आपलं पोट स्लिम मेंटेन दिसावं आपण बारीक राहावं असं प्रत्येकालाच वाटतं. (Belly Fat) वजन कमी करण्यासाठी काहीजण डाएट करतात तर काहीजण रोज व्यायाम करून स्वत:ला मेंटेन ठेवतात. (Simple Exercise to Lose Your Belly Fat) महिलांचे जसजसे वय वाढते तसतसे कंबरेची चरबी वाढत जाते. कारण वाढत्या वयात मसल्स कमी होऊन फॅट्सचे प्रमाण वाढते. (Exercises to Help You Lose Belly Fat) पोटाच्या चरबीमुळे तुम्हाला सेल्फ कॉन्शियस वाटू शकते. तुम्हाला तुमचे आवडते कपडे घालण्यातही संकोच वाटू शकतो. पोटाशी संबंधित आरोग्याच्या समस्याही उद्भवू शकतात. हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्टेरॉल, टाईप-२ डायबिटीस, श्वास घ्यायला त्रास होणं असे त्रासही उद्भवतात. (Weight Loss Tips in Marathi)
१) स्वॅट्स ट्विस्ट
आपल्या पायांमध्ये अंतर ठेवून व्यवस्थित उभं राहा. नंतर स्वॅट्स करा. वर जंप केल्यानंतर शरीर ९० अंशात उजव्या बाजूला पाय फिरवा. पुन्हा जंप करा सेंटरमध्ये आल्यानंतर खाली बसून पुन्हा वर या सेम व्यायाम डाव्या बाजूनेही करा.
२) स्वॅट्स बेंड्स
एखाद्या खुर्चीवर बसल्याप्रमाणे शरीराचे पोश्चर ठेवा. गुडघे आणि हिप्स एकत्र वाकवा फक्त हे करत असताना पाठीचा कणा सरळ ठेवा. जसं तुम्ही खाली यात तसं गुडघे आणि पायांची बोट वरच्या बाजूने फिरवा. पायांच्या मदतीने वजन बॅलेन्स करण्याचा प्रयत्न करा नंतर पहिल्या पोझिशनमध्ये परत या
३) साईट बेंड्स
साईड बेंड्स करण्यासाठी दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून उभं राहा. नंतर दोन्ही हात वर न्या. एकदा डाव्या बाजूने साईडला वाका, एकदा उजव्या बाजून साईडला वाका. या व्यायामाने साईडचे फॅट कमी होण्यास मदत होईल.
४) साईड वेट बेंड्स
सगळ्यात आधी हातात २ डम्बल घ्या. नंतर सरळ उभं राहून हात वर न्या. पाय आणि खांद्यांची लेव्हल सेम ठेवा. पाठ सरळ ठेवा नंतर डोळे समोरच्या बाजूला ठेवा नंतर पुन्हा खाली वाका.
कोअर एक्सरसाईजचे फायदे
एक मजबूत कोअर रोजच्या कार्यांना चालना देण्यासााठी तसंच स्नायूंना बळकटी मिळण्यासाठी फायदेशीर ठरतो. यामुळे पाठ,पेल्विक पार्ट, मांड्याचेही स्नायू मजबूत होतात. या व्यायामांनी पोश्चर चांगले राहण्यास मदत होते.