Lokmat Sakhi >Fitness > जिमला जायला वेळ नाही, डाएटचे तीन तेरा? फक्त २० मिनिटं ४ गोष्टी करा, सुटलेलं शरीर होईल सुडौल

जिमला जायला वेळ नाही, डाएटचे तीन तेरा? फक्त २० मिनिटं ४ गोष्टी करा, सुटलेलं शरीर होईल सुडौल

4 Full-Body Workouts for Weight Loss वेळच नाही या एकमेव कारणामुळे जर व्यायाम होत नसेल तर पाहा ही झटपट सोप्या व्यायामाची रीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2023 01:38 PM2023-05-30T13:38:22+5:302023-05-30T13:39:17+5:30

4 Full-Body Workouts for Weight Loss वेळच नाही या एकमेव कारणामुळे जर व्यायाम होत नसेल तर पाहा ही झटपट सोप्या व्यायामाची रीत

4 Full-Body Workouts for Weight Loss | जिमला जायला वेळ नाही, डाएटचे तीन तेरा? फक्त २० मिनिटं ४ गोष्टी करा, सुटलेलं शरीर होईल सुडौल

जिमला जायला वेळ नाही, डाएटचे तीन तेरा? फक्त २० मिनिटं ४ गोष्टी करा, सुटलेलं शरीर होईल सुडौल

आजूबाजूला फिट लोकं पहिल्यानंतर साहजिक आपल्याला देखील, वजन कमी करण्याची इच्छा होते. फिट राहायला कोणाला नाही आवडत. परंतु, फिट राहिल्यानंतर स्वतःला मेन्टेन ठेवणं तितकंच गरजेचं आहे. शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी व्यायामसह डाएट देखील महत्वाचं आहे.

काहींना असे वाटते की, वजन फक्त जिमला गेल्यानंतर कमी होऊ शकते. पण असे नाही आहे. आपण घरी देखील इक्विपमेंटविना वजन कमी करू शकता. या वर्कआउट्सद्वारे फक्त शरीरातील चरबी वितळणार नाही तर, दिवसभर काम करण्याची उर्जा देखील मिळेल. या फ्लोअर एक्सरसाइजमुळे शरीर हळहळू शेपमध्ये येईल(4 Full-Body Workouts for Weight Loss).

लंजेस

शरीराच्या खालच्या भागात साचलेली चरबी कमी करण्यासाठी, लंजेस हा व्यायाम करण्याचा सल्ला मिळतो. लंजेस हा व्यायाम करायला खूप सोपा आहे. या व्यायामुळे पाय टोन्ड होतात. हा व्यायाम करण्यासाठी हात कंबरेवर ठेवा, त्यानंतर डावा पाय पुढे न्या व गुडघ्यात वाकवा. गुडघा पायाच्या अंगठ्याच्या दिशेने पुढे जायला हवा. यानंतर मागचा पाय गुडघ्यात वाकवून तोल सांभाळण्याचा प्रयत्न करा. मग पूर्वस्थितीत या, व हीच क्रिया दुसरा पाय पुढे वाकवून करा.  हा व्यायाम १५ वेळा करा व याचे ३ सेट करा, यामुळे कंबर, पोट आणि मांड्यांची चरबी कमी होईल.

सकाळी उपाशीपोटी चुकूनही खाऊ नयेत असे ४ पदार्थ, वजन कमी होण्याऐवजी वाढेल झपाट्याने

प्लँक

पोट सपाट व एब्स हवे असल्यास प्लँक हा व्यायाम करा. दररोज प्लँक केल्याने शरीरातील जास्त कॅलरी बर्न होऊ शकतात. यासाठी सर्वप्रथम, जमिनीवर झोपा, यानंतर आपल्या पायांची बोटे आणि कोपरांच्या जोरावर संपूर्ण शरीर वर उचला. प्लँक करताना आपला तोल जाऊ शकतो. त्यामुळे हळहळू या व्यायामाचा टायमिंग वाढवा.

पुश अप्स

पुश अप्स केल्याने एकंदरीत संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. हा व्यायाम करायला अवघड नाही. हा व्यायाम करताना आपलं शरीर जमिनीशी समांतर ठेवा. पाय गुडघ्यामध्ये वाकवू नये. यानंतर शरीर वरील आणि खालील बाजूस न्यावे. हा व्यायाम तुमच्या क्षमतेनुसारच करावा. पुश अपमुळे स्नायू पेशी, खांदे आणि ट्राइसेप्स मजबूत होतात. शिवाय शरीराची क्षमताही वाढण्यास मदत मिळते.

ताक आणि राजगिरा खाऊन सुटलेलं पोट कमी होईल? खा ५ गोष्टी, सोपा आहार - पाहा बदल

माऊंटेन क्लाईंबर

माऊंटन क्लाईंबर्स हा एक व्यायाम आहे, जो कार्डिओ आणि कोर वर्कआउट्स एकत्र करतो. हा व्यायाम करण्यासाठी हात व पाय तुम्हाला जमिनीवरच अशा पद्धतीने हलवावे लागतात, जसे की तुम्ही एखाद्या डोंगरावर चढत आहात. हा व्यायाम करताना जास्त वेळ एकदम वेगाने करण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे अधिक कॅलरीज बर्न होतील.

Web Title: 4 Full-Body Workouts for Weight Loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.