Lokmat Sakhi >Fitness > घर-ऑफिस-हजार कामं, व्यायामाला वेळच नाही? फक्त १० मिनीटांत करा ४ सोपे व्यायाम - व्हा फिट

घर-ऑफिस-हजार कामं, व्यायामाला वेळच नाही? फक्त १० मिनीटांत करा ४ सोपे व्यायाम - व्हा फिट

4 Easy Yoga asanas for Working Women Fitness Tips : १० मिनीटे तरी योगासने करायलाच हवीत. ज्यामुळे शरीराचे आणि मनाचे आरोग्य चांगली राहायला मदत होईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2022 12:55 PM2022-12-01T12:55:48+5:302022-12-01T12:57:47+5:30

4 Easy Yoga asanas for Working Women Fitness Tips : १० मिनीटे तरी योगासने करायलाच हवीत. ज्यामुळे शरीराचे आणि मनाचे आरोग्य चांगली राहायला मदत होईल.

4 Easy Yoga asanas for Working Women Fitness Tips : Home - office - thousand tasks, no time for exercise? Do 4 Easy Exercises in Just 10 Minutes - Get Fit | घर-ऑफिस-हजार कामं, व्यायामाला वेळच नाही? फक्त १० मिनीटांत करा ४ सोपे व्यायाम - व्हा फिट

घर-ऑफिस-हजार कामं, व्यायामाला वेळच नाही? फक्त १० मिनीटांत करा ४ सोपे व्यायाम - व्हा फिट

Highlightsकितीही बिझी असाल तरी स्वत:साठी, आरोग्यासाठी थोडा वेळ द्यायलाच हवा.दिवसातील १० मिनीटे काढून काही योगासने आणि प्राणायाम केला तर त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो

सकाळी डोळे उघडले की नाश्ता काय करायचा, स्वयंपाकाची तयारी, मुलांच्या शाळेची तयारी, साफसफाई आणि आवरुन ऑफीसला जाण्याची घाई. संध्याकाळी घरी आले की रात्रीचा स्वयंपाक आणि मागची कामे. त्यातच येणारे सणवार, घरातील आजारपणं असं सगळं करता करता महिलांना आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळतोच असे नाही. सगळ्या धावपळीत जिथे नीट बसून खायला वेळ होत नाही अशात व्यायामाला तर फुरसतच मिळत नाही. आरोग्य उत्तम ठेवायचं तर व्यायाम करायलाच हवा हे आपल्याला माहित असते खरे पण प्रत्यक्षात काही ना काही कारणाने आपले त्याकडे दुर्लक्ष होत राहते. मात्र शरीराला थोडा तरी व्यायाम हवाच, त्यामुळे तुम्ही वर्किंग असाल तर किमान १० मिनीटे तरी आवर्जून काही योगासने करायलाच हवीत. ज्यामुळे शरीराचे आणि मनाचे आरोग्य चांगली राहायला नक्कीच मदत होईल. यासाठी कोणती योगासने करायची पाहूया (4 Easy Yoga Asanas for Working Women Fitness Tips)...

(Image : Google)
(Image : Google)

१. नौकासन 

पाठीवर झोपून हात आणि पाय एकाचवेळी वर उचलण्याचे हे आसन पाहायला सोपे वाटत असले तरी करायला थोडे कठिण असते. यामध्ये शरीर नौकेसारखे दिसते, मात्र केवळ कंबरेच्य भागावर शरीराचा भार पेलणे ही थोडी कसरत असते. यामध्ये शरीराच्या सर्व स्नायूंना ताण पडत असल्याने हे आसन उपयुक्त ठरते. 

२. वशिष्ठासन 

एक हात जमिनीवर ठेवून त्यावर संपूर्ण शरीराचा भार पेलण्याचे हे आसन आहे. दोन्ही पाय एकमेकांवर एका सरळ रेषेत ठेवून दुसरा हात सरळ वर करायचा. यामध्येही पाय, पाठ, खांदे, हात अशा शरीराच्या सर्व अवयवांवर ताण येतो. 

३. भ्रामरी प्राणायाम

आपण अनेकदा ओंकार म्हणतो किंवा श्वसनाचे, प्राणायमाचे इतर प्रकार करतो. पण भ्रामरी आपण फारसा करत नाही. मात्र भ्रामरी प्राणायमामुळे शरीराला आणि मनाला बरेच फायदे होतात. डोके शांत करण्याबरोबरच, ताण दूर करण्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी भ्रामरी उपयुक्त ठरतो.  

(Image : Google)
(Image : Google)

४. अनुलोम-विलोम 

प्राणायमातील हा अतिशय महत्त्वाचा प्रकार असून शरीरातील अशुद्ध हवा बाहेर पडण्यासाठी या आसनाचा अतिशय चांगला उपयोग होतो. एक नाकपुडी बंद करुन श्वास घेणे आणि दुसऱ्या नाकपुडीने बाहेर सोडणे यामुळे श्वसनमार्ग मोकळा होण्यास फायदा होतो. 

 

Web Title: 4 Easy Yoga asanas for Working Women Fitness Tips : Home - office - thousand tasks, no time for exercise? Do 4 Easy Exercises in Just 10 Minutes - Get Fit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.