Lokmat Sakhi >Fitness > दंड खूपच जाड, गुबगुबीत दिसतात? स्लिव्हजलेस घालणं टाळता; ४ उपाय, टोन्ड दिसतील आर्म्स

दंड खूपच जाड, गुबगुबीत दिसतात? स्लिव्हजलेस घालणं टाळता; ४ उपाय, टोन्ड दिसतील आर्म्स

4 Effective arm fat loss exercise at home : काहीजणी तर दंडाची चरबी दिसेल म्हणून  स्लिव्हजलेस ब्लाऊज घालणंही टाळतात. (Arm Fat loss Tips)

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 12:40 PM2023-06-09T12:40:32+5:302023-06-09T16:36:09+5:30

4 Effective arm fat loss exercise at home : काहीजणी तर दंडाची चरबी दिसेल म्हणून  स्लिव्हजलेस ब्लाऊज घालणंही टाळतात. (Arm Fat loss Tips)

4 Effective arm fat loss exercise at home : How To Reduce Arm Fat Quickly | दंड खूपच जाड, गुबगुबीत दिसतात? स्लिव्हजलेस घालणं टाळता; ४ उपाय, टोन्ड दिसतील आर्म्स

दंड खूपच जाड, गुबगुबीत दिसतात? स्लिव्हजलेस घालणं टाळता; ४ उपाय, टोन्ड दिसतील आर्म्स

पोट आणि कंबरेची चरबी वाढली कमी करणं कठीण होतं. त्याचप्रमाणे जर  दंडाची चरबी वाढली तरही ओव्हरऑल आरोग्यावर याचा परीणाम होतो. (How To Reduce Arm Fat Quickly) लोकांचं लक्ष आपल्या शरीरावर जमा झालेल्या फॅट्सकडे आधी जातं.  म्हणूनच शरीरासाठी व्यायाम करणं फायदेशीर ठरतं (Weight Loss Tips) खासकरून जे लोक स्लिव्हजलेस घालतात त्यांचे हात जास्त गुबगुबित दिसतात. काही सोपे घरगुती उपाय तुम्हाला टोन्ड आर्म्स मिळवून देण्यात मदत करू शकतात. काहीजणी तर दंडाची चरबी दिसेल म्हणून  स्लिव्हजलेस ब्लाऊज घालणंही टाळतात. (Arm Fat loss Tips)

१) फिजिकल ट्रेनिंग

रोज एक तासतरी स्वत:साठी काढा. घरच्याघरी तुम्ही फिजिकल ट्रेनिंग करू शकता. यासाठी तुम्ही कोणत्याही सर्टिफाईड फिटनेस ट्रेनरची मदत घेऊ शकता किंवा युट्यूबवर व्हिडिओज पाहून  व्यायाम सुरू ठेवा. उड्या मारणं, सायकलिंग, जंपिग जॅक हे व्यायाम तुम्ही घरीच करू शकता.

२) पतंग उडववणं

भारतात पतंग उडवण्याची आवड अनेकांना असते.  कोणत्याही वयोगटातील लोक पतंग उडवण्याचा आनंद घेतात. यामुळे तुमच्या संपूर्ण शरीराचा व्यवस्थित व्यायाम होतो. याशिवाय शरीर एर्नेजेटिक राहते आणि मेंदू एक्टिव्ह राहतो.  कारण पतंग उडवताना आपण खूपदा मांजा वर खाली खेचतो. त्यामुळे हातांचा व्यायाम होतो आणि मेंदूही एक्टिव्ह राहतो आणि आर्म फॅट हळू हळू कमी होत जातं. 

नसांमधलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतात पेरूची पानं; असा करा वापर, हृदयाचे गंभीर आजार टळतील

३) दोरी उड्या

दोरी उड्या तुम्हाला फिजिकली आणि मेंटली फिट ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. ही एक्टिव्हीटी करत असताना तुमच्या संपूर्ण शरीराची हालचाल होते. यात पाय आणि हातांची जास्तीत जास्त मुव्हमेंट होते. म्हणूनच आर्म फॅट कमी करणं सोपं होतं.  हा व्यायाम केल्यानं तुमच्या ओव्हरऑल बॉडी शेपमध्येही सुधारणा होते. रोज १५ ते २० मिनिटं स्किपिंग केल्यास तुम्ही वजन आरामात कमी करू शकता. 

४) शोल्डर टॅप

हा व्यायाम करायला अगदी सोपा आहे. शोल्डर टॅप व्यायामामुळे शरीराचे स्नायू बळकट होण्यास मदत होते. हा व्यायाम करण्यासााठी सगळ्यात आधी तुम्हाला जमिनीवर मॅट घालावी लागेल. या मॅटवर सगळ्यात आधी उलटे झोपा नंतर हातांचे पंजे आणि पायांच्या बोटांवर शरीर वर उजला. शरीर वर उचलल्यानंतर या स्थितीत आपल्या डाव्या हातानं उजव्या खांद्यावर मारा आणि उजव्या हातानं डाव्या खांद्यावर मारा. २० वेळा  ३ सेट्स करा. यामुळे  आर्म्स टोन्ड होण्यास मदत होईल.

Web Title: 4 Effective arm fat loss exercise at home : How To Reduce Arm Fat Quickly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.