Join us  

सकाळी उपाशीपोटी चुकूनही खाऊ नयेत असे ४ पदार्थ, वजन कमी होण्याऐवजी वाढेल झपाट्याने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2023 2:48 PM

4 Foods to Avoid for Weight Loss सकाळचा नाश्ता आवश्यकच पण सकाळी आपण काय खातो याकडे लक्ष द्या.

भारतीय लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढत चालली आहे. अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी लोकं व्यायाम शाळेत जाऊन तासंतास घाम गाळतात. पण व्यायामासह उत्तम आहाराचे सेवन करणं गरजेचं आहे. योग्य आहार वेळेवर न घेतल्यास लठ्ठपणाची समस्या वाढू शकते. काही लोकं वजन कमी करण्यासाठी उपाशी राहतात. नाश्ता स्किप करतात. पण असं केल्याने काही काळासाठी वजन कमी होऊ शकते. पण त्यानंतर दुपट्टीने वजन वाढण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे नाश्ता, दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, नाश्ता खूप महत्वाचा असतो. सकाळचा नाश्ता योग्य आहाराने केल्याने दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. पण उपाशी पोटी काय खावं काय टाळावं हे जाणून घेणं गरजेचं आहे. काही पदार्थ चुकूनही रिकाम्या पोटी खाऊ नये. ज्याचा थेट परिणाम आरोग्यावर होऊ शकतो(4 Foods to Avoid for Weight Loss).

यासंदर्भात, न्यूट्रिशनिस्ट नेहा सहाय यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी सकाळी रिकाम्या पोटी कोणते पदार्थ खाणे टाळावे याची माहिती दिली आहे. हे पदार्थ खाल्ल्याने वजन वाढण्याची शक्यता निर्माण होते.

रोज सकाळी उपाशीपोटी लसूण खाल्ला तर कोलेस्टेरॉल खरंच कमी होते? तज्ज्ञ सांगतात..

लिंबू पाणी व मध

वजन कमी करण्यासाठी लोकं सकाळी रिकाम्या पोटी पाण्यात लिंबाचा रस किंवा मध घालून पितात. नेहा सहायच्या मते, ''असे करणे पूर्णपणे चुकीचे आहे. मधामध्ये साखरेपेक्षा जास्त कॅलरीज असते. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. ज्यामुळे कॅलरीज व रक्तातील साखर वाढू शकते.  आजकाल बाजारात नैसर्गिक मध मिळत नाही. त्यात साखरेचं प्रमाण जास्त असते. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी या पेयाचे सेवन करणे टाळा.

सकाळी २ ते ३ तासानंतरचं चहा प्या

आय-थ्रीवच्या सीईओ आणि संस्थापक पोषणतज्ञ मुग्धा प्रधान सांगतात, ''चहा आणि कॉफी रिकाम्या पोटी पिऊ नये. कारण ते अॅसिड तयार करतात, ज्यामुळे पचनसंस्था खराब होऊ शकते. यासह पोटाचा देखील त्रास होऊ शकतो.''

त्या पुढे सांगतात, ''सकाळी शरीरातील स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसोलची पातळी जास्त असते. व सकाळी रिकाम्या पोटी कॅफीन प्यायल्याने ते वाढू शकते. सकाळी उठल्यानंतर २ ते ३ तासांनंतरच कॅफीनयुक्त पेयाचे सेवन करा. किंवा सकाळी काहीतरी खा आणि त्यानंतरच प्या.

सुटलेलं पोट होईल कमी, डबल चिन गायब,रामदेव बाबा सांगतात सोपे उपाय

रिकाम्या पोटी लिंबूवर्गीय फळे खाऊ नका

लिंबूवर्गीय फळे रिकाम्या पोटी खाऊ नयेत, त्यामुळे पोटात आम्लपित्त होऊ शकते, ज्यामुळे वारंवार भूक लागते.

साखरयुक्त स्नॅक्स खाणे टाळा

सकाळी साखरयुक्त पदार्थ खाणे टाळा. कारण यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. सकाळी गोड पदार्थ खाल्ल्याने लवकर भूक लागते, वारंवार खाण्याची इच्छा होते. त्याऐवजी प्रोटीनयुक्त पदार्थ खा. ज्यामुळे कमी भूक लागते.

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्स