ञ सांगतात, ४ सोपे बदल- पोट कमी-दिसाल फिट

4 Best Celebrity Flat Belly Tricks, According to Dietitians : तज्ज्ञांनी सांगितलं अभिनेत्रींचं वेट लॉस सिक्रेट! फक्त दररोज ४ गोष्टी न चुकता करा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2024 02:00 PM2024-04-11T14:00:08+5:302024-04-11T14:47:13+5:30

4 Best Celebrity Flat Belly Tricks, According to Dietitians : तज्ज्ञांनी सांगितलं अभिनेत्रींचं वेट लॉस सिक्रेट! फक्त दररोज ४ गोष्टी न चुकता करा..

4 Best Celebrity Flat Belly Tricks, According to Dietitians | दीपीका ते आलिया-अभिनेत्रींसारखी फिगर हवी? आहारतज्ज्ञ सांगतात, ४ सोपे बदल- पोट कमी-दिसाल फिट

दीपीका ते आलिया-अभिनेत्रींसारखी फिगर हवी? आहारतज्ज्ञ सांगतात, ४ सोपे बदल- पोट कमी-दिसाल फिट

बऱ्याचदा अभिनेत्रींकडे पाहिल्यावर आश्चर्य वाटतं, की त्या स्वतःला मेन्टेन ठेवण्यासाठी काय करीत असतील बुवा? कर्व्ही कंबर, टोन्ड बॉडी आणि परफेक्ट फिगरमागील रहस्य काय? याचा विचार आपण करतो (Fitness). परफेक्ट फिगरमागे सेलिब्रिटी प्रचंड मेहनत घेत असतात (Weight Loss). तंदुरुस्त राहण्यासाठी आणि सुंदर दिसण्यासाठी, अभिनेत्री त्यांच्या आहार आणि जीवनशैलीकडे बारकाईने लक्ष देतात.

अनुष्का शर्मा, शिल्पा शेट्टी, रकुल प्रीत सिंग आणि करीना कपूर यांसारख्या अनेक अभिनेत्री आहेत, ज्या अनेकदा त्यांच्या फिटनेस रूटीनबद्दल बोलताना दिसतात. जर आपल्या अभिनेत्रींप्रमाणे सडपातळ फिगर आणि सपाट पोट हवं असेल तर, आहारतज्ज्ञ नंदिनी यांनी सांगितलेल्या टिप्स फॉलो करून पाहा. आपल्याला अभिनेत्रींप्रमाणे परफेक्ट फिगर मिळेल(4 Best Celebrity Flat Belly Tricks, According to Dietitians).

सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्या

लिंबू शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. शिवाय फॅट बर्नर म्हणून काम करते. नियमित लिंबू पाणी प्यायल्याने शरीरात साचलेली हट्टी चरबी बर्न होते. विशेषतः पोट आणि कंबरेभोवती जमा झालेली चरबी कमी करण्यास मदत करते. यासाठी रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्या. अनेक सेलिब्रिटी हे मॉर्निंग ड्रिंक म्हणून घेतात.

बॅड कोलेस्टेरॉल ते वेट लॉस : 'ही' दाक्षिणात्य पांढरी चटणी खाल्ल्याने शरीराला मिळतील ५ फायदे

बाजरीची भाकरी खा

बाजरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. अनुष्का शर्माने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की तिला क्विनोआ, राजगिरा, ज्वारी आणि नाचणीची भाकरी खायला आवडते. यामध्ये भरपूर पोषक तत्वे असतात. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि वजन कमी करणे सोपे होते. शिवाय यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस यासारखे घटक आढळतात. ज्यामुळे आरोग्य सुदृढ राहते.

रात्रीचे जेवण वेळेवर करा

सुडौल शरीर हवं असेल तर, खाण्यापिण्याच्या ठराविक वेळेकडे लक्ष ठेवा. याशिवाय रात्रीचे जेवण लवकर करणे आवश्यक आहे. रात्रीचे जेवण लवकर आणि हलके करावे. रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपू नका. शिवाय रात्रीचे जेवण आणि झोप यात काही तासांचे अंतर ठेवा. कारण उशीरा जेवल्याने अन्न पचत नाही. ज्यामुळे वजन वाढते. म्हणून सकस आणि हलका आहार घ्यावा.

मेंदू करेल सुपरफास्ट काम-येईल तरतरी! बाबा रामदेव सांगतात भिजवलेल्या बदामासोबत खा ३ गोष्टी

व्यायाम करा

वजन कमी करण्यासाठी शारीरिक हालचाल महत्वाची. दिवसाच्या कोणत्याही वेळी व्यायाम करा. व्यायामासाठी एक वेळ सेट करा. कंबरेची साईज कमी करण्यासाठी अनेक योगासने आहेत, ती योगासने करा. 

Web Title: 4 Best Celebrity Flat Belly Tricks, According to Dietitians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.