Join us  

चरबी वाढल्याने दंड खूपच जाडजूड दिसतात? ४ व्यायाम रोज करा, हात दिसतील नाजूक- देखणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2024 9:16 AM

4 Best Ways to Lose Arm Fat: दंडावरची चरबी वाढल्याने हात खूपच जाड, गोल गरगरीत दिसत असतील तर सुटलेल्या दंडांचा घेर कमी करण्यासाठी हे काही व्यायाम करून पाहा..(simple exercise to reduce biseps fat)

ठळक मुद्देदंडांवरची चरबी कमी होण्यास निश्चितच मदत होईल, शिवाय शरीराचा व्यायाम होऊन इतरही अनेक लाभ होतील.

डॉ. अंबिका याडकीकरफिजिओथेरपीस्ट

काही जणींचे बाकी शरीर व्यवस्थित शेपमध्ये असते. पण दंडावरची चरबी वाढलेली असल्याने हात मात्र शरीरापेक्षा जास्त गोलगरगरीत दिसू लागतात. अशावेळी मग मेगा स्लिव्ह्ज असणारे किंवा स्लिव्हलेस कपडे घालायला नकोसं वाटतं. म्हणूनच तुमच्या शरीराप्रमाणे हात आणि विशेषत: दंड पुर्णपणे शेपमध्ये आणायचे असतील तर हे काही व्यायाम नियमितपणे करून पाहा (how to reduce arm fat?). यामुळे दंडांवरची चरबी कमी होण्यास निश्चितच मदत होईल (4 Best Ways to Lose Arm Fat), शिवाय इतर शरीराचा व्यायाम होऊन इतरही अनेक लाभ होतील.(simple exercise to reduce biseps fat)

 

दंडावरची चरबी कमी करण्यासाठी व्यायाम

१. हाताची हालचाल

तुम्ही योग्य पद्धतीने हाताची हालचाल केली तर दंडावरची चरबी कमी होण्यास निश्चितच मदत होईल. यासाठी सुरुवातीला दोन्ही हात वर- खाली याप्रमाणे हलवा.

मनी प्लांट वाढतच नाही? मातीत टाका 'ही' खास गोष्ट, मनी प्लांट वाढेल भराभर- कधीच सुकणार नाही

एक हात वर असताना दुसरा हात खाली असावा, अशा पद्धतीने प्रत्येकी ५- ५ वेळा हातांची हालचाल करा. त्यानंतर क्लॉकवाईज आणि ॲण्टीक्लॉकवाईज अशा पद्धतीने गोलाकार हात फिरवा. दोन्ही हात शक्यतो एकाच वेळी फिरवले तर अधिक उत्तम. यामुळे पाठीची हाडंही मोकळी होण्यास मदत होते. 

 

२. भुजंगासन

भुजंगासन करण्यासाठी पोटावर झोपा. त्यानंतर दोन्ही तळहात छातीच्या बाजुला ठेवून डोके, मान, छाती, पोट उचलण्याचा प्रयत्न करा. यामुळे हातावर जोर येतो आणि हाताची चरबी कमी होण्यास मदत होते.

कितीही आवरलं तरी कपाटात कपड्यांचा पसाराच होतो? ३ टिप्स- कपाट नेहमीच राहील नेटकं- टापटीप

३. प्लँक

या प्रकारातले व्यायाम नियमितपणे केल्यासही हातावरची, दंडावरची चरबी कमी होते. तसेच हातांचे स्नायू बळकट होऊन हात मजबूत होण्यास मदत होते.

 

४. चतुरंग दंडासन

हा व्यायाम करण्यासाठी पोटावर झोपा. त्यानंतर तळहात आणि पायाची बोटे जमिनीवर टेकवून बाकी सगळे शरीर उचलण्याचा प्रयत्न करा. हा व्यायाम नियमितपणे केल्यास हातावरची चरबी कमी होण्यास तसेच पोट कमी होण्यास निश्चितच मदत होईल. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायाम