Lokmat Sakhi >Fitness > वजन वाढले-पोट सुटले? कोमट पाण्यात चिमूटभर ४ पदार्थ घालून प्या, वजन होईल कमी

वजन वाढले-पोट सुटले? कोमट पाण्यात चिमूटभर ४ पदार्थ घालून प्या, वजन होईल कमी

4 Best Herbs And Spices For Weight Loss : स्वयंपाकघरातील अनेक मसाले आपल्या तब्येतीसाठी वरदान म्हणून काम करतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2024 05:24 PM2024-01-31T17:24:32+5:302024-01-31T17:25:31+5:30

4 Best Herbs And Spices For Weight Loss : स्वयंपाकघरातील अनेक मसाले आपल्या तब्येतीसाठी वरदान म्हणून काम करतात.

4 Best Herbs And Spices For Weight Loss | वजन वाढले-पोट सुटले? कोमट पाण्यात चिमूटभर ४ पदार्थ घालून प्या, वजन होईल कमी

वजन वाढले-पोट सुटले? कोमट पाण्यात चिमूटभर ४ पदार्थ घालून प्या, वजन होईल कमी

वजन वाढलं (Weight Loss) की सौंदर्यात बाधा निर्माण होते असे म्हणतात. 'अगं किती जाड झालीय', 'वजन कमी करायचंय मग व्यायाम कर', 'भात, तळकट पदार्थ, यासह अनहेल्दी पदार्थ खाणं सोडून दे'. असे अनेक उपाय आपल्याला सांगण्यात येतात. वजन वाढायला वेळ लागत नाही. पण कमी करताना घाम निघतो. काहींना बिघडलेली जीवनशैली आणि कामाच्या व्यापामुळे स्वतःकडे लक्ष द्यायला जमत नाही. जर आपल्याला व्यायामाकडे पुरेपुर लक्ष द्यायला जमत नसेल तर, घरातल्या मसाल्यांचा वापर करूनही वजन कमी करता येऊ शकते.

भारतीय मसाले फक्त पदार्थाची चव वाढवत नसून, तर आरोग्यासाठी फायदेशीर आणि वजन कमी करण्यासही मदत करू शकते (Fitness Tips). जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर, कोमट पाण्यात ४ मसाले घालून प्या. यामुळे नक्कीच चरबी घटेल(4 Best Herbs And Spices For Weight Loss).

अशा पद्धतीने तयार करा वेट लॉस ड्रिंक

साहित्य

जिरं

बडीशेप

दालचिनी

ओवा

कृती

खा मेथी व्हा बारीक! हिवाळ्यात मेथी खा भरपूर - पोट होईल कमी आणि वजनही उतरेल

सर्वप्रथम, तवा गरम करण्यासाठी ठेवा. नंतर त्यात समप्रमाणात जिरं, बडीशेप, दालचिनी आणि ओवा घालून भाजून घ्या. मसाले भाजून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून त्याची बारीक पावडर तयार करून घ्या. अशा प्रकारे वेट लॉस पावडर तयार. रात्रीच्या जेवणानंतर आपण वेट लॉस ड्रिंक पिऊ शकता. वेट लॉस ड्रिंक करणे सोपे आहे, यासाठी एका ग्लासमध्ये कोमट पाणी घ्या. त्यात एक चमचा वेट लॉस पावडर घालून मिक्स करा. आपण हे ड्रिंक जेवणानंतर किंवा सकाळी रिकाम्या पोटी पिऊ शकता.

वेट लॉस ड्रिंक पिण्याचे फायदे

जिरे

फोडणीमध्ये जिरे घालताच पदार्थाची रंगत वाढते. पण याचे फायदे देखील अनेक आहेत. मुख्य म्हणजे कोमट पाण्यात जिरे घातल्याने वजन कमी करण्यास मदत होते. यात अँटी-ऑक्सिडेंट्स आणि फायबर असतात. जे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. शिवाय यामुळे पचनक्रियाही सुधारते.

बडीशेप

माऊथ फ्रेशनर म्हणून बडीशेप खाल्ली जाते. शिवाय मसाल्यांमध्येही वापरली जाते. बडीशेपमध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, खनिज यासह इतर घटक आढळतात. जे वजन कमी करण्यास मदत करतात. यासह बडीशेपचे चूर्ण खाल्ल्याने पोटाचे विकार दूर होतात.

काय सांगता! फळांचा रस प्यायल्याने वाढते वजन? काय खरं काय खोटं? संशोधक सांगतात..

दालचिनी

दालचिनीमध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, फॉस्फरस, सोडियम, पोटॅशियम, थायामिन, रिबोफ्लेविन, नियासिन, जीवनसत्त्वे ए आणि सी असतात. ज्याचा फायदा आरोग्याला तर होतोच, शिवाय वजनही कमी करण्यास मदत होते. दालचिनीचा चहा नियमित प्यायल्याने लठ्ठपणा आणि पोटाची चरबी कमी करण्यास मदत होते.

ओवा

ओवा हा भारतीय स्वयंपाकघरातील अत्यंत कॉमन पदार्थ आहे. ओव्याचे पाणी प्यायल्याने पोट आणि कंबरेची चरबी कमी होते. ओव्यामध्ये आयोडिन, फॉस्फरस, कॅल्शियम आणि पोटॅशियम असते. ज्यामुळे वजन कमी करण्यापासून ते पोटाचे विकार यासह इतर गंभीर आजार दूर करण्यास मदत करते.

Web Title: 4 Best Herbs And Spices For Weight Loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.