वजन वाढीची समस्या ही जागतिक समस्या बनत चालली आहे. बिघडलेली जीवनशैली, योग्य आहाराचे सेवन न करणे, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव या कारणांमुळे वजन झपाट्याने वाढते. सध्या लोकांमध्ये स्ट्रीट फूड खाण्याची क्रेज वाढली आहे. अधिक फॅट, साखरयुक्त पदार्थ आणि कॅलरीयुक्त पदार्थ खाल्ल्यामुळे वजन तर वाढतेच, यासह शरीराचा आकार देखील बिघडतो.
ज्यामुळे कोणतेही कपडे परिधान केल्यानंतर शरीर बेढब दिसते. मुख्य म्हणजे कंबरेवरील साईड फॅट्समुळे शरीर आकारहीन दिसते. जर आपल्याला साइड फॅट्स झपाट्याने कमी करायचं असेल तर, या ४ व्यायाम करून पाहा. या व्यायामांमुळे फॅट्स कमी होईल, व शरीर सुडौल दिसेल(4 Effective Exercises To Reduce Side Fat).
रशियन ट्विस्ट
रशियन ट्विस्ट करण्यासाठी, आपले गुडघे वाकवून आणि पाय जमिनीवर सपाट ठेवून ताठ बसा. नितंबाच्या मदतीने शरीराचा समतोल जमिनीवर ठेवा. हे करत असताना, पाठ ४५ अंशांवर झुकलेली असावी. आत दोन्ही हातात उशी धरा. पाठ थोडी झुकवून कमरेचे स्नायू घट्ट करा. त्यानंतर हातातील उशी प्रथम डावीकडे आणि नंतर उजवीकडे वळवा. डावीकडे किंवा उजवीकडे टर्न होत असताना नितंब स्थिर एका जागेवर ठेवून कमरेतून झुका. असे किमान १५ ते २० वेळा करा.
बॅड कोलेस्टेरॉल कमी करायचं तर ५ प्रकारच्या बिया आहारात हव्याच, दिल-दिमाग दोन्ही तंदुरुस्त
वेगाने पायऱ्या चढणे
पायऱ्यांवर वेगाने चालत गेल्याने शरीरातील चरबी वितळते. यामुळे पोटाच्या सभोवतालच्या स्नायूंमध्येही भर पडते आणि ती हळूहळू कमी होऊ लागते. यासह शरीराला योग्य आकार मिळतो. यासाठी नियमित १० ते १५ मिनिटे पायऱ्या चढा किंवा टेकडीवर वेगाने चालत जा. यामुळे हृदयाचे ठोके वाढतील, यासह वजन देखील कमी होईल.
ट्रेडमिल वर्कआउट
वजन कमी करणे यासह शरीराला आकार देण्यासाठी ट्रेडमिल हा व्यायाम करणे उत्तम ठरू शकते. यासाठी १० ते १५ मिनिटे ट्रेडमिलवर चाला. सुरुवातीला ट्रेडमिलचा वेग कमी ठेवा. त्यानंतर वेग आपल्या सोयीनुसार वाढवू शकता. १० मिनिटे नियमित जॉगिंग करा. जर आपले वजन जास्त असेल तर, फक्त वॉक करा. कारण यामुळे गुडघ्यांवर ताण पडू शकतो.
अल्कलाइन पाणी प्या, ॲसिडिटीसह-वजन होईल कमी! -आध्यात्मिक गुरु श्री.श्री. रविशंकर यांचा विशेष सल्ला
प्लँक ट्विस्ट
प्लँक ट्विस्ट हा व्यायाम करताना कंबरेवरील साईड फॅट्स कमी होतात. हा व्यायाम करण्यासाठी आपण प्लॅंक करतो तशी पोझिशन घ्यावी. त्यानंतर दोन्ही पायांचे तळवे सोबतच एकदा उजवीकडे तर नंतर डावीकडे वळवावे. असे करताना कंबरेतून पुर्ण शरीर ट्विस्ट होईल याची काळजी घ्यावी. पण हात मात्र एका जागेवरच स्टेबल असावेत.